STORYMIRROR

#मृदगंध पावसाचा

SEE WINNERS

Share with friends

स्टोरीमिरर व माय मराठी साहित्य मंच आयोजित भव्य राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धा,

  *"मृदगंध पावसाचा"*  

नमस्कार सारस्वतांनो 

आता चोहीकडे पावसाचे चोहीकडे आगमन झालेला आहे , त्या पावसात सारीच दृष्टी चिंब चिंब भिजण्यासाठी आतुर झालेली आहे

जणू काही " *मृदगंध पावसात* " आज मनामनाला भिजू दे, नवशब्दांना सुगंधी कस्तुरी समा पालवी फुटू दे"

सुंदर अशा निसर्गरम्य हिरवागार ऋतूचे वर्णन करूयात. "सप्तरंगी कमानीच्या इंद्रधनूचे कधी मंजुळ कोकिळेचा, हर्षित मयुराचे नृत्य, पारिजातकाचा सुगंधी सडा, पाने, फुले, दवबिंदू यांचा आस्वाद घेताना वर्णन करूयात व काव्यरुपी शब्दांचा काव्यपुष्प रुपात सुगंधित असा पाऊस पडू देत म्हणजे जणू काही 

पाऊस मना मनातील 

भावनांना भिजवून जातो

गंधाळलेल्या क्षणांना

अलवार स्पर्शुन जातो पावसाच्या येन्याने बळीराजा आनंदी होतो त्याचा तो आनंद व सर्वत्र दरवळनारी हिरवळ यांच वर्णन आपल्या लेखणीतुन करूया 

नदी नाले ओढे तुडुंब भरून वाहू लागतात तेव्हा मन भरून येऊन डोगर दरी तले ते रमनीय द्रष आपल्या लेखणीतून बांधून ठेऊया 

 असे सुंदर वर्णन आपल्या मनातील पावसाचे आपण आपल्या लेखणीद्वारे करूयात काव्य पुष्पांचा भरभरून वर्षाव होऊ द्या

*चला तर मग या स्पर्धेत आपण आपला सहभाग नोंदवूया*

नियम व अटी :

1.स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.

2.सदर स्पर्धा फक्त कवितांसाठी आहे.

3.कविता मराठीत सबमिट करता येतील.

4.सहभागींनी त्यांच्या मूळ कविता सादर केल्या पाहिजेत. शब्दांचे बंधन नाही.

5.सहभागी स्पर्धक एकापेक्षा अधिक रचनादेखील सादर करु शकतात.

6.एखाद्या रचनेबाबत वाद उद्भवल्यास त्यासाठी संबंधित लेखकच जबाबदार असेल.

7.इतर कोणत्याही लेखकाचे लेखन कॉपी केल्याचे आढळल्यास ते स्टोरीमिरच्या पोर्टल वरून डिलिट करण्यात येईल.

8.स्पर्धेत एकदा सबमिट केलेल्या साहित्य स्टोरीमिररच्या प्लॅटफॉर्मवरून काढून घेता येणार नाहीत.

9.संपादकीय गुणांच्या आधारे विजेत्यांचा निर्णय घेतला जाईल.

10.स्टोरीमिरर ने घेतलेला निर्णय अंतिम आणि सर्व स्पर्धकांवर बंधनकारक असेल.

 *साहित्य प्रकार:* कविता.

साहित्य सादर करण्याचा कालावधी: *3 जुलै 2021 ते 15 ऑगस्ट 2021.* 

बक्षीस :

 ⁃ सर्वोत्कृष्ट 20 कविता विजेत्यांचे प्रमाणपत्र मिळेल. 

 (ई-मेल द्वार)

 ⁃ सर्व सहभागींना सहभागाचे डिजिटल प्रमाणपत्र मेल द्वारे देण्यात येतील.

निकाल : 10 सप्टेंबर 2021

संपर्क: रोशन मस्के.(स्टोरीमिरर मराठी हेड)

मो:9768065763.