STORYMIRROR

#साहित्य उत्सव

SEE WINNERS

Share with friends

*स्टोरीमिरर व वदंन शब्दाना साहित्य मंच आयोजित* 

   *"साहित्य उत्सव"*

साहित्य लेखन स्पर्धा 

अगणित मायेचं लेणं म्हणजे साहित्य क्षेत्र. 

आपल्या भाव-भावना शब्दांवाटे उधळून शब्द ओंजळ रिती करायला गेलो की, ती अक्षय पात्राप्रमाणे पुन्हा भरून तयार असते.

कथा, कविता, चारोळ्या, अभंग, भारूड, भावगीते, भक्तीगीते अशा कितीतरी काव्य प्रकारांची *दीपमाळ* साहित्य क्षेत्राचे तेजोवलय वाढवते. वाचन-लेखन कलेची आवड मनापासून जोपासणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची साहित्य क्षेत्रासोबतच्या नात्याची वीण ही साक्षात *भगवद्गीतेप्रमाणे* समर्पक आहे. 

लेखणीला फुटलेला मायेचा पाझर हा शब्द-शब्द वहावत एक लोभसवाणा झरा बनून कितीतरी जीवांना सुखावून जातो. 

साहित्य क्षेत्रास लाभलेल्या असंख्य साहीत्यीक मंडळींना कायम आपल्या अस्तित्वाची सुवर्णमयी आभा प्रकाशित करण्यास लाभलेलं एक हक्काचं व्यासपीठ म्हणजे *स्टोरीमिरर.* अनेक नवोदित कवी-कवयित्रींना व्यक्त होण्यासाठी *स्टोरीमिरर* म्हणजे एक जीवा-भावाचा सखा.

चला तर आपले विविध विषयावरली साहित्य या स्पर्धेच्या माध्यमातुन सादरी करूया

• *स्पर्धा विषय _ मुक्तछंद*

• साहित्य प्रकार: कथा,कविता,चारोळी.

• साहित्य सादर करण्याचा कालावधी: 8 सप्टेंबर,ते 6 ऑक्टोंबर. 2021.

स्पर्धेचे नियम -

1.स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.

2.साहित्य फक्त मराठीत सबमिट करता येतील.

3.सहभागींनी त्यांच्या मूळ साहित्य सादर केल्या पाहिजेत. शब्दांचे बंधन नाही.

4.सहभागी स्पर्धक एकापेक्षा अधिक रचनादेखील सादर करु शकतात.

5.एखाद्या रचनेबाबत वाद उद्भवल्यास त्यासाठी संबंधित लेखकच जबाबदार असेल.

6.इतर कोणत्याही लेखकाचे लेखन कॉपी केल्याचे आढळल्यास ते स्टोरीमिरच्या पोर्टल वरून डिलिट करण्यात येईल.

7.स्पर्धेसाठी दिलेल्या लिंकवरून सबमिट केलेल्या प्रवेशिकाच ग्राह्य धरण्यात येतील.

8.संपादकीय गुणांच्या आधारे विजेत्यांचा निर्णय घेतला जाईल.

9.या स्पर्धेसाठी एकदा सबमिट केलेल्या साहित्य स्टोरीमिररच्या प्लॅटफॉर्मवरून काढून घेता येणार नाही.

10.स्टोरीमिरर ने घेतलेला निर्णय अंतिम आणि सर्व स्पर्धकांवर बंधनकारक असेल.

बक्षीस

सर्वोत्कृष्ट 5 कविता विजेत्यांचे डिजिटल प्रमाणपत्र व रु. 200 मूल्याचे स्टोरीमिरर शॉपिंग व्हाऊचर मिळेल. (ई-मेल द्वारे) 

सर्वोत्कृष्ट 5 कथा विजेत्यांचे डिजिटल प्रमाणपत्र व रु. 200 मूल्याचे स्टोरीमिरर शॉपिंग व्हाऊचर मिळेल. (ई-मेल द्वारे)

सर्व सहभागींना सहभागाचे डिजिटल प्रमाणपत्र व रु.100 मूल्याचे स्टोरीमिरर शॉपिंग व्हाऊचर मेल द्वारे देण्यात येतील.

निकाल : 31 ऑक्टोंबर 2021.

संपर्क : रोशन मस्के.(स्टोरीमिरर मराठी हेड.)

मो : 9768065763.