*साहित्य जगतातील जेष्ठ साहित्यिक व नवोदित लेखकांच्या अस्तित्वाचे ठसे जपणारे एकमेव मायेचे स्थान "स्टोरीमिरर"*
स्टोरीमिरर व शब्द पावली सखी मंच आयोजीत.
"शब्द क्रांती"
राज्यस्तरीय कथा, काव्य, लेखन स्पर्धा.
इतिहास नेहमीच आपल्याला एक नवी दिशा दाखवत असतो. येणाऱ्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी त्याची नेहमीच मदत होते.
भारतात राहणाऱ्या आपल्यासारख्या लेखकांसाठी इतिहास लिहिणे, वाचकांपर्यंत पोहोचवणे, क्रांतिकारकांच्या यशोगाथांचे वर्णन करणे, ही एक सुवर्णसंधीच असते.
स्वातंत्र्यासाठी प्राणत्याग करणारे क्रांतिकारक,स्वातंत्र्यानंतर आपल्या मुलभूत हक्कांची जाणीव,जनजागृती निर्माण करणारे क्रांतिकारक आणि समाजसुधारकांच्या ध्येयांमुळेच आपल्या देशाची प्रगती होत आहे. यापुढेही अशीच होत राहील.
या समाजसुधारकांच्या त्यागाला संपूर्ण देश आजतायगत स्मरत आहे. त्यांच्या स्मरणार्थ 'स्टोरीमिरर' व 'शब्द पालवी सखी मंच' आपणा सर्वांना पुढे काव्य/ कथा स्पर्धेचे आव्हान घेऊन येत आहे.
आपल्या शब्द क्रांतीने समाजसुधारकांच्या यशोगाथा, त्यांचे त्याग, बलिदान, समर्पण, त्यांचे दृष्टिकोन समाजसुधारकांची ओळख आपल्या शब्दातून मांडावी. भारताविषयी, भारताच्या संविधानाविषयी, मानवी मूलभूत हक्कांविषयीची जनजागृती आपल्या काव्य /कथेतून 'शब्द क्रांती' या स्पर्धेच्या माध्यमातून करूया.
साहित्य सादर करण्याचा कालावधी: 7 फेब्रूवारी.ते 6 मार्च.2022.
नियम :
बक्षीस
· सर्वोत्कृष्ट 10 कविता विजेत्यांचे डिजिटल प्रमाणपत्र व रु. 200 मूल्याचे स्टोरीमिरर शॉपिंग व्हाऊचर मिळेल. (ई-मेल द्वारे)
· सर्वोत्कृष्ट 10 कथा विजेत्यांचे डिजिटल प्रमाणपत्र व रु. 200 मूल्याचे स्टोरीमिरर शॉपिंग व्हाऊचर मिळेल. (ई-मेल द्वारे)
· सर्व सहभागींना सहभागाचे डिजिटल प्रमाणपत्र व रु.100 मूल्याचे स्टोरीमिरर शॉपिंग व्हाऊचर मेल द्वारे देण्यात येतील.
निकाल : 31.मार्च.2022.
संपर्क : रोशन मस्के.(स्टोरीमिरर मराठी हेड.)
मो : 9768065763.