STORYMIRROR

#"साहित्य सरी"

SEE WINNERS

Share with friends

"साहित्य सरी"


सर्वत्र मेघ दाटून मेघ गर्जना सह विजेच्या कडकडाटासह थेंब थेंब तुटून बेधुंद वाहणाऱ्या वाऱ्याने पाऊसाच्या सरी कोसळू लागतात.

तापलेली ती झळा व सर्वत्र गर्मीच गर्मी असे वातावरण संपून सोसाट्याच्या त्या वाऱ्यासह व मंद मंद पाऊस धारा जेव्हा सुरु व्हायला लागतात तेव्हा पावसाळा ऋतुचे आगमन होते.अन तापलेल्या वातावरणामध्ये अचानक गारवा येतो. मग पाऊस कधी रिमझिम येतो तर कधी कधी धो धो कोसळतो, सर्व आटलेले नद्या नाले पुन्हा जोमाने वाहू लागतात..

पाऊस पडतो सगळी कडे पाणी साचते आणि त्याच पावसात इंद्रधनुष देखील दर्शन देऊन जातो,तो खूप छान दिसतो. सर्वत्र बेडूक ओरडयला लागतात.  मोर रानात नाचू लागतात अन सोसात्याच्या वाऱ्यासह पावसाच्या सरी वर सरी कोसळू लागतात


चला तर मग असेच आपले रमनीय अनुभव लिहूया साहित्य सरी या स्पर्धे मार्फत


• साहित्य प्रकार: कथा,कविता,चारोळी.


• साहित्य सादर करण्याचा कालावधी: 16 मे ,ते 15 जून 2022.


स्पर्धेचे नियम -


1.स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.


2.साहित्य फक्त मराठीत सबमिट करता येतील.


3.सहभागींनी त्यांच्या मूळ साहित्य सादर केल्या पाहिजेत. शब्दांचे बंधन नाही.


4.सहभागी स्पर्धक एकापेक्षा अधिक रचनादेखील सादर करु शकतात.


5.एखाद्या रचनेबाबत वाद उद्भवल्यास त्यासाठी संबंधित लेखकच जबाबदार असेल.


6.इतर कोणत्याही लेखकाचे लेखन कॉपी केल्याचे आढळल्यास ते स्टोरीमिरच्या पोर्टल वरून डिलिट करण्यात येईल.


7.स्पर्धेसाठी दिलेल्या लिंकवरून सबमिट केलेल्या प्रवेशिकाच ग्राह्य धरण्यात येतील.


8.संपादकीय गुणांच्या आधारे विजेत्यांचा निर्णय घेतला जाईल.


9.या स्पर्धेसाठी एकदा सबमिट केलेल्या साहित्य स्टोरीमिररच्या प्लॅटफॉर्मवरून काढून घेता येणार नाही.


10.स्टोरीमिरर ने घेतलेला निर्णय अंतिम आणि सर्व स्पर्धकांवर बंधनकारक असेल.


बक्षीस


*सर्वोत्कृष्ट १० कविता विजेत्यांचे डिजिटल प्रमाणपत्र मिळेल. (ई-मेल द्वारे) 


*सर्वोत्कृष्ट १० कथा विजेत्यांचे डिजिटल प्रमाणपत्र मिळेल. (ई-मेल द्वारे)


*सर्वोत्कृष्ट १० चारोळी विजेत्यांचे डिजिटल प्रमाणपत्र मिळेल.


* सर्व सहभागींना सहभागाचे डिजिटल प्रमाणपत्र मेल द्वारे देण्यात येतील.


निकाल : 14. जुलै 2022.


संपर्क : रोशन मस्के.(स्टोरीमिरर मराठी हेड.)


मो : 9768065763.