*साहित्य जगतातील जेष्ठ साहित्यिक व नवोदित लेखकांच्या अस्तित्वाचे ठसे जपणारे एकमेव मायेचे स्थान "स्टोरीमिरर"*
स्टोरीमिरर व भारतीय साहित्य सांस्कृतिक मंच व फ्रिडम स्टोरी आयोजित
*"विश्व लेखणीचे"*
राज्यस्तरीय साहित्य लेखन स्पर्धा.
नभांगणातील तारकांप्रमाणे विशाल ...असंख्य साहीत्य रूपी आकाशगंगा साहित्य क्षेत्राच्या ब्रम्हांडात विहरत आहेत. जपलेले, अनुभवलेले कल्पनेच्या पार भारावलेले, असंख्य भाव-भावनांनी, भक्तीने अवतरीत ओतप्रोत शब्द साहित्य क्षेत्राला व्यापूनही उरतात. मन,भावना आणि विचार यांचे सौख्य अवघ्या विश्वाला भुरळ घालते. वेदना, यातना,ठसठसणारी असंख्य दुःख्खे साहीत्याच्या श्रावणसरीत न्हाऊन निघतात. लेखनीचे विश्व हे अमर्याद, अनंत आहे.
या विश्वाचे आपण एक सूक्ष्मरूप लेखक आहात.असंख्य भावनांची गुंतागुंत उलगडतांना मन अक्षरशः गहीवरून येते. लिहीलेल्या कथा,कवितेची चमक आणि स्थान हे ध्रुव ताऱ्याप्रमाणे अढळपद प्राप्त करून देते. सदोदीत जगाला प्रकाशमान करत आपल्या अस्तित्वाची सोनेरी किरणे पसरवणाऱ्या रवी प्रमाणे स्टोरीमिरर वरील या स्पर्धेत असंख्य कथा, कविता, कोट्स प्रत्येकाने सादर करून त्या किरणात न्हाऊन निघुया
*चला तर मग आत्ताच आपली लेखणी उचलून, "विश्व लेखणीचे" या स्पर्धेत सहभागी होऊया*
*साहित्य प्रकार : कथा कविता कोट्स*
साहित्य सादर करण्याचा कालावधी: 4.ऑक्टोंबर. 3.नोव्हेबर.2021,
*विषय : विषयाचे बंधन नाही*
*(आपल्या आवडी नुसार विषय निवडावा )*
स्पर्धेचे नियम -
1.स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.
2.सहभागी आपल्या आवडत्या विषयावर कविता / कथा / कोट्स सादर करू शकतात.
3.कोणतीही शब्द मर्यादा नाही
4.सहभागींनी त्यांच्या मूळ साहित्य सादर केल्या पाहिजेत. शब्दांचे बंधन नाही.
5.सहभागी स्पर्धक एकापेक्षा अधिक रचनादेखील सादर करु शकतात.
6.एखाद्या रचनेबाबत वाद उद्भवल्यास त्यासाठी संबंधित लेखकच जबाबदार असेल.
7.इतर कोणत्याही लेखकाचे लेखन कॉपी केल्याचे आढळल्यास ते स्टोरीमिरच्या पोर्टल वरून डिलिट करण्यात येईल.
8.स्पर्धेसाठी दिलेल्या लिंकवरून सबमिट केलेल्या प्रवेशिकाच ग्राह्य धरण्यात येतील.
9.संपादकीय गुणांच्या आधारे विजेत्यांचा निर्णय घेतला जाईल.
10.या स्पर्धेसाठी एकदा सबमिट केलेल्या साहित्य स्टोरीमिररच्या प्लॅटफॉर्मवरून काढून घेता येणार नाही.
11.स्टोरीमिरर ने घेतलेला निर्णय अंतिम आणि सर्व स्पर्धकांवर बंधनकारक असल.
बक्षीस
सर्वोत्कृष्ट 20 कविता विजेत्यांचे डिजिटल प्रमाणपत्र व रु. 200 मूल्याचे स्टोरीमिरर शॉपिंग व्हाऊचर मिळेल. (ई-मेल द्वारे)
सर्वोत्कृष्ट 10 कथा विजेत्यांचे डिजिटल प्रमाणपत्र व रु. 200 मूल्याचे स्टोरीमिरर शॉपिंग व्हाऊचर मिळेल. (ई-मेल द्वारे)
सर्वोत्कृष्ट 10 कोट्स विजेत्यांचे डिजिटल प्रमाणपत्र व रु. 200 मूल्याचे स्टोरीमिरर शॉपिंग व्हाऊचर मिळेल. (ई-मेल द्वारे)
सर्व सहभागींना सहभागाचे डिजिटल प्रमाणपत्र व रु.100 मूल्याचे स्टोरीमिरर शॉपिंग व्हाऊचर मेल द्वारे देण्यात येतील.
निकाल : 3 डिसेंबर 2021.
संपर्क : रोशन मस्के.(स्टोरीमिरर मराठी हेड.)
मो : 9768065763.