STORYMIRROR

#हास्य कथा

SEE WINNERS

Share with friends

निखळ, निर्मळ हास्य हे मानवाला मिळालेलं वरदान आहे. ज्याचं हास्य कुठल्याही प्रसंगात टिकून रहातं तो योग्य तो निर्णय घेऊ शकतो आणि म्हणूनच स्थिर आयुष्य जगू शकतो.


आपल्या धावपळीच्या जीवनात, सर्व थकवा, टेंशन विसरून आपल्या ओठांवर हसू आणेल असे लेखन म्हणजे विनोदी कथा.विनोदी कथा लिहिणे खरंच अवघड काम आहे, पण विनोदी लेखन करणारे लेखक वाचकांना जास्त भावतात, त्यांचे लेखन वाचकांच्या मनात घर करते, जुने मराठी विनोदी चित्रपट आज ही लोक आवडीने बघतात,विनोदी लेखन करणारे लोकप्रिय लेखक मराठी भाषेला लाभले आहेत. 

आजही आपण पु.लं. देशपांडे, द. मा. मिरासदार यांची पुस्तके आवडीने वाचतो. या कथा तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात,म्हणूनच स्टोरी मिरर प्रस्तुत करते हास्य कथा लेखन स्पर्धा ज्याने केवळ तुमचेच नाही तर तुमच्यासोबत सर्वांचे मनोरंजन होईल. आणि दुसऱ्यांच्या ओठांवरील हास्याचे काही श्रेय तुमचेही असेल.



साहित्य प्रकार : कथा,


साहित्य सादर करण्याचा कालावधी : दि.16 सप्टेंबर 2022.ते 16 ऑक्टोबर 2022.


स्पर्धेचे नियम -


1.या स्पर्धेत आपण फक्त कथा लिहू शकता.

2.सहभागींनी त्यांच्या मूळ कथा सादर केल्या पाहिजेत. 

3.कोणत्याही व्यक्तीला वाईट वाटेल अशी कथा सबमिट करू नये

4.कृपया अश्लील विनोदी कथा सबमिट करू नये

5.एखाद्या कथे बाबत वाद उद्भवल्यास त्यासाठी संबंधित लेखकच जबाबदार असेल.

6.इतर कोणत्याही लेखकाचे लेखन कॉपी केल्याचे आढळल्यास ते स्टोरीमिरच्या पोर्टल वरून डिलिट करण्यात येईल.

7..संपादकीय गुणांच्या आधारे विजेत्यांचा निर्णय घेतला जाईल.

8.स्टोरीमिरर ने घेतलेला निर्णय अंतिम आणि सर्व स्पर्धकांवर बंधनकारक असेल.


 बक्षीस


· सर्वोत्कृष्ट 5 कथा विजेत्यांचे डिजिटल प्रमाणपत्र व रु.300 मूल्याचे स्टोरीमिरर शॉपिंग व्हाऊचर मिळेल. (ई-मेल द्वारे)


· सर्वोत्कृष्ट 50 कथा एका ई-बुक मध्ये प्रकाशित करण्यात येतील.


· सर्व सहभागींना सहभागाचे डिजिटल प्रमाणपत्र मेल द्वारे देण्यात येतील.


निकाल : 31 ऑक्टोबर 2022.


संपर्क : रोशन मस्के.(स्टोरीमिरर मराठी हेड.)

9768065763.