जागतिक पर्यावरण दिनानिमित्त
स्टोरीमिरर व पर्यावरणाचा ध्यास यूट्यूब चैनल आयोजित.
"पर्यावरणाचे संरक्षण"
कथा,कविता लेखन स्पर्धा.
पर्यावरण म्हंटलं की ,आपल्या डोळ्यासमोर निसर्गाचे विविध रूपे येतात .त्यात झाडी ,नदी ,डोंगर व झरे इत्यादी रूप समोर येतात.हिवाळ्यातील जाणवणारा थंड वारा ,गुलाबी थंडी तसेच उन्हाळ्यातील धगधगणारे ऊन व अवकाळी पडणाऱ्या गारा, अन पावसाळ्यातल्या त्या बरसणाऱ्या जलधारा ,वादळीवाऱ्यासह तुफान पाऊस असे एक ना अनेक प्रसंग डोळ्यासमोर समोर येतात. पूर्वी सारखे पर्यावरण पण आता राहिले नाही.
उन्हाळा संपून मृग नक्षत्रात उन्हाने तप्त झालेल्या धरणीवर जेव्हा पावसाच्या धारा येऊन बरसतात व सगळीकडे जो मातीचा सुंगध सुटतो अगदी तसेच आपल्या साहित्यातून तसाच सुंगध देऊया
तसेच पर्यावरण संरक्षण व त्याचा होणारा ऱ्हास थांबवण्यासाठी करता येणाऱ्या उपाययोजना आपण आपल्या साहित्यातून कविता व कथेच्या माध्यमातून मांडूया
१)पर्यावरण विषयी निसर्ग (कथा,कविता )
२)विविध ऋतूव त्यावर आधारित. (कथा,कविता )
३)पर्यावरण ऱ्हास व परिणाम
४)पर्यावरण वाचवण्यासाठी उपाय.
५)पर्यावरणा विषयी इतर काही.
स्पर्धेत सहभागी होऊन पर्यावरण विषयी लिहूया.
स्पर्धेचे नियम -
1.कथा,कविता,मराठीत सबमिट करता येतील.
2.स्पर्धकांनी आपली मूळ साहित्य रचना सादर करणे आवश्यक आहे. स्पर्धक अनेक साहित्य रचना सादर करु शकतात, त्यासाठी संख्येची मर्यादा नाही.
3.निबंध/लेख सबमिट करण्यास परवानगी नाही.
4.संपादकीय गुणांच्या आधारे विजेत्यांचा निर्णय घेतला जाईल.
5.या स्पर्धेसाठी एकदा सबमिट केलेल्या साहित्य स्टोरीमिररच्या प्लॅटफॉर्मवरून काढून घेता येणार नाही.
6.स्टोरीमिरर ने घेतलेला निर्णय अंतिम आणि सर्व स्पर्धकांवर बंधनकारक असेल.
साहित्य प्रकार: कथा,कविता
साहित्य सादर करण्याचा कालावधी: 5 जून 2021 ते 20 जून 2021.
बक्षीस
सर्वोत्कृष्ट 10 कविता विजेत्यांचे डिजिटल प्रमाणपत्र व रु. 200 मूल्याचे स्टोरीमिरर शॉपिंग व्हाऊचर मिळेल. (ई-मेल द्वारे)
सर्वोत्कृष्ट 10 कथा विजेत्यांचे डिजिटल प्रमाणपत्र व रु. 200 मूल्याचे स्टोरीमिरर शॉपिंग व्हाऊचर मिळेल. (ई-मेल द्वारे)
सर्व सहभागींना सहभागाचे डिजिटल प्रमाणपत्र व रु.100 मूल्याचे स्टोरीमिरर शॉपिंग व्हाऊचर मेल द्वारे देण्यात येतील.
निकाल : 25 जुलै 2021
संपर्क : रोशन मस्के.(स्टोरीमिरर मराठी हेड.)
मो : 9768065763.