स्टोरीमिरर प्रस्तुत अज्ञात कथासंग्रह,लेखक राहुल शिंदे, संयुक्त "कथा उत्सव " राज्यस्तरीय कथालेखन स्पर्धा २०२० चे आयोजित दि.५ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत storymirror.com या ऑनलाईन पोर्टल वर राबविण्यात येत आहे.
विविध भावभावना उतरूवण्याचं उत्तम माध्यम म्हणजे शब्द.ह्या शब्दांतून निर्माण झालेली कथा वाचकांना वेगळ्याच विश्वात घेऊन जाते आणि आत्मानंद देते.कथालेखनातून लेखक स्वतःच घडत असतो आणि लेखनाचे विविध पैलू समोर येतात.
प्रत्येकाच्या मनात एक कथा असतेच.तुमच्याही मनात असेलच,मग लागा तयारीला.
ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे.
*स्पर्धेचे नियम -*
१.सदर स्पर्धा फक्त कथेसाठी आहे.
२.कथेची किमान शब्दमर्यादा-५०० ते २००० शब्द
३.स्पर्धेत कोणीही भाग घेऊ शकतो. वयाचे कोणत्याही प्रकारचे बंधन नाही.
४.स्पर्धेसाठीच्या लिंकवरून सबमिट केलेल्या प्रवेशिकाच ग्राह्य धरण्यात येतील
५.स्पर्धेसाठी एकदा सबमिट केलेल्या साहित्य स्टोरीमिररच्या प्लॅटफॉर्मवरून काढून घेता येणार नाहीत.
६.आपल्या रचनेत कोणत्याही आक्षेपार्ह किंवा अश्लील शब्दांचा वापर करु नका किंवा कोणत्याही धार्मिक समुदायाच्या भावना दुखावल्या जातील, असे काहीही लिहू नये.
७.एखाद्या रचनेबाबत वाद उद्भवल्यास त्यासाठी संबंधित लेखकच जबाबदार असेल.
८.इतर कोणत्याही लेखकाचे लेखन कॉपी केल्याचे आढळल्यास ते स्टोरी मिरच्या पोर्टल वरून डिलिट करण्यात येईल.
९.सहभागी स्पर्धक एकापेक्षा अधिक रचनादेखील सादर करु शकतात.
१०.संपादकांनी दिलेले गुण यांच्या आधारे विजेत्यांची निवड करण्यात येईल.
११.स्टोरीमिरर ने घेतलेला निर्णय अंतिम आणि सर्व स्पर्धकांवर बंधनकारक असेल.
*निकाल आणि पुरस्कार :*
- दि. ३० नोव्हेंबर २०२० रोजी स्टोरी मिररच्या वेबसाईटवर स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात येईल.
- प्रथम सर्वोत्कृष्ट कथा लेखकाला रोख रक्कम ५०० रुपये+अज्ञात कथासंग्रह, स्टोरी मिररकडून विजेता डिजिटल प्रमाणपत्र ई-मेल द्वारे दिले जाईल.
-द्वितीय सर्वोत्कृष्ट कथा लेखकाला रोख रक्कम ३०० रुपये+अज्ञात कथासंग्रह, स्टोरी मिररकडून विजेता डिजिटल प्रमाणपत्र ई-मेल द्वारे दिले जाईल.
-तृतीय सर्वोत्कृष्ट कथा लेखकाला रोख रक्कम २०० रुपये+अज्ञात कथासंग्रह,स्टोरी मिररकडून विजेता डिजिटल प्रमाणपत्र ई-मेल द्वारे दिले जाईल.
- सर्व सहभागी स्पर्धकांना रु. 100 मूल्याचे स्टोरी मिरर शॉपिंग व्हाऊचर आणि डिजिटल सहभागीता प्रमाणपत्र ई-मेल द्वारे दिले जाईल.
टीप बक्षिसाची रोख रक्कम त्यांच्या अकाउंटवर ऑनलाइन द्वारे दिली जाईल.
संपर्क:
श्री.रोशन मस्के ( मराठी विभाग प्रमुख)
मो : ९७६८०६५७६३.
marathi@storymirror.com
1) लेखकाची माहिती: (About the Author)
राहुलच्या कथा गेल्या काही वर्षात लोकप्रभा,माहेर,उत्तमकथा अशा दर्जेदार मासिकांत/साप्ताहिकात प्रकाशित झालेल्या आहेत .या कथासंग्रहातल्या अज्ञात या कथेवर एकपात्री सादरीकरणाला 'स्वस्तिक' राज्यस्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक(१०,०००/- आणि स्मृतिचिन्ह), याच कथेच्या(अज्ञात) एकपात्री सादरीकरणाला 'अंतरंग थिएटर्स' ऑनलाईन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला आहे.
2)About the Book:
'बालपणी पावसात भिजताना बेभान व्हायचो आणि जाणवलं,बालपणानंतर आपण पावसापासून स्वतःचा बचावच करत आलो' अज्ञात कथेतील मृत्यूसमीप झालेली ही जाणीव; 'घायाळ करणाऱ्या घटनांना फक्त आंतरिक स्थिरतेची जोड दिली की त्या जखमा विरून जातात हे तुला कळू लागले होते, पण तीच एक एक जखम आपल्या हातून अलौकिक कला घडवतेय , म्हणून तू त्या जखमेचेच शब्द केलेस.' ईश्वर आणि चार आत्मे यामधील ईश्वराचे संवाद; 'आत्महत्येची नव्हे,हत्येची गोष्ट' कथेतून आजच्या तरुणांमधील वाढत असलेले नैराश्य,अशा सर्वच कथा वाचताना आपल्याला समृद्ध करतात अगदी मनापासून लिहिलेल्या,सत्याचा शोध घेऊ पाहणाऱ्या, प्रश्नांतून मार्ग शोधू पाहणाऱ्या या सर्व कथा आपल्याला नक्की आवडतील, खात्री वाटते.
हा कथासंग्रह अमेझॉनवर विक्रीसाठी या लिंकवर उपलब्ध आहे-https://amzn.to/39ySqFQ
स्टोरीमिररवर या लिंकवर उपलब्ध आहे- https://shop.storymirror.com/adnyat/p/16se70ecfkb7q4aul