STORYMIRROR

#काव्यधारा

SEE WINNERS

Share with friends

*स्टोरीमिरर* व काव्यांगण लेखनीचे मंच आयोजित.

    "काव्यधारा "

काव्य लेखन मासिक उपक्रम.

प्रत्येक क्षण हा आपल्या साठी अनमोल असतो, तसेच त्या क्षणाची ही किम्मत ही वेगळीच राहते, ज्याची तुलना करता येत नाही, गेलेला क्षण परत येत नाही, आयुष्य आपलं असंच क्षणभर आहे ते, क्षणभरासाठी तरी सुखी व्हावं. एकांत वेळी सुचलेलं काव्य जसं मन फुलवून टाकत असतं, पावसाच्या धारा धरती वर कोसळल्या की एक प्रकारचा सुगंध दरवळत राहतो अगदी तसंच साहित्य क्षेत्रातील आपलं साहित्य काव्यधारा प्रमाणे जर आपण लिहिलं तर आपल्या ही जीवनात साहित्याचा सुगंध नक्कीच आल्याशिवाय राहणार नाही.

काव्यधारा म्हणजे जसें पावसाच्या रिमझिम बरसती धारा तश्या काव्याचा धारा बरसने म्हणजे आनंद, प्रेम, विरह, सुख, दुःख, मैत्री, यश अशा अनेक भावनांचा आपल्याला काव्यरुपी शब्द गुंफून काव्याचा वर्षाव करायचा आहे आणि आपल्या मनातील विचारांना काव्यपुष्पात (शब्दरूपी माळ) गुंफून काव्यधारेत वर्णन करायचं आहे, चला तर मग उचला आपली लेखणी आणि होऊ देत सुगंधीत अलवार काव्यधारेचा वर्षाव.

नियम व अटी :

१.सदर उपक्रम फक्त कवितांसाठी आहे.

२.कविता मराठीत सबमिट करता येतील.

३.सहभागींनी त्यांच्या मूळ कविता सादर केल्या पाहिजेत तुम्ही कितीही कविता सादर करू शकता, त्याला कोणतीही मर्यादा नाही.

४.शब्दांचे बंधन नाही.

५.उपक्रमात भाग घेण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.

६.उपक्रमात एकदा सबमिट केलेल्या साहित्य स्टोरीमिररच्या प्लॅटफॉर्मवरून काढून घेता येणार नाहीत.

७.संपादकांनी दिलेले गुण तसेच लाईक्स कमेंट्स आणि रेटींग्जद्वारे साहित्यावरील वाचकांची एंगेजमेंट यांच्या आधारे विजेत्यांची निवड करण्यात येईल.

८.स्टोरीमिरर ने घेतलेला निर्णय अंतिम आणि सर्व स्पर्धकांवर बंधनकारक असेल.

 *साहित्य प्रकार:* कविता.

साहित्य सादर करण्याचा कालावधी: *24 मे 2021 ते 23 जून 2021.* 

पुरस्कार:

 ⁃ सर्वोत्कृष्ट १० कविता विजेत्यांचे प्रमाणपत्र मिळेल. 

 ⁃ सर्वोत्कृष्ट ५० कविता एका ई-बुक मध्ये प्रकाशित करण्यात येतील.

 ⁃ सर्व सहभागींना सहभागाचे डिजिटल प्रमाणपत्र मेल द्वारे देण्यात येतील.

निकाल : 22 जुलै 2021

संपर्क: रोशन मस्के.(स्टोरीमिरर मराठी हेड)

मो:9768065763.