आजकाल बहुतांशी लोकांना परकीय भाषेचे ज्ञान घेणे आवश्यक वाटते पण असे असले तरी आपण आपल्या मराठी भाषेला विसरून चालणार नाही. कारण तिनेच तर आपल्याला ' आई 'हा ममतारुपी शब्द अतिशय ममतने शिकवून अनेक प्रकारच्या शब्दसंपत्तीनं आपणास समृद्ध केले आहे. म्हणून आपण तिला मातृभाषेचा दर्जा दिलाच पाहिजे. तिच्यामुळेच आपण आपल्या मनातील भावना व्यक्त करुन प्रेमळ अशा शब्दांनी इतरांचे सांत्वन पण करू शकतो.
आपली मराठी भाषा बोलतांना,ऐकतांना,वाचतांना, गाणं गुणगुणतांना मधुर अशी अनुभुती देत असून ती समजण्यास सोपी पण आहे. तिचे अनेक शब्दार्थ,वाक्प्रचार,म्हणी,अलंकार अन वृत्तांद्वारेचअनेक दिग्गज साहित्यिकांनी आपल्या अनेक साहित्य प्रकारांनीच महाराष्ट्राच्या ऐतिहासिक,नैसर्गीक अशा अनेक रूपांच दर्शन घडवून विविधतेतून एकतेचा मौलीक असा संदेशही दिलेला आहे.
अनेक सण,उत्सवांचं वर्णन करुन महाराष्ट्राच्या उज्ज्वल अशा रुढी,परंपरा जागृत ठेवलेल्या आहेत.म्हणूनच आपण "लाभले आम्हास भाग्य बोलतो आम्ही मराठी " या कविवर्य सुरेश भटांच्या सुंदर ओळी ध्यानी घेवून आपणही आपल्या साहित्य रचनेद्वारे माय मराठीचे वैभव अबाधीत ठेवून ते वाढवू या.
नियम :
१.कथा,कविता,मराठीत स्वीकारल्या जातील.
२.शैलीवर कोणतेही निर्बंध नाहीत.
३.विजेत्यांचा निर्णय संपादकीय गुणांच्या आधारे केला जाईल.
४.स्पर्धकांनी आपली मूळ साहित्य रचना सादर करावी. तुम्ही सादर करत असलेल्या साहित्य रचनेच्या संख्येवर कोणतेही निर्बंध नाहीत.
शब्दमर्यादा नाही.
५.ईमेल किंवा टपाल,व्हाट्सअप अथवा स्पर्धेच्या लिंकव्यतिरिक्त अन्य मार्गाने सादर केली जाणारी साहित्य रचना स्पर्धेसाठी अपात्र असेल.
६.स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणतेही शुल्क नाही,
७.तुमची सहभाग प्रमाणपत्रे तुमच्या प्रोफाईल अंतर्गत प्रमाणपत्र विभागात उपलब्ध होतील.
साहित्य प्रकार : कथा, कविता.
बक्षीस :
सर्वोत्कृष्ट ५ कविता विजेत्यांचे डिजिटल प्रमाणपत्र व स्टोरीमिररकडून प्रकाशित झालेली तीन मराठी पुस्तके दिली जातील.
सर्वोत्कृष्ट ५ कथा विजेत्यांचे डिजिटल प्रमाणपत्र व स्टोरीमिरर कडून प्रकाशित झालेली तीन मराठी पुस्तके दिली जातील.
सर्व सहभागींना सहभागाचे डिजिटल प्रमाणपत्र व रु.१०० मूल्याचे स्टोरीमिरर शॉपिंग व्हाऊचर मेल द्वारे देण्यात येतील.
साहित्य रचना सादर करण्याचा कालावधी : दि.२६.फेब्रुवारी २०२२ ते.२५ मार्च २०२२.
निकाल : ३० एप्रिल २०२२.
संपर्क : रोशन मस्के.(स्टोरीमिरर मराठी विभाग प्रमुख ) मो: ९७६८०६५७६३.