STORYMIRROR

#"श्रावण सरी"

SEE WINNERS

Share with friends

श्रावण महिना हा आषाढ महिन्याची आषाढी अमावास्या/दर्श अमावास्या संपताच सुरु होतो. हा महिना आपल्याला धार्मिकता आणि संस्कृतीच विशेष आनंद देतो. भारतातील विविध भक्तिसंप्रदायांतील मान्यता अनुसार, श्रावण महिन्यात नागपंचमी रक्षाबंधन, मंगळागौर, व्रत, विशेष पूजा-अर्चना व विविध उत्सव साजरे केले जातात. 

"श्रावण सरी" या स्पर्धेद्वारे शब्दांसह श्रावण उत्साह सण साजरा करण्यासाठी स्टोरीमिरर मध्ये सामील व्हा. या लेखन स्पर्धेच्या माध्यमातून श्रावण महिन्याचे महत्व सौंदर्य लिखित शब्दातून टिपण्याची आम्हाला आशा आहे. आम्ही तुमच्या कथा, कविता वाचण्यासाठी आणि श्रावण उत्साह एकत्र साजरी करण्यास उत्सुक आहोत.


तुमच्या कल्पनाशक्तीला अधिक चालना देण्यासाठी काही मनोरंजक विषय दिले आहेत त्या विषयाला अनुसरून आपण कथा,कविता लिहू शकता किंवा आपल्या आवडत्या विषयावर पण लिहू शकता.


▪️ श्रावणी सोमवार

▪️ श्रावणी व्रत वैकल्य

▪️ श्रावणी पाऊस

▪️ मंगळागौर

▪️ श्रावणी एकादशी

▪️ निसर्ग व शेती

▪️ तुमच्या आठवणीतील श्रावण


नियम:-

  • स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.
  • सहभागी स्पर्धकांनी त्यांच्या स्वलिखित कथा,कविता सादर केल्या पाहिजेत.
  • आधीच्या स्पर्धेसाठी सबमिट केलेल्या कथा,कविता पुन्हा या स्पर्धेसाठी सबमिट करू नये
  • इतर कोणत्याही कवी किंवा लेखकाचे लेखन कॉपी केल्याचे आढळल्यास ते स्टोरीमिरच्या पोर्टल वरून डिलिट करण्यात येईल.
  •  तुमची कथा कविता कोणत्याही प्रकारची राजकीय किंवा कोणत्याही धार्मिक समाजाच्या भावना दुखावणारी नसावी याकडे विशेष लक्ष द्यावे.
  •  स्पर्धेसाठी एकदा सबमिट केलेले साहित्य स्टोरीमिररच्या प्लॅटफॉर्मवरून काढून घेता येणार नाही.
  •  संपादकीय गुणांच्या आधारे विजेत्यांचा निर्णय घेतला जाईल स्टोरीमिरर ने घेतला निर्णय अंतिम आणि सर्व स्पर्धकांवर बंधनकारक असेल.


साहित्य प्रकार : कथा,कविता


साहित्य सादर करण्याचा कालावधी: दि :२५ जुलै २०२३.ते २० सप्टेंबर २०२३


बक्षीस


* सर्वोत्कृष्ट ३ कथा, व ३ कविता, संपादकीय गुणांनुसार विजेत्या म्हणून घोषित केल्या जातील आणि बक्षीस म्हणून डिजिटल विजेते प्रमाणपत्रा सोबत, ₹२५० चे स्टोरीमिरर शॉप व्हाउचर देखील दिले जाईल.


* सर्व सहभागी स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्र मिळेल.


निकाल - २० ऑक्टोबर २०२३. 


संपर्क: रोशन मस्के.(स्टोरीमिरर मराठी हेड)


मो : ९७६८०६५७६३.