Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

#" आयुष्य एक रंगमंच "

SEE WINNERS

Share with friends

आयुष्य हा असा रंगमंच आहे जिथे कलाकार त्याच्या बाह्यरुपी चेहऱ्यावरून नाही तर अंतररूपी भूमिकेवरून घडत असतो - शीतल काळे


प्रत्येकाचं आयुष्य हे वेगळं असतं. कोणाचंही आयुष्य अगदी एकमार्गी, एकदम सुखात अथवा एकदम दुःखात असं नक्कीच नसतं.सखोल मनात कितीही दुःख असल तरी चेहऱ्यावर मात्र नेहमी हसू दिसलं पाहिजे. ह्या आयुष्यरूपी रंगमंचावर आपल पात्र सादर करत असताना प्रत्येकाला माहीत असत एक ना एक दिवस आपल्या पात्राचा शेवट होणार. तरी प्रत्येकजण आपली भूमिका अगदि जीव ओतून सादर करतो.

आयुष्याच्या रंगमंचावर माणसाला वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या भूमिका निभवाव्या लागतात, आणि प्रत्येक वेळेला एखाद्या भूमिकेत पुढचा संवाद कोणता असू शकेल, हे आपण ठरवू नाही शकत, त्याबाबत काही वेळेला -आपण अनभिज्ञ पण असतो.

चला तर, आपल्या आयुष्यातील रंगमंचावरील अनुभवलेले पात्र कथा कवितेतून मांडूया.


*साहित्य प्रकार:* कथा, कविता

*साहित्य सबमिट करण्याचा कालावधी:* दि.27 ऑगस्ट 2022.ते 26 सप्टेंबर 2022.


*स्पर्धेचे नियम -*


1.स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.

2.सहभागींनी त्यांच्या मूळ साहित्य सबमिट केल्या पाहिजेत. शब्दांचे बंधन नाही.

3.सहभागी स्पर्धक एकापेक्षा अधिक साहित्य देखील सबमिट करु शकतात.

4. तुमची कथा, कविता, आधीच स्टोरीमिरर वर प्रकाशित असल्यास, तुम्ही ती पुन्हा़ सबमिट करू शकत नाही.

5.इतर कोणत्याही लेखकाचे लेखन कॉपी केल्याचे आढळल्यास ते स्टोरीमिरच्या पोर्टल वरून डिलिट करण्यात येईल.

6.स्पर्धेसाठी दिलेल्या लिंकवरून सबमिट केलेल्या प्रवेशिकाच ग्राह्य धरण्यात येतील.

7.संपादकीय गुणांच्या आधारे विजेत्यांचा निर्णय घेतला जाईल.

8.स्टोरीमिरर ने घेतलेला निर्णय अंतिम आणि सर्व स्पर्धकांवर बंधनकारक असेल.


*बक्षीसे*


*सर्वोत्कृष्ट 5 कविता विजेत्यांचे डिजिटल प्रमाणपत्र मिळेल. (ई-मेल द्वारे)

*सर्वोत्कृष्ट 5 कथा विजेत्यांचे डिजिटल प्रमाणपत्र मिळेल. (ई-मेल द्वारे)

* सर्वोत्कृष्ट 20 कविता एका ई-बुक मध्ये प्रकाशित करण्यात येतील.

* सर्वोत्कृष्ट 20 कथा एका ई बुक मध्ये प्रकाशित करण्यात येईल.


सर्व सहभागींना सहभागाचे डिजिटल प्रमाणपत्र देण्यात येतील.


*निकाल* : 20 ऑक्टोबर 2022.


*संपर्क* : रोशन मस्के.(स्टोरीमिरर मराठी हेड.)

मो : 9768065763.