STORYMIRROR

#काव्यगंध

SEE WINNERS

Share with friends

स्टोरीमिरर व जाणता प्रतिष्ठाण (रजि) आयोजीत storymirror.com या ऑनलाईन साहित्य व्यासपीठावर.

    *"काव्यगंध"* 

राज्यस्तरीय ऑनलाईन काव्य लेखन स्पर्धा.

मीडिया पार्टनर pv 24 news.

गंधाचे अनेक प्रकार आहेत.

त्यापैकी सुगंध सर्वांनाच हवाहवासा वाटत असतो.

ग्रीष्म ऋतु नंतर सुरु झालेल्या पहिल्या मृगसरींनी मातीला आलेला कस्तुरी सुवास सर्वांच्याच मनाला भुरळ घालतो.

तसेच विविध अशा सुगंधित पुष्पांचा दरवळणारा सुगंधही प्रत्येकाच्या मनास मोहतो.

आपला सुगंध दुरवर पसरवणे हा फुलांच्या अंगी असलेला उत्तम असा गुणधर्म आहे.हा त्यांचा गुणधर्म आपण थोडातरी घेऊन नैसर्गिक ,काल्पनिक,प्रासंगिक आणि वास्तविक अशा विविध भावभावनांचा काव्यगंध आपणही आपल्या कवितेच्या रुपाने सर्वदूर पसरविण्याचा प्रयत्न करु या.

चला तर आपले विविध विषयावरली काव्य (कविता) *"काव्यगंध"* या स्पर्धेच्या माध्यमातुन सादर करूया.

साहित्य प्रकार: *कविता* .

साहित्य सादर करण्याचा कालावधी: 27 डिसेंबर 2021.ते 26 जानेवारी 2022.  

 स्पर्धेचे नियम:                                  

1.सदर स्पर्धा फक्त कवितांसाठी आहे.

2.कविता मराठीत सबमिट करता येतील.

3.सहभागींनी त्यांच्या मूळ कविता सादर केल्या पाहिजेत. विषयाचे बंधन नाही.

4.सहभाग घेण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.

5.सहभागी स्पर्धक एकापेक्षा अधिक रचनादेखील सादर करु शकतात.

6.एखाद्या रचनेबाबत वाद उद्भवल्यास त्यासाठी संबंधित लेखकच जबाबदार असेल.

7.इतर कोणत्याही लेखकाचे लेखन कॉपी केल्याचे आढळल्यास ते स्टोरीमिरच्या पोर्टल वरून डिलिट करण्यात येईल.

8.स्पर्धेसाठी दिलेल्या लिंकवरून सबमिट केलेल्या प्रवेशिकाच ग्राह्य धरण्यात येतील.

9.संपादकीय गुणांच्या आधारे विजेत्यांचा निर्णय घेतला जाईल.

10.या स्पर्धेसाठी एकदा सबमिट केलेल्या कविता स्टोरीमिररच्या प्लॅटफॉर्मवरून काढून घेता येणार नाही.

11.स्टोरीमिरर ने घेतलेला निर्णय अंतिम आणि सर्व स्पर्धकांवर बंधनकारक असेल.      

बक्षीस

⁃ सर्वोत्कृष्ट 5 कविता विजेत्यांना *आकर्षक ट्रॉफी* व डिजिटल प्रमाणपत्र मिळेल.

⁃ सर्व सहभागींना सहभागाचे डिजिटल प्रमाणपत्र व रु.100 मूल्याचे स्टोरीमिरर शॉपिंग व्हाऊचर मेल द्वारे देण्यात येतील.

निकाल : 28 फेब्रूवारी 2022.

संपर्क: रोशन मस्के.(स्टोरीमिरर मराठी हेड)

मो:9768065763.