स्पर्धेची थीमः आपल्यातील अंतर्गत लेखकास प्रोत्साहित करण्यासाठी आम्ही प्रत्येक 48 तासांत लेखन प्रॉम्प्ट म्हणून प्रतिमा सामायिक करू. थीम क्रमांक 8 येथे आहे
प्रस्तावना
प्रेरणादायक कथा लिहिणाऱ्या सर्व लेखकांसाठी स्टोरी मिरर पुन्हा एक नवी संधी घेऊन आले आहे. तुमच्या अप्रकाशित कथा छापील पुस्तकाच्या स्वरूपात वाचकांसमोर आणण्याची ही नामी संधी आहे. तुम्ही अशी उत्तम प्रेरणादायी कथा लिहा की ज्यामुळे वाचकांचे आयुष्य बदलून जाईल आणि आपली कथा या पुस्तकात प्रकाशित करण्याच्या या सुवर्णसंधीचे सोने करा.
स्टोरीमिररच्या या स्पर्धेत सहभागी होऊन तुमची कथा छापील स्वरूपात प्रकाशित करा. या स्पर्धेतील विजयी स्पर्धकांच्या कथा स्टोरीमिररद्वारे विशेष पुस्तकात प्रसिद्ध करण्यात येतील. या पुस्तकात सर्वोत्तम कथांना स्थान दिले जाणार असून तुम्हीही त्यात निश्चितच स्थान मिळवू शकता.
स्पर्धेसाठी नियम
- सर्व कथा प्रेरणादायी प्रकारातील असाव्यात.
- इंग्रजी, हिंदी, गुजराती, मराठी, ओडिया आणि बंगाली भाषेतील कथा सबमिट करता येतील.
- कथांसाठी शब्दमर्यादा – किमान 1500 शब्द आणि कमाल 2500 शब्द.
- स्पर्धेसाठी दिलेल्या लिंकद्वारे सबमिट केलेल्या कथाच ग्राह्य धरल्या जातील.
- संपादकांनी दिलेले गुण तसेच लाईक्स, कॉमेंट्स आणि रेटींग्जद्वारे वाचकांची एंगेजमेंट याच्या आधारे विजेत्यांची निवड केली जाईल.
- स्टोरी मिररने घेतलेला निर्णय अंतिम आणि सर्व स्पर्धकांसाठी बंधनकारक असेल.
- स्पर्धकांनी त्यांच्या स्वतःच्या मूळ कथा सादर कराव्यात.
- स्पर्धक कितीही कथा सबमिट करू शकतो. त्याला संख्येचे बंधन नाही.
- लेख किंवा निबंध सबमिट करता येणार नाहीत.
- या स्पर्धेसाठी एकदा सबमिट केलेल्या कथा स्टोरीमिररच्या प्लॅटफॉर्मवरून काढून टाकता येणार नाहीत.
पुस्तकासाठीचे नियम
- या स्पर्धेत सहभागी होऊन संबंधित लेखक/लेखिकेकडून त्याचे/तिचे साहित्य या पुस्तकात प्रकाशित करण्याचे सर्व हक्क स्टोरीमिररला मिळतील.
- स्टोरीमिरर संबंधित लेखक/लेखिकेच्या नावाचा उचित नामोल्लेख करील आणि लेखक/लेखिकेचा संक्षिप्त परिचय या पुस्तकात समाविष्ट करण्यात येईल.
- पुस्तकात प्रकाशित करण्यासाठी निवडलेले साहित्य अन्य कोणत्याही डिजिटल किंवा छापील प्लॅटफॉर्मवर प्रकाशित झालेले नसावे.
- या पुस्तकाच्या विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून कोणत्याही प्रकारची रॉयल्टी दिली जाणार नाही कारण हे साहित्य स्टोरीमिररच्या प्लॅटफॉर्मवर आधीच मोफत उपलब्ध असेल.
- या पुस्तकाची https://shop.storymirror.com आणि https://amazon.in येथे ऑनलाईन विक्री केली जाईल. अन्य कोणत्याही वितरकाकडे हे पुस्तक विक्री व वितरणासाठी देण्याचे पूर्ण हक्क प्रकाशकाला असतील.
- या नियमांमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही आणि या पुस्तकात एकदा प्रकाशित झालेले साहित्य काढून टाकता येणार नाही.
- ज्यांची कथा या पुस्तकात छापली जाईल त्या प्रत्येक लेखक/लेखिकेला या पुस्तकाची एक प्रत मोफत दिली जाईल.
बक्षीसे
प्रत्येक भाषेतील वीस सर्वोत्कृष्ट कथा छापील पुस्तकाच्या स्वरूपात प्रकाशित केल्या जातील.
प्रत्येक भाषेतील त्यापुढील उत्कृष्ट तीस कथा ई बुकच्या स्वरूपात प्रकाशित केल्या जातील.
सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.
पात्रता
स्पर्धेचा कालावधी – 9 ऑक्टोबर 2019 ते 31 ऑक्टोबर 2019
शब्दमर्यादा 1500 ते 2500 शब्द
निकाल प्रसिद्धीची तारीख – 20 नोव्हेंबर 2019
भाषा – मराठी
कंटेन्ट टाईप – कथा (किमान 1500 आणि कमाल 2500 शब्दांमध्ये)
संपर्क – marketing@storymirror.com/ 022 – 49243888/022 - 49240082