तळ्यातल्या प्रतिबिंबाने स्वतःशीच केली पुटपुट
उगाच केली मुखवट्याच्या जगाशी लुटपुट!
(चारोळी )
जुळवून तितकंच घ्या, जितकं जुळवता येईल, उगाच जस सुईचा धागा संपत असतांनां ओढून ताणून शिवत बसण्याचा प्रयत्न व्यर्थच ठरतो.
उगाच ती नाती आपली मानू नका, ज्यांना आपल्या असण्याने किंवा नसण्याने काहीच फरक पडत नसेल..
अश्या नात्यांच्या बाजारात कधीच जाऊ नका, जिथे तुमची किंमत शून्य असेल...
अश्या नात्यांच्या बाजारात कधीच जाऊ नका, जिथे तुमची किंमत शून्य असेल...
लक्षात ठेवा, ती नाती कधीच आपली नसतात, जी कधीच आपल्या भावना समजुन घेऊ शकत नाहीत...
त्या नात्यांसमोर कधीही आपली मान झुकवू नका, ज्यांना आपली मान झुकलेलीच पाहायला आवडते.
नातं टिकवण जेवढं आपल्याला महत्वाचं वाटत, तितकंच ते समोरच्यालाही वाटणं महत्वाचं असल पाहिजे. तरच नाती टिकू शकतात..
"नात्यांना रक्ताचं लेबल लावण्यापेक्षा प्रेमाचं लेबल लावणं अधिक महत्वपूर्ण असतं "!!..