सुख सुख म्हणती ज्यासी,असे ते आईच्या चरणासी.
त्रैलोक्याची स्वामिनी जननी जन्मदायिनी.
"माय,माऊली, जन्मदा
सदा सर्व काळी वरदा"
आई म्हणजे आई,तिला दुसरी उपमा नाही.
आई म्हणजे माया,आई म्हणजे आधार
आई म्हणजे त्याग,आई म्हणजे संस्कार
आई म्हणजे क्षमा,आई म्हणजे जीवनाचे सार
खरच आई असते या सर्वांच्याही पार.
ममता आत्मा आणि ईश्वर यांचा संगम म्हणजे आई.
जगातील सर्व श्रेष्ठ पदवी म्हणजे"आई ".
आई म्हणजे मायेची वृष्टी, 'आई'त सामावे संपूर्ण सृष्टी.
"मायेचा सागर, सुखाचे आगर, वात्सल्य अनिवार म्हणजेच 'आई' "