नशीब आणि प्रयत्न जर
जमली दोघांची सांगड
जीवनात येईल आनंद
निश्चित गाठू यशाचा गड
सौ. रंजना खेडकर
कोरोनाचा काळ बिकट
सर्वत्र मृत्यू करी थैमान
जमीन आता उरली नाही
सरण ही होई बेईमान
सौ. रंजना खेडकर
नागपूर
*स्पर्धा*
स्पर्धा करावी जीवनात
जिंकण्याचा नसावा मोह
प्रयत्नांची जोड देतानां
मनी भावनांचा उहापोह
सौ. रंजना खेडकर
नागपूर