Savita Tupe
Literary Colonel
AUTHOR OF THE YEAR 2021 - NOMINEE

152
Posts
7
Followers
3
Following

लेखिका / कवयित्री .

Share with friends
Earned badges
See all

पाठीवर पडते जेव्हा , थाप विश्वासाची ... कष्टालाही होते जाणीव स्वतःवरच्या जबाबदारीची !

मुक्त अवकाश विहरताना , पंखांना भरारीचे बळ मिळावे ..... स्वकर्तृत्वाने जग जिंकताना , आई बापाचे स्वप्न पूर्ण व्हावे !

इंद्रधनू रंगात रंगवायचे होते , सावळ्या तुझ्या प्रेमाला ... प्रेमात तुझ्या रंगून गेले , विसरले मी माझ्या रंगाला !!

लपवतो अश्रू आणून चेहऱ्यावर हास्य , कसं बरं दडवतो माणूस मनातलं रहस्य ??

आशेचा एक किरण , करतो निराशेवर मात ..... उघडते नशिबाचे दार अन् , बदलून जाते आयुष्य क्षणात !!

विध्यात्याने रचले नाट्य , आपण सारे कलाकार .... सुख दुःखाचा खेळ त्याचा , भाव भावना रंगत भरणार !! आयुष्याच्या या रंगमंचावर , कर्माचा होई अंक साकार..... पाप पुण्याच्या घड्यावर , जगनियंता आलेख मांडणार!

नजरेला कळतो प्रेमाचा इशारा , पहिल्या भेटीचा हा खेळ सारा , सहज जुळतात मनाच्या तारा , प्रेमाचा अनोखा हा सूर न्यारा !!

झुळूक ती वाऱ्याची , अलगद लहरून गेली ... मोगऱ्याच्या सुगंधाने , मनाला स्पर्शून गेली ! विरहाच्या क्षणांना , पुन्हा जागवून गेली .... सावरणाऱ्या मनाला, उद्ध्वस्त करून गेली !!

सहज सरले हे वर्ष जुने , स्वागत करुया नव वर्षाचे ... नव्या वर्षाच्या स्वागताला , संकल्प करावे काही नवे ! सरत्या वर्षासोबत सरावे , भले बुरे जे घडून गेले ... नव्या उमेदीने पुन्हा उभारावे , क्लेश विसरून सारे जुने ! * नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा !!* ....................................................................


Feed

Library

Write

Notification
Profile