कोरोनाच्या संकटामुळे विवाहाच्या
परिभाषा ही बदलतील कदाचित दिखाऊपणा, भडकपणा,जाऊन
साधेपणाने विधी होती
विवाह हा बेरीज वजाबाकी
आणि गुणाकार आहे
विवाहमुळेतर सुख दुप्पट
दुःख अर्ध्याने कमी
तर खर्च चौपट होतो
पैशाने विकत घेऊ शकतो का
आपण जगातील सर्व सुख
की पैशाच कारणीभूत असेल दुःख वाढविण्याचं.
शांतता मिळेल का
धन दौलत खर्च करून?
का मिळेल जीवनात
सत्कर्म करून
जीवन गाणे गात चालावे
हे जरी खरे असले तरी ते
सुखाचे गायचे की दुःखाचे
हे ज्याचे त्याने ठरवायला हव
लालसे सोबत जगतांना मनुष्य
जगणंच विसरून जातो...
तो फक्त खेळणं होतो लालसेचा
ती असते नेहमीच 'अतृप्त'
कित्येक युगे पालटले तरीही
एक गोष्ट नाही बदलली
ती म्हणजे पोटाची भूक
मीना महिंद्रकर
पाऊस सृष्टीचा चित्रकार
नवचैतन्य फुलविणारा जादूगार
मनुष्य कृतज्ञ त्याच्या चरणी
मानून त्याचे आभार
लग्न झालेल्या बहिणीलाच
विचारा, भावाची माया
सुखदुःखात देतो तो
वडिलांची छाया
मीना महिंद्रकर