सागर_ एक अथांग मन
Literary Colonel
33
Posts
30
Followers
0
Following

Hello Everyone.. Gald to interact with you all, I am professionally working in an MNC Company as Head - IT, here i am to keep my passion alive, I love writing. मी फक्त माझ्या मनातलं शब्दात मांडण्याचा प्रयत्न करतो.. त्याची चारोळी होते, त्यात तिला शोधण्याचा प्रयत्न करतो..

Share with friends

त्याच्या त्या अथांग मनात.. असं खूप काही दडलेलं.. मोतींचा जन्म झाला तळ्यात.. तरीही मन तुझ्यावरच अडले

त्याच्या त्या अथांग मनात.. असं खूप काही दडलेलं.. मोतींचा जन्म झाला तळ्यात.. तरीही मन तुझ्यावरच अडले

एकांत ही नाही राहिला, माझा असा सोबतीचा, तुझ्याच आठवणीत कधी, गेला रमून तो नेहमीचा..

एकांत ही नाही राहिला, माझा असा सोबतीचा, तुझ्याच आठवणीत कधी, गेला रमून तो नेहमीचा..

अनोळखी वाट ती आज, भेटण्याचं गणित मांडत आहे.. क्षण तुझ्या ते मिठीतले आज, ओंजळ भरून सांडत आहे..

सदाफुलीचा सडा तसा नेहमी, तुझ्या अंगणी पसरायचा.. तू त्यांच्यावर भाळलेली पाहून, तो निशिगंध ही मग लाजायचा..

जागे करावे तू मला, झोपेचे सोंग घ्यावे मी.. एकदा का होईना स्वप्नात, तुझ्यासोबत जगावे मी..

प्रेम, राग, हास्य, दुःख, सारं काही मांडलं, चार ओळींच्या त्या कवितेतलं, आयुष्य जगायचं राहिलं.. -©सागर_एक अथांग मन

आज वाटतंय आयुष्य ही अपूर्ण पडेल.. मनात जे आहे ते सांगायला.. आज वाटतंय एवढं सर्व असूनही.. माझ्याकडे काहीच नाही तुला द्यायला.. आज पुन्हा वाटतंय तू नव्याने यावी.. भेटणाऱ्या त्या पार्टीच्या वाटेला.. -©सागर_एक अथांग मन


Feed

Library

Write

Notification
Profile