आईच देते जन्म,आईच देते छाया
आईच करते प्रेम, अन् आईच देते माया,
आईच देते शब्द अन् आईच देते वाचा
रुजवते जशी संस्कार, तशीच रूजवते भाषा
करते जरी लाड तरी,चुकल्यास देते शिक्षा
म्हणूनच, पुरुषप्रधान असला देश
तरी ओठी असते मातृभाषा...
- सुरुची
जुळतात मनाच्या तारा
अन् गीत नवे स्फुरते,
तू मिठीत अलगद घेता
हे जीवन संगीत होते..
- सुरूची
माप ओलांडल्यावर कळतं,
की बदलल्या दिशा दाही,
घर मिळतं नवं पण
परिवार मिळत नाही.
-सुरुची.