ती करतात शहाणे आपल्याला
देतात आनंद आपल्या मनाला
वाचाल तर वाचाल त्यांना
जवळ करा त्या पुस्तकांना
पाण्याला म्हणतात जीवन
जीवन सांभाळायचं असेल
तर पाणी वाचवायला लागेल
नाहीतर जीवनात पाणीच नसेल
विषमतेची करूया होळी
समानतेचा मळवट भरुया कपाळी
ठरेल खचित ती होळी आगळी
आयुष्यात आनंद भरणारे रंग
त्यांचे एक वैराण ही असते अंग
रंगात रंगुनी राहू सदा निःसंग
जीवनास देऊया माणुसकीचे तरंग
तिला म्हणती सारे अबला
मन असते तियेचे सबला
साऱ्या क्षेत्रात दिसती महिला
महिला दिनी सलाम करू तिजला
धन्वंतरी म्हणजे डॉक्टर
आपल्या आयुष्याचा एक्स फॅक्टर
तोच जीवनदान आपल्याला देणार
झोपलेल्या कुडीला चालतं करणार
या जगातले आपण पोटार्थी
सारे चार दिवसांचे यात्री
परमार्थाची सोडून कास
कशाला होतो आम्ही स्वार्थी
तोच तारणार आहे आपल्याला
त्याच्याशिवाय पर्याय नाही कुणाला
उपभोग न विचार करता घेतो
ओरबाडीती त्यास पर्वा कशाला
जन्माची लागते त्याच्या चाहूल
त्या रुपाची पडते भूल
उमललेलं जणू नाजूक फुल
तेच असतं आपलं मूल.