"आमचे लेखी करार आहेत..'एक होता उंदीर'फस्त केल्यानंतरचे...घरातील एकाही पुस्तकाला दात लावायचा नाही..मीही नाही करणार विध्वंस सार्वजनिक प्रार्थनाग्रुह वा स्वच्छताग्रुहाचा...उंदीर हल्ली देवार्ह्यातील नंदादीपाच्या वाती लंपास करताहेत..हा फारसा करारभंग नाही.. ".. निखिल
"तुझ्या नंतरचे आयुष्य म्हणजे... बिछडून जावा एखादा बछडा रात्रीच्या अंधारात आईपासुन..गावच्या जत्रेत.."..निखिल
"आणखी काही वर्षांनी तु एका सुट्टीत गावी असताना दिवेलागणीच्या वेळेस तुझ्या लहानग्याला गोष्ट सांगशील..तेव्हा माझीच कहाऩी सांग..माझा उल्लेख'प्रेमात उद्धवस्थ होऊन गेलेला वेडा कवि'असाच कर...मी अधिक मुक्त होत जाईन..".. निखिल