स्वप्नातल्या पंखांना सत्याची झालर
सत्याच्या झालरला धुक्याची चादर
सौ क्षितिजा कुलकर्णी
शीतलता होती खूप आजपर्यंत
मनातले चंद्र झोपले तोपर्यंत
सौ क्षितिजा कुलकर्णी
अस्तित्वाची जेव्हा लढाई होते
तेव्हाच हक्कांची किंमत कळते
सौ क्षितिजा कुलकर्णी
माघार घेणं जमलं नाही
आणि आधार मागणं पटलं नाही
सौ क्षितिजा कुलकर्णी
दुःख कधी दिसलं नाही
सुख कधी लपलं नाही
सौ क्षितिजा कुलकर्णी
एकदा का मन मारलं
की हारायची सवय होती
हरायची सवय झाली की
जगायची सवय होती
सौ क्षितिजा कुलकर्णी