जगी जीवनी ही शाई लेखणीची,
कवितेतून व्यथा मांडितो रे जीवनाची,
अभेद्य झालेल्या या काळाची,
लेखनिपरी जीव माजा उरला,
लेखणी धरून श्वास माजा पुढे चालला !!
हाती घेऊनि लेखणी,घ्यावयास निघालो एक नवा बोध।
अदृष्य असलेल्या जगी नसलेल्या वाटांचा शोध।।
मदमत्सर भेदभाव सोडुनी हा क्रोध।
लेखणीतून लेख उतरवतो मनी पेटलेल्या वेदनेंचा आक्रोश.....
लेखणीतून लेख उतरवता मनी पेटलेल्या वेदनेंचा आक्रोश।।
-अक्षय