जगावे नेहमी स्वाभिमानाने कधीच कशाचा गर्व नसावा जावे लागते देह येथे सोडून चेहऱ्यावर प्रेम भाव असावा..! कु.दिपाली नि.मारोटकर
क्षितीजा प्रमाणे स्वप्न आपले पण असावे दुसऱ्यांच्या आनंदात सर्वजन आनंदी दिसावे..! कु.दिपाली नि.मारोटकर
आयुष्याच्या वळणावर होतात हो अनेक चूका चूकांना विसरून तुम्ही माणूसकीने जगणे शिका..! कु.दिपाली नि.मारोटकर
🌷माझी शब्द चारोळी🌷 मिळालेले शब्द ठेवले मी ओंजळीमध्ये जपून जेव्हा काम पडले तेव्हा टाकते चारोळी बनून..! कु.दिपाली नि.मारोटकर (शब्दपंखुळी),अमरावती
🌷माझी शब्द चारोळी🌷 शब्दांच्या सहवासात माझे मन गेले हरवून शब्दं शब्दं असा मला टाकतो अगदी मोहून..! कु.दिपाली नि.मारोटकर (शब्दपंखुळी),अमरावती
🌷माझी शब्द चारोळी🌷 येतात अनेक विचार कधी माझ्या मनात शब्द आठवत नाही क्षणातल्या क्षणात..! कु.दिपाली नि.मारोटकर (शब्दपंखुळी),अमरावती