@cacvwt98

Dattaprasad Satao
Literary Colonel
AUTHOR OF THE YEAR 2019 - NOMINEE38
Posts
56
Followers
1
Following

I'm Dattaprasad and I love to read StoryMirror contents.

Share with friends

Submitted on 30 Nov, 2019 at 16:41 PM

कधी न विसरता यावी अशी एक आठवण बनलीस ज्याविना जगणे कठीण तू माझा श्वास बनलीस

Submitted on 29 Nov, 2019 at 07:08 AM

एकच विनंती माझी जगवा निरोगी माझ्या निसर्गाला या शेतकऱ्याला शपथ धरती मातेची पुरवेल निरोगी अन्न भुकेल्या पोटाला

Submitted on 28 Nov, 2019 at 17:12 PM

जे पुन्हा घडणं जवळपास अशक्य बनून जातं त्याच काळाला आज ऐतिहासिक क्षण मानलं जातं

Submitted on 27 Nov, 2019 at 16:41 PM

तिच्या नावासमोर माझं नाव लावेल अशी एक खास असावी माझ्यात ती तिला जगतांना बघेल अशी एक परी असावी

Submitted on 26 Nov, 2019 at 17:22 PM

ज्येष्ठ नागरिक घेऊन चालतो घर तो घेऊन चालतो समाज एकटाच सारे सूत्र सांभाळतो त्याच्या शक्तीचा नका लावू अंदाज

Submitted on 25 Nov, 2019 at 16:54 PM

सौंदर्य घेऊन बसलेत सगळे चांगलेपणाची जान नाही श्रीमंतीला फॅशन मानतात गरिबीला मान नाही

Submitted on 24 Nov, 2019 at 17:47 PM

छडी असते, प्रेम असते मिळावे शिक्षण गुरूचे यश असो, अपयश असो कळते महत्त्व गुरूचे

Submitted on 23 Nov, 2019 at 17:54 PM

माज माज करतो अधिकारांचा सामान्य माणूस म्हणून जगून बघ काय असतात सामाजिक विषय एकदा समाजाला तर भेटून बघ

Submitted on 22 Nov, 2019 at 17:40 PM

नको हारुस नशिबाला कर जरा धाडस झुकेल कुंडली तुझ्यासमोर तू सोडू नको साहस

Submitted on 21 Nov, 2019 at 18:04 PM

नका हिरावून घेऊ मुलींनो ते पुण्य जे पडते फक्त तुमच्यामुळेच आई-वडिलांच्या पदरात, नशिबानेच लाभणारे त्यांना हे दानाहूनही सर्वश्रेष्ठ दान, असे हे ' कन्यादान '...

Submitted on 20 Nov, 2019 at 18:05 PM

प्रेम म्हणजे काय? प्रेम एक गुंतवणूक आहे एकदा मनापासून प्रेम करा तुम्ही गुंतवलेल्या प्रेमाचा नफा तुम्हाला व्याजासकट परत मिळेल...

Submitted on 19 Nov, 2019 at 17:44 PM

कसल्याही परिस्थितीत सांभाळते घर जगत नाही फक्त स्वतःचसाठी ती सर्वात शक्तिशाली स्त्री एक प्रेरणा माझ्यासाठी

Submitted on 18 Nov, 2019 at 17:53 PM

रक्तापलीकडे नातं हे मैत्रीच्या नात्यात वेगळे काय सांगू तुझी माझी साथ ज्यात त्यात आणखी काय मागू

Submitted on 17 Nov, 2019 at 14:53 PM

जीवन देतोय भटकून मेलेल्यांना माणूसपण आहे फक्त, काही लय नाही अमर होतोय त्यांच्या आशिर्वादाने तुझ्या हातून मला मृत्यूचे भय नाही

Submitted on 16 Nov, 2019 at 13:38 PM

फक्त पुस्तकातच नाही तर प्रत्येक जिवाच्या श्वासावर त्याचं नाव जाणता राजा म्हणून ओळखला जातो जिजाऊंचा शिवबा त्याचं नाव

Submitted on 15 Nov, 2019 at 16:44 PM

विश्वाला पाणी पुरविणारी भूमी स्वतःच पाण्याविना आज तहानलेली आहे जीवाने मारून माझ्या शेतकऱ्याला दुष्काळ एक समस्या म्हणून जन्माला आली आहे

Submitted on 14 Nov, 2019 at 18:24 PM

अहो कालच तर मी मला थोडं जगायला शिकविलं माझ्या बालपणीच मला या जगानं मोठं बनविलं

Submitted on 13 Nov, 2019 at 17:56 PM

सुखाच्या सरी जिथे दगडावरील रेश दुःखाचे डोंगर जिथे अळवावरचे पाणी स्वर्ग, ईश्वर सारेच फिके इथे आईची छाया हवी, आणखी नको काही

Submitted on 12 Nov, 2019 at 18:01 PM

माझ्या शिवबाशी लढतांना संपले येथे भले भले आज शान माझ्या भारताची जे जिंकले त्यांनी गड किल्ले

Submitted on 11 Nov, 2019 at 17:53 PM

रात्री आम्हाला जेवण मिळावं म्हणून राहतो तो दिवसभर उपाशी घाम गाळतो, रक्त जाळतो बाप माझा शेतकरी

Submitted on 10 Nov, 2019 at 18:04 PM

कोण चांगला कोण वाईट शोधण्यात नजर माझी तीक्ष्ण, तरीही कुणासोबत मी वागू कसा? आजच्या काळापुढील मोठा प्रश्न

Submitted on 09 Nov, 2019 at 17:53 PM

क्षण तर आयुष्यात फक्त तेच मोजतो ज्यात असतो तुझा माझा सहवास तु मला कळणे, मी तुला कळणे यात असतो फक्त भावनांचा प्रवास

Submitted on 08 Nov, 2019 at 17:35 PM

जीवनाच्या या रंगभूमीत अमर कोणी नाही जिंकते फक्त वेळ येथे कोणता महान योद्धा नाही

Submitted on 07 Nov, 2019 at 18:06 PM

तिला नाही कळणार प्रेम माझे ना येईल आणि ना माझं रडणं थांबवेल एकमेव विश्वासू तो पाऊस येईल आणि माझे अश्रू लपवेल

Submitted on 06 Nov, 2019 at 16:31 PM

क्षणभर सुखासाठी करून हाल जीवाचे तेव्हाच कळते महत्त्व श्रमाचे

Submitted on 05 Nov, 2019 at 12:00 PM

आमच्याच मानेवर पाय ठेऊन नको वाढवू आपला धंदा नको संयम बघू ग्रामीण भारताचे क्षणात देश संपवेल जगाचा पोशिंदा

Submitted on 04 Nov, 2019 at 17:22 PM

सुखद जीवन दूर ठेऊन श्रद्धेचे माणूस बळी पडतोय अंधश्रद्धेचा अंत केला नाही आपण हिच्या अपशक्तीचा तर हीच अंत करेल आपल्या आत्मशक्तीचा

Submitted on 03 Nov, 2019 at 15:32 PM

शक्ती लढण्याची भावना आपुलकीची माझी मराठी मायबोली माणूसपण जपण्याची

Submitted on 02 Nov, 2019 at 15:54 PM

असतो ज्यात सहवास तुझा माझा मिळतो मला त्यात अपार आनंद ज्यांनी टिकवून ठेवलं आपलं नातं त्या हृदय भावना लिहिणे हाच माझा छंद

Submitted on 01 Nov, 2019 at 18:28 PM

स्वराज्य उभे होईपर्यंत, श्वास माझा थांबणार नाही ही जिद्द माझ्या कष्टाची... प्राणाची आहुती देऊनी, लढू इतरांसाठी ही संस्कृती माझ्या महाराष्ट्राची...

Submitted on 13 Oct, 2019 at 12:41 PM

कुछ लोगों को दिल से निकालो या घर से, उनका गर्व मरता नहीं, मरता है सहने वाला, पर उन्हें कोई फ़र्क पड़ता नहीं।

Submitted on 30 Sep, 2019 at 06:30 AM

Your silence loves me and your words strengthen me.


Feed

Library

Write

Notification

Profile