सुट्टी थोडा दंगा, थोडी मस्ती थोडा खेळ आणि थोडी सुस्ती करूया गम्मत आहे सुट्टी नको आता अभ्यासाची धास्ती. © मधुनिता
ईश्वर ईश्वराला देवळात शोधण्याऐवजी प्रत्येक जीवात शोधा. तुम्हाला प्रत्येक जिवाच्या डोळ्यात ईश्वर हसताना दिसेल. © मधुनिता
हुशार मौन राहून योग्य वेळी उत्तर देणे हे हुशार माणसाचं लक्षण आहे. नाहीतरी मुर्ख माणसाची वाचाळता ही तोंडघशी पाडणारीच असते. © मधुनिता
ज्ञान ज्ञान हे अज्ञानाने अच्छादित असते. आज्ञानाच्या शेवाळाखाली निरंतर ज्ञानाचा निर्मळ झरा वाहत असतो. एकदा का हे शेवाळ दूर झाले की शुभ्र ज्ञानाचा प्रकाश परावर्तित होत असतो. © मधुनिता
मृत्यु जीवन क्षणभंगुर आहे जसा पाण्याचा बुडबुडा. तर मृत्यु हे जीवनाचं शाश्वत अंतिम सत्य आहे. © मधुनिता