@6wdoyg67

Tushar Mhatre
Literary Captain

172
Posts
41
Followers
0
Following

Loves to discover new things. Writes for some marathi newspapers.

Share with friends

Submitted on 12 Jul, 2020 at 04:31 AM

आता हसू येत असलेल्या लहाणपणीच्या मजेशीर प्रसंगांनी तेव्हा मनापासून आनंद दिलेला असतो!

Submitted on 11 Jul, 2020 at 13:34 PM

‘उद्या अलार्म वाजणार नाही!’ हा सुट्टी असण्यातला सर्वाधिक आनंद असतो. #तुषारकी

Submitted on 10 Jul, 2020 at 07:04 AM

‘ईश्वर’ संकल्पनेवर सर्वांचे एकमत होणार नाही; पण ‘तो असायला हवा याबाबत दुमत नाही!’

Submitted on 09 Jul, 2020 at 09:51 AM

लेखक होण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे, ‘लिहिणे’!😊

Submitted on 08 Jul, 2020 at 09:24 AM

वाईट वाटून घेऊ नका; जगात सर्वच माणसे बुद्धिवान नसतात!

Submitted on 07 Jul, 2020 at 10:50 AM

‘माहिती’ आणि ‘ज्ञान’ यात तोच फरक आहे जो ‘बीज’ आणि ‘रोपटे’ यात असतो!

Submitted on 06 Jul, 2020 at 11:32 AM

अनिश्चित जीवनातील एकमेव निश्चित गोष्ट म्हणजे मृत्यू!

Submitted on 06 Jul, 2020 at 11:26 AM

‘जन्म’ ही अशी दुर्घटना आहे, ज्याचा शेवट ‘मृत्यू’ हाच असतो.

Submitted on 05 Jul, 2020 at 09:55 AM

‘प्रेमाच्या फुग्याला वास्तवाची सुई कमकुवत करते.’

Submitted on 04 Jul, 2020 at 08:46 AM

आयुष्याच्या कागदावर कोरलेले अनुभव म्हणजे ‘काव्य’!

Submitted on 03 Jul, 2020 at 15:26 PM

#तुषारकी माणसांमधील नाती आणि बँकांची खाती; दोन्हीमध्ये बॅलन्स महत्वाचा!

Submitted on 03 Jul, 2020 at 15:01 PM

नात्यांना जपल्याने बंधन मजबूत होते; त्यांच्यापासून लपल्याने नाही!

Submitted on 02 Jul, 2020 at 10:34 AM

कठीण काळात जी भाषा मनाला उभारी देऊ शकते तीचं नाव ‘आशा’!

Submitted on 01 Jul, 2020 at 06:45 AM

आयुष्यात रंग भरण्याची क्षमता असणारा चित्रकार म्हणजे ‘डॉक्टर’!

Submitted on 30 Jun, 2020 at 02:26 AM

खोटं बोलण्यातील सर्वात वाईट गोष्ट म्हणजे ‘आपण काय बोललो होतो, ते लक्षात ठेवावं लागतं!’

Submitted on 29 Jun, 2020 at 03:29 AM

नैतिकतेचे पालन करणे म्हणजेच धर्माचे आचरण करणे!

Submitted on 28 Jun, 2020 at 02:02 AM

“स्वप्नांविना माणूस म्हणजे पंखाविना पक्षी!” #तुषारकी

Submitted on 27 Jun, 2020 at 07:39 AM

अदृश्य भावनांचे दृश्य रुप म्हणजे काव्य!

Submitted on 26 Jun, 2020 at 04:44 AM

पुस्तकं माणसं वाचायला शिकवतात!

Submitted on 26 Jun, 2020 at 04:38 AM

“घरबसल्या जगाची सफर घडवून आणण्याची क्षमता पुस्तकांमध्ये असते!”

Submitted on 24 Jun, 2020 at 07:29 AM

प्रवाहासोबत सगळेच जातात, खरे धाडस प्रवाहाविरूद्ध जाण्यात असते!

Submitted on 23 Jun, 2020 at 05:00 AM

तुमच्यावर जळणाऱ्या लोकांचा आदर करा; तुम्ही चांगलं काम करत असल्याची ‘अप्रत्यक्ष कबुली’ असते ती!

Submitted on 22 Jun, 2020 at 03:14 AM

‘वडील’पणाच्या जबाबदारीसाठी परिपूर्ण माणूस असण्याची गरज नसते; ही जबाबदारीच माणसाला परिपूर्ण बनवते!

Submitted on 21 Jun, 2020 at 09:55 AM

अतीउत्साह आणि सरावाचा अभाव या सं‘योगा’मुळे ‘योग’ करण्याचा प्र‘योग’ अंगलट येण्याची शक्यता असते!

Submitted on 20 Jun, 2020 at 06:22 AM

मनुष्याची निर्मिती असूनही ‘दैवी’ भासणारी गोष्ट म्हणजे... ‘संगीत’!

Submitted on 19 Jun, 2020 at 07:22 AM

खोट्या स्तुतीच्या हवेने मुर्खांचे पतंग आकाशात उडतात; पण या पतंगाचा मांजा बुद्धीवंतांच्या हाती असतो!

Submitted on 18 Jun, 2020 at 10:17 AM

प्रत्येकाचा पाऊस वेगळा आहे... “कुणी ‘वर्षा सहल’आहे म्हणून भिजतोय, तर कुणी ‘गळका महल’ आहे म्हणून!”

Submitted on 17 Jun, 2020 at 07:25 AM

“प्रेमामुळे विवाह बि घडतो आणि विवाहामुळे प्रेम बिघडते!”

Submitted on 16 Jun, 2020 at 09:51 AM

जेव्हा लोक म्हणतात “तुमचे आभार कसे मानू हेच कळत नाही!” जसे काय त्यांना कधी पैसा ही गोष्टच माहित नाही

Submitted on 15 Jun, 2020 at 11:19 AM

“दोन व्यक्ती एकाच घरात असतानाही नि:शब्द ‘शांतता’ असेल, तर समजावं की इथे ‘शांती’ नांदत नाही!”

Submitted on 14 Jun, 2020 at 09:40 AM

“काही पराभव हे विजयापेक्षा अधिक मार्गदर्शक ठरतात!”

Submitted on 13 Jun, 2020 at 03:03 AM

आयुष्याचा प्रवास हा रिक्षासारखाच; कधी इतरांची कहाणी ऐकत तर कधी रिक्षावाल्याची गाणी ऐकत!

Submitted on 12 Jun, 2020 at 06:35 AM

एखाद्याचे ‘हावभाव’ पाहूनच कळते की त्याची ‘हाव’ किती आहे आणि त्याला ‘भाव’ किती द्यायचा!

Submitted on 11 Jun, 2020 at 09:27 AM

‘युग’ किती मोठं असतं याचा अनुभव घ्यायचा असेल तर अमर व्हा किंवा सरकारी कार्यालयांचे लंचब्रेक पहा!

Submitted on 10 Jun, 2020 at 10:19 AM

काचेआडून पाहणाऱ्याला ‘जलधारा’ फक्त दिसतात, अनुभवता येत नाहीत... “डोळ्यांतील धारांचेही तसेच असते!”

Submitted on 09 Jun, 2020 at 09:36 AM

‘बायकोचा भाऊ’ या नात्याला खूप ‘वजन’ असते; पण हे मान्य न करणाऱ्याला मात्र ते ‘भारी’ ठरते!

Submitted on 08 Jun, 2020 at 05:00 AM

‘प्रेमाच्या’ नौकेत बसण्यापूर्वी ‘संसार’ नावाच्या महासागराचा एकदा विचार करून पहा!

Submitted on 07 Jun, 2020 at 10:29 AM

आपल्या ‘अर्थ’कारणासाठी मनुष्य ‘Earth’लाच वेठीस धरतो; याला काही ‘अर्थ’ आहे का? #तुषारकी

Submitted on 06 Jun, 2020 at 02:53 AM

लग्न समारंभात येणाऱ्या अ‘तिथींची’ संख्या शुक्ल किंवा वद्य तिथीपेक्षा ‘मद्य तिथी’लाच अधिक असते!

Submitted on 02 Jun, 2020 at 02:46 AM

सुरू असलेल्या कंपन्यांना टाळे लागले असतानाही, ‘लॉकडाऊन’ला ‘टाळेबंदी’ का म्हणतात कोण जाणे?

Submitted on 01 Jun, 2020 at 09:48 AM

‘आई-वडील’ या पदाचा खरा अर्थ ते पद स्विकारल्यावरच कळतो!

Submitted on 01 Jun, 2020 at 09:48 AM

‘आई-वडील’ या पदाचा खरा अर्थ ते पद स्विकारल्यावरच कळतो!

Submitted on 31 May, 2020 at 02:21 AM

त्याने ‘धाडसा’ने ‘धाड’ टाकली खरी, पण ते ‘धाडस’ त्याच्या नोकरीलाच कायमचे ‘डस’ले!

Submitted on 31 May, 2020 at 01:58 AM

शेवटचे जीवघेणे धाडस काही वर्षापूर्वी केले होते; माझे मित्र या धाडसाबद्दल प्रतिवर्षी शुभेच्छाही देतात, “Happy Anniversary” म्हणत!

Submitted on 30 May, 2020 at 01:56 AM

“जीवनाचा प्रवास हा सहवासावर अवलंबून असतो; ज्यांना चांगला सहवास लाभतो त्यांनाच प्रवास ‘हवासा’ वाटतो!”

Submitted on 29 May, 2020 at 09:25 AM

“जे ‘माजात’ असतात; ते स‘माजात’ नसतात!” #तुषारकी

Submitted on 28 May, 2020 at 01:15 AM

‘प्रेम करणे’ हे जगातील दुसरे सुंदर क्रियापद आहे; पहिले... अर्थातच ‘मैत्री निभावणे’!

Submitted on 27 May, 2020 at 00:37 AM

‘राग’ म्हटले काय आणि ‘आग’ म्हटले काय? चटके दोन्हीकडे बसतात! #तुषारकी

Submitted on 27 May, 2020 at 00:37 AM

‘राग’ म्हटले काय आणि ‘आग’ म्हटले काय? चटके दोन्हीकडे बसतात! #तुषारकी

Submitted on 26 May, 2020 at 04:19 AM

‘डोळे’ जन्मजात असू शकतात; ‘नजर’ तयार व्हावी लागते! #तुषारकी

Submitted on 26 May, 2020 at 04:19 AM

‘डोळे’ जन्मजात असू शकतात; ‘नजर’ तयार व्हावी लागते! #तुषारकी

Submitted on 25 May, 2020 at 02:52 AM

‘पाय खेचणे’, ‘खो’ देणे, ‘लाथाडणे’ ही इतर खेळातली कौशल्ये क्रिकेटमध्ये ‘नेतृत्वपद’ मिळवून देतात.

Submitted on 25 May, 2020 at 02:52 AM

‘पाय खेचणे’, ‘खो’ देणे, ‘लाथाडणे’ ही इतर खेळातली कौशल्ये क्रिकेटमध्ये ‘नेतृत्वपद’ मिळवून देतात.

Submitted on 24 May, 2020 at 03:04 AM

रिमझिम पाऊस बरसताना तू नेहमीच आठवणीत येशील, “आणून देतो!” म्हणून नेलेली माझी छत्री परत कधी देशील?

Submitted on 24 May, 2020 at 03:04 AM

रिमझिम पाऊस बरसताना तू नेहमीच आठवणीत येशील, “आणून देतो!” म्हणून नेलेली माझी छत्री परत कधी देशील?

Submitted on 23 May, 2020 at 04:33 AM

“जपायचा असेल तुमच्यातला क्युटनेस, तर सांभाळा तुमचा फिटनेस!”

Submitted on 23 May, 2020 at 04:33 AM

“जपायचा असेल तुमच्यातला क्युटनेस, तर सांभाळा तुमचा फिटनेस!”

Submitted on 21 May, 2020 at 23:55 PM

कागदावरील शब्दांना साथ मिळाली तर त्यांचे सुंदर गीत बनते आणि जगण्याला साथ मिळाली तर आयुष्य रंगीत बनते

Submitted on 21 May, 2020 at 23:55 PM

कागदावरील शब्दांना साथ मिळाली तर त्यांचे सुंदर गीत बनते आणि जगण्याला साथ मिळाली तर आयुष्य रंगीत बनते

Submitted on 21 May, 2020 at 02:51 AM

घर हेच ‘स्वर्ग’ मानून वास करा; कारण सध्याच्या काळात बाहेर पडणं म्हणजे ‘स्वर्ग’वासी होणं!

Submitted on 21 May, 2020 at 02:51 AM

घर हेच ‘स्वर्ग’ मानून वास करा; कारण सध्याच्या काळात बाहेर पडणं म्हणजे ‘स्वर्ग’वासी होणं!

Submitted on 20 May, 2020 at 02:54 AM

‘नक्कल’ ही ‘अस्सल’ कला असूनही ते करणाऱ्याला ‘न’कलाकार का बरे म्हणत असावेत? #तुषारकी

Submitted on 20 May, 2020 at 02:54 AM

‘नक्कल’ ही ‘अस्सल’ कला असूनही ते करणाऱ्याला ‘न’कलाकार का बरे म्हणत असावेत? #तुषारकी

Submitted on 19 May, 2020 at 02:06 AM

जगात कोणतीही गोष्ट ‘अशक्य’ नाही; हे माझ्या मित्राला समजणे ‘शक्यच’ नाही! #तुषारकी

Submitted on 19 May, 2020 at 02:06 AM

जगात कोणतीही गोष्ट ‘अशक्य’ नाही; हे माझ्या मित्राला समजणे ‘शक्यच’ नाही! #तुषारकी

Submitted on 18 May, 2020 at 04:18 AM

“आपण खूपच जुने असल्याचे दु:ख विसरायला लावणारे एकमेव ठिकाण म्हणजे म्युझियम!” #तुषारकी

Submitted on 17 May, 2020 at 01:19 AM

“लोकांना तेजस्वी तारे लांबूनच आवडतात; त्यांचे तेज जवळून सहन करण्याची क्षमता त्यांच्यात नसते!”

Submitted on 17 May, 2020 at 01:19 AM

“लोकांना तेजस्वी तारे लांबूनच आवडतात; त्यांचे तेज जवळून सहन करण्याची क्षमता त्यांच्यात नसते!”

Submitted on 16 May, 2020 at 10:08 AM

“पेशाला तितकेच महत्त्व द्या, जितके पैशाला देतो!”

Submitted on 16 May, 2020 at 10:08 AM

“पेशाला तितकेच महत्त्व द्या, जितके पैशाला देतो!”

Submitted on 15 May, 2020 at 06:20 AM

“कावळ्याच्या घरट्यासारखं, असावं राहणीमान विचार फक्त राहणीचा, कशाला हवंय मान-पान?”

Submitted on 15 May, 2020 at 06:20 AM

“कावळ्याच्या घरट्यासारखं, असावं राहणीमान विचार फक्त राहणीचा, कशाला हवंय मान-पान?”

Submitted on 14 May, 2020 at 05:52 AM

“महाविद्यालय हे विद्येचे ‘आलय’ व्हावे; तिथे विद्येचा ‘लय’ होऊ नये!”

Submitted on 14 May, 2020 at 05:52 AM

“महाविद्यालय हे विद्येचे ‘आलय’ व्हावे; तिथे विद्येचा ‘लय’ होऊ नये!”

Submitted on 13 May, 2020 at 09:06 AM

आपल्या वडीलांचे ऋण बापजन्मात फिटत नसते

Submitted on 13 May, 2020 at 09:06 AM

आपल्या वडीलांचे ऋण बापजन्मात फिटत नसते

Submitted on 12 May, 2020 at 13:02 PM

एखाद्याचे काम दुसऱ्यासाठी आराम ठरू शकते; उदा. डॉक्टर आणि पेशंट

Submitted on 12 May, 2020 at 13:02 PM

एखाद्याचे काम दुसऱ्यासाठी आराम ठरू शकते; उदा. डॉक्टर आणि पेशंट

Submitted on 09 May, 2020 at 18:47 PM

‘आई’ शब्दाचे पावित्र्य सर्वजण जरी जाणतात, शिव्यांसाठी तरीही तोच शब्द आणतात!

Submitted on 09 May, 2020 at 18:47 PM

‘आई’ शब्दाचे पावित्र्य सर्वजण जरी जाणतात, शिव्यांसाठी तरीही तोच शब्द आणतात!

Submitted on 09 May, 2020 at 10:28 AM

‘सूड’ आणि ‘आसूड’; दोन्हीमध्ये फटके घेणाऱ्यालाच लागतात! #तुषारकी

Submitted on 09 May, 2020 at 10:28 AM

‘सूड’ आणि ‘आसूड’; दोन्हीमध्ये फटके घेणाऱ्यालाच लागतात! #तुषारकी

Submitted on 08 May, 2020 at 01:48 AM

“लग्न हे च्युईंगमप्रमाणे असते; सुरूवातीचा गोडवा संपला की मग नुसतंच चघळणं!”

Submitted on 07 May, 2020 at 12:40 PM

“साहित्य म्हणजे... सार्वजनिक हिताचे तत्व!”

Submitted on 06 May, 2020 at 12:14 PM

“निर्णय घेताना ‘वेळ’ झाला तरी चालेल, पण त्यामुळे आयुष्याचा ‘खेळ’ होता कामा नये!”

Submitted on 04 May, 2020 at 18:49 PM

“दुसऱ्यांच्या चुका जो अचूकतेने शोधू शकतो, तो स्वत:च्या चुका शोधण्याची चूक करत नाही!”

Submitted on 04 May, 2020 at 18:41 PM

“शस्त्र वाटले तरी, हाती फक्त ‘अवजार’ आहे; ‘बळी’ हा क्षणाचा ‘राजा’, अनंतकाळाचा ‘कामगार’ आहे!”

Submitted on 04 May, 2020 at 13:05 PM

“ज्यांना ‘स्व:’विचार नसतात, तेच दुसऱ्यांचेच ‘सु’विचार पुढे पाठवत असतात!”

Submitted on 04 May, 2020 at 13:05 PM

“ज्यांना ‘स्व:’विचार नसतात, तेच दुसऱ्यांचेच ‘सु’विचार पुढे पाठवत असतात!”

Submitted on 03 May, 2020 at 10:36 AM

‘लग्न’ आणि ‘लॉकडाऊन’ यातील मुख्य फरक म्हणज, लॉकडाऊनमध्ये घरात राहणे सुरक्षित असते तर लग्नामध्ये घराबाहेर!

Submitted on 07 Dec, 2019 at 08:40 AM

“देवाने दिलेले सर्व काही आहे; गळणारे केस, वाढलेले पोट आणि अकाली वृद्धत्व. आता आणखी काही नको!” -तुषारकी

Submitted on 05 Dec, 2019 at 01:18 AM

“बहिण भावाचे नाते म्हणजे गोड शेवट असणारा दे मार चित्रपट!”

Submitted on 04 Dec, 2019 at 04:30 AM

“आयुष्यात प्रेम आहे, म्हणून तर आयुष्य आहे!”

Submitted on 04 Dec, 2019 at 04:30 AM

“आयुष्यात प्रेम आहे, म्हणून तर आयुष्य आहे!”

Submitted on 03 Dec, 2019 at 14:05 PM

“कठीण समयी कामास येतो तोच खरा मित्र; मग इतर वेळेस माझ्या सोबत आहेत ते कोण असावेत?”

Submitted on 02 Dec, 2019 at 02:02 AM

“ज्यांच्या शिक्षेतूनही माणूस शिकतो, तो म्हणजे शिक्षक!”

Submitted on 01 Dec, 2019 at 07:51 AM

“कावळ्याच्या घरट्यासारखे आमचे राहणीमान, इथे विचार फक्त घरट्याचा नसतात फुकटचे ‘मान-पान’!” #तुषारकी

Submitted on 29 Nov, 2019 at 23:43 PM

“माझ्या काही आठवणी अशा आहेत.... की सध्या आठवत नाहीत!”

Submitted on 29 Nov, 2019 at 02:12 AM

“फॅक्ट्रीतल्या प्रोडक्टसना नॅचरल हर्बल नाव, केमीकल्सच्य डुप्लीकेट पदार्थांना ओरिजनलचा भाव!”

Submitted on 28 Nov, 2019 at 04:48 AM

“इतिहास बनण्यापेक्षा इतिहास बनवणे योग्य!”

Submitted on 27 Nov, 2019 at 04:51 AM

सुरूवातीला ‘परी हूँ मै’ च्या शोधात असणारे, काही काळानंतर ‘बरी हूँ मैं’ मध्येही समाधानी असतात!

Submitted on 26 Nov, 2019 at 02:04 AM

“ज्येष्ठ हेच श्रेष्ठ असते असे नाही; जो श्रेष्ठ असेल त्यालाही ज्येष्ठत्वाचा मान मिळतो!”

Submitted on 25 Nov, 2019 at 02:08 AM

“सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं; पण पाहणाऱ्याची हीच दृष्टी उघडण्यासाठी ‘फॅशन’ करावी लागते!” #तुषारकी

Submitted on 24 Nov, 2019 at 03:44 AM

”जेव्हा काहीच मिळत नाही, तेव्हा जे काही मिळतं त्याला अनुभव म्हणतात; हाच गुरू आयुष्यभर आपली साथ सोडत नाही.”

Submitted on 23 Nov, 2019 at 09:26 AM

“हजारोंना ‘निराधार’ करून ‘नीरव’ शांततेत जगतात; आणि आम्ही एक सिमकार्ड घेतलं तर हज्जारदा ‘आधार’ मागतात!” #तुषारकी

Submitted on 22 Nov, 2019 at 03:07 AM

“मनातून पार कोलमडून गेलेले असताना, कोणा आपल्याच्या पाठी उभे राहण्यात खरे शौर्य असते!”

Submitted on 22 Nov, 2019 at 03:07 AM

“मनातून पार कोलमडून गेलेले असताना, कोणा आपल्याच्या पाठी उभे राहण्यात खरे शौर्य असते!”

Submitted on 21 Nov, 2019 at 11:18 AM

“कन्यादान म्हणजे हृदय दान!”

Submitted on 20 Nov, 2019 at 06:53 AM

“अव्यक्त होऊनही व्यक्त असतं, तेच खरं प्रेम असतं!”

Submitted on 19 Nov, 2019 at 04:48 AM

“स्त्रीपासून खूप काही शिकता येते; विशेषत; बायकोपासून!”

Submitted on 18 Nov, 2019 at 06:59 AM

“मैत्रीतील ‘नाते’ त्यालाच जपता येते, ज्याच्या नात्यांमधील ‘मैत्री’ टिकून आहे!”

Submitted on 17 Nov, 2019 at 09:28 AM

“मी कोणालाच भीत नाही; असे म्हणायची देखील भिती वाटते!”

Submitted on 16 Nov, 2019 at 00:36 AM

“रयतेचे प्रश्न जाणतो, तो जाणता राजा!”

Submitted on 15 Nov, 2019 at 02:43 AM

“काळ बदलतो; बदलत नाही तो दुष्काळ- कधी ओला तर कधी सुका!”

Submitted on 15 Nov, 2019 at 02:43 AM

“काळ बदलतो; बदलत नाही तो दुष्काळ- कधी ओला तर कधी सुका!”

Submitted on 14 Nov, 2019 at 07:37 AM

“लहानपणीच्या मोठ्या करामती आठवल्या की आपला मोठेपणाही कमी होतो!”

Submitted on 14 Nov, 2019 at 07:37 AM

“लहानपणीच्या मोठ्या करामती आठवल्या की आपला मोठेपणाही कमी होतो!”

Submitted on 12 Nov, 2019 at 09:29 AM

“इथली दगड नी दगड लढलाय स्वराज्यासाठी; आता विचारू नका तुमचे गड-किल्ले का ढासळलेत म्हणून”

Submitted on 11 Nov, 2019 at 04:31 AM

“मातीत राबणारा, शेतात रमणारा शेतकरी हा जगाचा बाप आहे!”

Submitted on 10 Nov, 2019 at 10:29 AM

“आजच्या काळात सर्वांना सतावणारा प्रश्न म्हणजे; उद्याचं काय?”

Submitted on 10 Nov, 2019 at 10:28 AM

“आजच्या काळात सर्वांना सतावणारा प्रश्न म्हणजे; उद्याचं काय?”

Submitted on 09 Nov, 2019 at 03:29 AM

“चांगल्या सहवासात प्रवासही चांगलाच होतो; सहवास चांगला नसेल तर ‘प्रवास’ काय आणि ‘वनवास’ काय दोन्ही सारखेच!”

Submitted on 08 Nov, 2019 at 02:56 AM

“जीवनाच्या रंगभूमीवर व्यक्तींचे रंग नव्हे, तर अंतरंग ओळखून वावरायचे असते!”

Submitted on 07 Nov, 2019 at 07:21 AM

“दु:खाच्या काळ्या ढगांतला पाऊस डोळ्यांतून बरसतो!”

Submitted on 06 Nov, 2019 at 03:39 AM

“फुकट म्हणजे श्रम न करणाऱ्यांना संपवण्याचाच कट!”

Submitted on 05 Nov, 2019 at 06:20 AM

“माती, शेती अन् नात्यांना इंडियात नाही थारा; म्हणूनच म्हणतोय गड्या आपला भारतीय गाव बरा!”

Submitted on 04 Nov, 2019 at 09:04 AM

“जीवनाचा अंतिम उद्देश म्हणजे ‘सत्ता’; बाकी ‘अंतिम सत्य’ वगैरे या अाधुनिक काळातील अंधश्रद्धाच!”

Submitted on 15 Jul, 2019 at 16:26 PM

माझा पुनर्जन्मावर अजिबात विश्वास नाही; मागच्या जन्मीही नव्हता!


Feed

Library

Write

Notification

Profile