'दिलदार' मानल्या जाणाऱ्या लोकांचे 'दार' जेव्हा सामान्यांसाठी उघडे नसते,
तेव्हा त्याचा दिलदारपणा उघडा पडतो!
निराशेच्या काळ्या ढगांआड,
आशेचे किरण
नेहमीच डोकावत असतात
लग्नगाठी सहज जुळतील,
पण संसार लवकर कळत नाही;
बंधने फार वाटतील,
त्यातील प्रेम सहज कळत नाही!
स्वतःची ताकद
ओळखता येणे,
ही काळाची
गरज आहे!
शांत राहणे ही अवघड कला असली, तरी अगदीच अशक्यप्राय नाही!
काहीजणांचा वाढदिवस हा फक्त वय वाढल्याचे सिद्ध करणारा एक दिवस;
बाकी मॅच्युरिटीच्या बाबतीत बोंबच असते!
पक्ष्यांच्या घरट्यासारखे
असावे राहणीमान,
एक काडी तू, एक काडी मी
घर सजवू छान!
आपल्या देशात आनंद देणारे
इतके सण साजरे होतात,
की आपल्या संस्कृतीला
‘सण-कृती’ म्हणावे लागेल!
थंड सावलीप्रमाणे
मित्रांचा सहवास असतो,
एकलकोंड्यांना मात्र
उन्हाचाच हव्यास असतो!