चर्चा सामावते
जीवनाचा अर्थ
चर्चेविना जीवन
आहे व्यर्थ
योगेश खालकर
धाडस करता
जीवनी
होई आनंद
क्षणोक्षणी
बॉलीवूड करमणुकीचे ठिकाण
चंदेरी दुनियेची लखलखती शान
योगेश खालकर
दोस्त असावा असा
दूर राहूनही आठवणीत
राहणारा
पृथ्वी आहे महान
सर्व सजीवांची शान
ठेवा तिचा मान
......योगेश खालकर
चार शब्द प्रेमाचे
उमटले माझ्या ओठी
शब्दच झाली फुले
सखे फक्त तुझ्यासाठी
उतावळ्या माणसांना
नेहमीचं बसतो चटका
विचारी माणसांना
बसतो का कधी फटका?
योगेश खालकर
गुरुमहिमा असे अनादी अनंत
गुरुविण होणे नाही संत नि महंत
आयुष्यातील सर्व गुरूंना समर्पित Thank You
नसावे नाते
कधी सुडाचे
जपावे बंध भावनांचे
योगेश खालकर