जिभेवर नियंत्रण असते म्हणजे आरोग्य कमावणे.
काही प्रश्नांची उत्तरे नसणेहीच अगतिकता आहे.
विचारांची सकारात्मकता ही विवेकानेच
निर्माण करावी लागते. ही साधित अवस्था आहे. धोरण आखून सुसमायोजनाने तयार होते. बाह्य सौंदर्याने नाही.
प्रसन्न मनाला सगळेच चांगले वाटते.
आयुष्यभर दुसऱ्याने आखून
दिलेल्या मार्गावर जेव्हा चालणे
बंद होईल तेव्हाच भारतीय स्त्रिया स्वतंत्र होतील.
दोन प्रेम न करणारी माणसे एकत्र बांधून ठेवल्यामुळे
प्रेम करतीलच असे नाही.
वेळेची किंमत नसणाऱ्याची
आयुष्यात अनेक कामे
करायची राहून जातात.
तोंड उघडले की माणसाचा जीवनातील अनुभव किंवा मुर्खपणा लगेच कळतो.