आयुष्यात दुःख येणं आपल्या हातात नसतं पण त्या दुःखाला कवटाळून न बसता , स्वतःला सावरून त्यातून लवकरात लवकर बाहेर कसं पडता येईल याचा प्रयत्न करणं आपल्या हातात असतं.
शब्दसंगिनी - सौ.वैशाली साळुंखे
प्रत्येक स्त्री ने वडिलांकडून मिळालेल्या ओळखीचा आदर करावा , पती कडुन मिळालेल्या ओळखीचा मान राखावा आणि स्वतः निर्माण केलेल्या ओळखीचा अभिमान बाळगावा.*
✍🏻 सौ वैशाली साळुंखे
रायगड
प्रेमावर बोलू काही
शब्द झालेत अबोल
सारे गुपित जाणण्या
पहा काळजात खोल
✍🏻 वैशाली
आठवणीत राहण्यासाठी
खरच का मरावे लागते ?
जिवंतपणी कदर
येथे का कोणाला नसते ?
✍️वैशाली
केला एकच प्रश्न चंद्राला
तुझ्यात एवढा नूर कसा ?
दाग असुनी तुझ्यावर
तू प्रेयसीसाठी मशहुर कसा ?
✍️वैशाली
पिंपळ पान
तुझ्यामाझ्या प्रेमाचं
जीर्ण झालं पिंपळ पान
काळजात जळतय
तुझ्या आठवांच रान
✍️वैशाली
मागणी एकच त्याच्याकडे
हृदयात थोडी जागा द्यावी
मी आहे त्याचीच राणी
याची त्याला ग्वाही हवी
✍️वैशाली
जिथे भावनांना असतो वाव
तिथे नात्याला नसते नाव
✍️वैशाली
तुझ्या माझ्या नात्याला
सांग काय देशील नाव
न बोलताच कळतात
एकमेकांच्या मनातील भाव