Vijay More

Inspirational


3  

Vijay More

Inspirational


पुन्हा जगायचं....!

पुन्हा जगायचं....!

1 min 1.1K 1 min 1.1K

आज मोहन आणि अनिता.. थकलेल्या मनाने घरात वावरत होते..प्रितेशच्या प्रमोशन मुळे शिल्पा अमोदही आता.. न्युयाॅर्ककर झाले होते..

घरात देखभालीसाठी शंकर.. रमा होत्याच... पण एक आठवडाभर आठवणींचा विषाद घरभर पसरलेला...प्रितेशच्या करिअरसाठी दोघांनीही भरपुर मेहनत केलेली...

पासष्ठी झाली तरी आपण आपल जीवन जगलोच नाही अस वाटतय गं...!मोहनराव पुटपुटले..

अनिताबाई न बोलताच निघून गेल्या..

पाच एक मिनटात मोहनरांवांना व्हाट्सअप आला... *मंदीराच्या कोपऱ्यावर उभी आहे... लवकर ये.. उशीर करु नकोस.. उशीर झाला की आई ओरडते...*

अनिता सरपोतदार... मी हसत हसत जीवन जगण्यासाठी पायात फक्त चप्पल अडकवून बंगल्याबाहेर पडलो....


Rate this content
Log in