Manisha Potdar

Fantasy


3  

Manisha Potdar

Fantasy


प्रेमळ पृथ्वी

प्रेमळ पृथ्वी

2 mins 1.6K 2 mins 1.6K

देव लोकात ब्रम्हदेव त्यांचे काम करत बसले होते. पृथ्वीवर ज्या आत्म्यांना जन्माला पाठवायचे त्यांचे नशीब लिहायचे काम चालू होते. लिहीता लिहीता त्यांना झोप येत होती. बसल्या बसल्या त्यांनी झोप घेतली. तेवढयात काही कोरे कागदाची पाने उलटले गेले आणि ब्रम्हदेव डोळे उघडताच शाई लेखनीने लिहु लागले. ब्रम्हदेवांना त्यांची चुक नंतर लक्षात आली त्यांना चिंता वाटु लागली. काही आत्मे आता बिननशिबाचे पृथ्वीवर जन्माला येतील. ही चिंता त्यांनी नारदमुनिंना सांगितली. नारदमुनी म्हणाले पिताश्री चिंता करु नका मी पृथ्वीवर जातो आणि त्या बिननशिबाच्या आत्म्यांची नाशिब लिहुन येतो. 

     नारदमुनी पृथ्वीवर उतरले .ते नेमके अंधशाळेजवळच उतरले. त्या मुलांना बघुन, त्यांची शाळा बघुन आश्चर्य वाटले. त्यांची हुशारी बघुन चक्कीत झाले. एक ज्ञानेंद्रिय नसले तरी एवढी हुशारी .नारदांनी गतीमंद, मतीमंद मुलांकडे मोर्चा वळवला. त्यांच्यात बिन नाशिबाची मुले आहेत का हे शोधु लागले पण छोटे छोटे बाळांना त्यांचे आईवडील किती उत्तम पध्दतीने सांभाळतात त्यांच्या डोळयांचे पारणे फीटले. ते स्वतःशी म्हणाले स्वर्गात सुखच सुख आहे परंतु पृथ्वीवर प्रत्येक अडचणीवर उपाय आले. प्रत्येक अडचणीवर माणूस मात करत आहे. माणसांचे कृत्रिम अवयव लावून उत्तम जीवन जगण्याचा प्रयत्न पाहुन भारावून गेले. पृथ्वीवर सर्वीकडे फिरून झाल्यावर स्वर्गात आले आणि ब्रम्हदेवांना म्हणतात पिताश्री आपण काळजी करू नका . तुम्ही जरी नाशिब लिहायचे विसरले तरी काही फरक पडत नाही. पृथ्वीवर सर्व प्रकारच्या कार्यशाळा कार्यरत आहे. गतीमंद ,मुकबधीर मतीमंद,अपंग ,अंध, मुलेमुली उत्तम कार्यक्षम बनत आहे. त्यांना स्वावलंबी बनवले जात आहे . त्यांचे नाशिब तेच घडवत आहे. पिताश्री "तुम्ही तुमचे कागद, शाई वाया घालवू नये. फक्त आत्मा पृथ्वीवर पाठवा पृथ्वीवर विज्ञानयुग आले आहे. तेवढयाच पटीने मंदीरे वाढले आले. सर्व धर्माच्या लोकांना देवाचे वेड लागले आले. आपण आता निवांत स्वर्गात राहायचे. फक्त करमणुक करायची असेल तर किर्तन ऐकायला पृथ्वीवर जायचे आता मला पण अप्सरांचे नृत्य बघुन कंटाळा आला आहे.

पृथ्वीवर जे प्रेम ,जिव्हाळा आहे ते स्वर्गात नाही.


Rate this content
Originality
Flow
Language
Cover Design