Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Mina Shelke

Tragedy

2.5  

Mina Shelke

Tragedy

परवड आयुष्याची

परवड आयुष्याची

4 mins
22.9K


तिच्या आयुष्याची परवड थांबता थांबत नाही .... प्रत्येक वेळी प्रत्येक नात्यात गृहीत धरले जाते . अपेक्षांचे अनामुष ओझे सतत मानगुटीवर भूत बनून बसलेले. पाठचे ,पोटचे ,रक्ताची सर्व नात्याची कदर ,आदर, भावनिक होऊन जपायची , .... विश्वास ठेऊन कर्तव्य बजावत राहते... पण प्रत्येक वेळी मतलब साधून गैरफायदा घेतला जायचा , समजत होते तीला ....क्षमा आणि दयाशील स्वभाव हाच तिचा विक पाँइंट होता. कधी कधी कठोर व्हायची स्वतःला अलिप्त करायची भावबंधनातून नाही अडकायचे नाही गुंतायचे मनाला बजावून सांगायची ...ऐनवेळी तेही गद्दारी करुन पुन्हा मायेच्या जाळ्यात अडकवायचे ....कुणाच्या दुःख वेदना सहन नाही व्हायच्या कारण परमेश्वराने तिला निरपेक्ष सद्हृदय दान करून वचनबद्ध केलेले , त्याला एकांतात जाब विचारायची तू चांगुलपणा दिलास पण जाणीव ठेवणारे अवतीभोवती का नाही दिलेस दरवेळी माझाच कोंडमारा का करतोस ,,,का हतबल करतोस ,का बळ देतोस ,का फसवले जाणार हे कळूनही कृती आणि कर्म करायला भाग पाडतोस तुझ्यावरचा विश्वास उडावा इतक वास्तव समोर ऊभे करतोस !

ती एक पत्नी म्हणून हरते ,...आई म्हणून हरते , स्री म्हणून हरते पण एक माणूस म्हणून जिंकलेली असते . कारण दोन टोकाच्या विचारांची दोरीला तिच्या समंजस आणि जबाबदारीची जाणीव ,कर्तव्य , कष्ट यांची भरभक्कम जोड असते ....समर्पणाची भावना ओतप्रोत नसानसात भरलेली स्व अस्तित्व विसरून संपूर्ण जीवन हसतहसत पणाला लावणारी खरी दानशूर आणि निस्वार्थी.

आईपण निभावताना कनवाळू मायाळू , अगतिक होते. दुधाच्या धारेत भिजलेला पदर शेवटपर्यंत ओलाच असतो . जेव्हा जेव्हा फायद्यापुरते का होईना पदराचा आसरा घेतला जातो तेव्हा तेव्हा गारवाचं मिळणार... कारण जन्मदात्रीच ती हृदयी फक्त आणि फक्त वात्सल्य वसलेल... ते डोळस असूनही आधंळ असते ना ,...

नाही थांबणार शेवटपर्यंत तिची परवड ती विश्वास ठेवतच राहणार घात होणार माहिती असूनही... ती क्षमाशील राहणारच पुन्हा गुन्हा घडणार हे माहिती असूनही ... ती प्रेम ,माया करतचं राहणार बदल्यात मनस्तापशिवाय काहीच मिळणार नाही हे समजत असूनही ... कितीही फरपट झाली आयुष्याची तरी ती सोशिकतेची सीमा पार करणार नाही .... कारण ती एक खंबीर स्री आहे .

कणखर , सोशिक क्षमाशील ,समजूतदार , भावनिक , समंजस , माणसातलं माणूस जपणारे मन फक्त तिच्याकडे आहे म्हणून घरपण आणि कुटुंबव्यवस्था टिकून आहे . आणि कुठेतरी माणुसपण .

कितीही खेळू दे नियतीने डाव

कणखर स्री माझी झेलते घाव

कोसळते ,पुन्हा नव्याने उभारते

प्रत्येकासी देते सुखाचा गाव


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy