Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Ashvini Duragkar

Tragedy

4.4  

Ashvini Duragkar

Tragedy

नैना अश्क़ ना हो...

नैना अश्क़ ना हो...

5 mins
1.7K


   आज दहा महिन्यांनी तो परत येणार. अक्ख़ी रात्र तिची कड बदलुन बदलुन विस्तरली. ती पहाटेच उठली. अंगण रांगोळीने माखले. दाराला तोरण लावले. घरभर रंगीबिरंगी फुलांचा सडा बहरला. कान्या कोपऱ्यातील फ्लावर वाॅस्क फुलांनी सजले. जणु दसरा दिवाळीच आली की काय. पहाटेच देवाला सांगड घातली. घरभर उदबत्तीचा सुगंध दरवळला. निशिगंधाच्या सुवासाने त्यात आल्हाद्दायक भर घातली. घर स्वर्गासारख चहकत होत. 

“अगदीच ये मौसम का जादु है मितवा”... ची फिलींग तिला येत होती. गालातल्या गालात मन मोळयाची कळी हळुहळु खुलत होती. 

त्याला आवडणारा चमचमीत स्वयंपाक तयार होता. मधुचंद्राला त्याने गिफ़्ट केलेली त्याची आवडती लाल रंगाची साडी तिने नेसली. तिची गोरी काया आणि सळपातळ कमर त्या लाल रंगाने अजुनच बहरली. कमरे खाली विळखा घालणारे लांब गोल्डन केस मोकळेच ठेवले. गोल टपोऱ्या डोळयांना काजळाने समृद्ध केले. मॅचींग बांगड्या घातल्या. सगळा साज शृंगार करुन ती त्याच्या आगमणाच्या प्रतीक्षेत होती. १० वाजता तो पोहोचणार होता. एवढ्या दिवसानंतर त्याला भेटण्याची हुरहुर... घरालाही लागली होती. एरवी पंख लावुन पळणारा वेळ आज आळसाने निजला होता. कटता कटेना क्षण क्षण जड जात होता.

     काट्याला काटा भिडला तशी डोअर बेल वाजली. तशीच ती सुटली सोसाट्याच्या वाऱ्याप्रमाणे. दार उघडताच एक थंडगार झुळूक तिला शहारुन गेली तो स्पर्श त्याचाच होता पण तो नव्हताच तिथे. ती ईकडे तिकडे त्याला शोधु लागली. दुरवर नजर फिरवुन बघीतल पण तो आलाच नव्हता. तिचा हिरमोड झाला. चेहरा तिथेच पडला. दार ओढुन आत जायला निघालीस तो त्याने हात आडवा केला. ती तशीच पलटली. तिच्या गालावरची कळी चटकण खुलली. तो उभा होता अगदी तिच्या मागेच. कमरेला विळखा देत त्याने तिला घट्ट मिठीत घेतल.तिचा आनंद गगणात मावेना. तिने त्याच्या कपाळावर ओठ माखवले. तिला तसच कवेत उचलुन तो आत घेवुन गेला. घरभर दरवळलेल्या सुगंधाने तो मिश्किल झाला. 

“अरे पण तुझ्या बॅग्स?”

“सोड ग! मी आलो ना.”

“अरे पण तीन बॅग्स होत्या ना निघते वेळी तुझ्याजवळ?”

“अग बच्चु किती प्रश्न विचारतेस.”

   तिच्या ओठांवर ओठ चाखवत त्याने तिच्या प्रश्नांना पुर्ण विराम लावला. एवढ्या दिवसानंतर झालेल्या स्पर्शाने ती शहारली. खिश्यातन डायमंडचा नेकलेस काढुन तिच्या गळयात घातला. तिच्या चेहऱ्यावरची लाली अजुनच बहरली. त्याच्या केसात हात घालुन मान तिरपी केली. गोऱ्या गोमट्या शरीरावर त्याने विळखत चाव घेतली. जास्वांदाच्या पाकळीवर पडलेल्या दवबिंदु प्रमाणे तिच पोट सरसरत होत. सहा महिन्याच्या विरहानंतर स्पर्शाने मोहरलेल्या क्षणात प्रणयाचा आनंद घेतल्यानंतर तो फ़्रेश व्हायला गेला. तिने त्याच्या आवडीचे पदार्थ वाढुन ताट आणल. दोघांनी जेवणाचा आस्वद घेतला. जेवन करुन दोघेही बेडवर पडले. त्याच्या उजव्या खाद्यावर तिने मान ठेवली. स्वर्गाची अनुभूति देणारा तो क्षण होता. एवढ्या दिवसांच्या जुन्या आठवणींच्या गोष्टी रमल्या. तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला. त्याच्या कुशीत असल्याने तिने दुर्लक्ष केल. मोबाईल परत वाजला पण ती रिंगटोन नेहमीची नव्हती मात्र ओळखीची नक्कीच होती. ती त्याच्यासाठी ची होती.         

    ” क्यूकी तुम ही हो... जिंदगी अब तुम ही हो”... परत सेम रिंगटोण वाजली. ती लागलीच बेडवरन उठली आणि हाॅलमध्ये ठेवलेल्या मोबाईलकडे वळली. मोबाईल हाती घेतला. त्याचीच रिंगटोण होती. नाव ही तेच... “prince”... होsssssss हा त्याचाच फोन. “पण हा मला घरातल्या घरात फोन का करतोय? अग बाई मोबाईल हरवला तर नाही ना?”, ती धावत खोलीत गेली.

  बघते तर तो नव्हताच खोलीत. ती त्याला आवाज देवु लागली पण प्रतिसाद शून्य होता. तिच रिंगटोण परत वाजली. तिला वाटल तो गंमत करतोय. तिने लागलीच फोन उचलला. 

“हेल्लो”...

                    “Mrs दिक्षित”.

“हो मीच”.(हृदय झोकाने धडकु लागल.)

              “Sorry to inform you सकाळी झालेल्या आतंकवादी हल्यात सर शहिद झाले”


“ओ दादा कसली वाहयात मजाक कराताय. माझा नवरा आता पर्यतं सोबत होता माझ्या”.


एवढ बोलुन तिने फोन कट केला अन घरभर शोधु लागली. त्याला मोठया मोठ्याने हाक मारु लागली. “अहोsssssss अहोssssss” पण तो कुठेच नव्हता. ती अनवाणी पायाने दुरवर गेली त्याच्या शोधात पण तो भेटलाच नाही. आगमुश्या रडत ती घरी परतली आणि खोलीत गेली तर ज्या जागेवर तो झोपला होता तेथे मोर पिस होत. ते मोरपीस आठवीत असतांनी तिने त्याला दिल होत. मोरपीस काळजाला लावुन ती मोठ्याने रडु लागली.. थरथरत्या हाताने तिने लगेच टी॰वी॰ लावली. त्यात हल्याचीच बातमी सुरु होती

   तिच्या पायाखालची जमिनच ढासळली. तो जातांनी ते मोरपीस घेवुन जायचा सोबत.. आणि आला कि त्याच्या डायरीत ठेवायचा. सगळे तार जुळत गेले. हृदयाचा ठोका वेगाने पळु लागला.सरसर डोळयांना धारा लागल्या. घालवलेले सगळेच क्षण चुटकी सरशी डोळयांसमोर आले. तिच दार उघडन दुरवर नजर फिरवुनही तो न दिसण आणि मग अचानक त्याच तिच्या पुढ़े येण, त्यात सोबत बॅग न आणताच येण. सगळच संशयासपद होत.

   सगळ क्षणात उधवस्त झाल्यासारख वाटल. पण त्याने त्याच प्राॅमिस मात्र पुर्ण केल. आठवीपासनच दोघांच प्रेम. दोघेही अनाथ. एकाच आश्रमात वाढलेले. आर्मी ऑफिसर व्हायच त्याच बालपणीच स्वप्न आणि ज़िद्दीने तो झाला ही. त्याच्या धैयाच्या व कर्तव्या पुढे ती कधीच आली नाही. लग्नानंतरच्या कित्येक रात्र तिने रडुन काढल्या , उपाशी झोपुन काढल्या, आठवणीत त्याच्या अश्रु गाळुन काढल्या पण आपल्या प्रेमाला तिने कमजोर पडु दिले नाही. देशप्रेम त्याच्या रक्तात भिनल होत. त्याच्या आणि देशाच्या प्रेमा आड तिला तिच प्रेम येवु द्यायच नव्हत. ती अनाथ तिच सगळ काही तोच. अगदी लहानपणापासन अनाथआश्रमात तिने त्याच्यात देव शोधला होता. दोघांच एकामेकावर जीवापाड प्रेम. .तो नेहमी एकच बोलायच “ आईचा चेहरा तर बघीतला नाही ही भारत माताच माझी आई. तिच्यासाठीच मी माझ आयुष्य वाहेल. पण ऐ बच्चु तिरंग्यात लपेटुन यायच्या आधी तुला प्रेमात नक्कीच रंगवुन जाईल.”

त्याच भाष्य ऎकल्यानंतर ती ढसाढसा रडायची अन् तो तिचा एक अश्रु मोतीप्रमाणे मुठीत जपायचा... “मी सदैव राहील तुझ्या हृदयात” म्हणून घट्ट मिठीत घ्यायचा... 


ओ यूँ ना लम्हा लम्हा मेरी याद में

होके तन्हा तन्हा मेरे बाद में

नैना अश्क़ ना हो

माना कल से होंगे हम दूर

नैना अश्क़ ना हो, नैना अश्क़ ना हो....

मैं ना लौटा आने वाले साल जो

मेरी वर्दी बोले मेरा हाल तो

नैना अश्क़ ना हो

ये समझना, मैं हूँ मजबूर

नैना अश्क़ ना हो, नैना अश्क़ ना हो....


       एक एक क्षण आठवुन तिला गहीवरुन येत होत. त्या मातेच्या पुत्राने आज दोन्ही नात्यांचा मान राखला होता. शहीद होवुन मातेच रक्ताशी असलेल नात जपल होत आणि गेल्यानंतरही बायकोला अंतिम भेट देवुन प्रेमाचा मान राखला होता.

      थोडयाच वेळात त्यांच्या घरापुढे लोकांची मांदियाळी लागली आणि मग तिरंग्यात माखुन तो आला तिला अंतिम भेट दयायला. आरडा ओरडा रडत तिने त्याला काळजाला लावल आणि “भारत माता की जय”चा गळगळाट करत त्याला तिने सोपवुन दिल. त्याच प्रेम अमर होत या भारत मातेसाठी आणि बायकोसाठी ही... 

    


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy