Navanath Repe

Inspirational


4  

Navanath Repe

Inspirational


महिलांच्या आंतरिक गुणांचा

महिलांच्या आंतरिक गुणांचा

4 mins 1.4K 4 mins 1.4K

स्त्री ही मराठ्यांच्या मंदिरातली देवता आहे असे छ. शिवाजी महाराज म्हणत. त्या महीलांचा आज जागतिक दिवस हा मोठ्या उत्सहात संपन्न होतो हा स्त्री स्वातंत्र्याचा विजयच आहे.

तथागत गौतम बुध्दांची आई महामाया यांनी गौतम बुध्दांवर चांगले संस्कार केले त्यामुळे जगाने बौध्दांचे विचार स्विकारले. छ. शिवरायांना ही दोनच गुरू होते एक त्यांची आई जिजाऊ व दुसरे गुरू त्यांचे वडील शहाजी महाराज तर छ. शिवरायांना आध्यात्माची प्रेरणा देणारे जगतगुरु तुकोबाराय यांच्या व्यतिरिक्त शिवचरित्रात शिवरांयाचा गुरू म्हणून कोणाचाही उल्लेख सापडत नाही.

छ. शिवरायांना घडवण्यामागे त्यांच्या आई जिजाऊ यांचा सिंहाचा वाटा आहे. तर महात्मा जोतिबा फुले यांच्या पत्नी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी मनुवादी त्रासाला न जुमानता बहूजनांच्या मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे महान कार्य केले. त्यांच्या प्रेरणेतून फातीमाबी , मुक्ता साळवे, तानुबाई बिरजे व

ताराबाई शिंदे या महिला घडल्या पण हे बहुतांशी जणांना अपरिचित नावे आहेत. त्यांतील ताराबाई शिंदे यांनी 'स्त्री - पुरूष' तुलना हे पुस्तक १८८२ मध्ये प्रकाशित केले. त्याबद्दल त्यांचा महात्मा फुलेंनी गौरवही केला होता. त्यांचा तो बत्तीस पानांचा शोधनिबंध आज 'स्त्री अत्याचाराबाबतचा जगातील पहिला ग्रंथ' ठरला.

मनुस्मृतीमध्ये महिलांना शुद्र व उच्च निचतेची वागणूक तसेच स्त्री ही फक्त उपभोगाची आणि चैनीची वस्तू म्हणत होती ती मनुस्मृती डाँ.बाबासाहेबांनी आंबेडकरांनी रायगडाच्या पायथ्याशी जाळून तिची राख केली व दोन वर्ष अकरा महिने आठरा दिवस रात्रंदिवस संविधान लिहून या देशातील मनुवादी वर्णव्यवस्थेला सुरूंग लावण्याचे महान कार्य केले. याविषयी तुकडोजी महाराज म्हणतात, कोणी भोग वस्तू समजोनि भली ! सजवोनि ठेविली नुसती बाहुली ! त्याने घरोघरी शिरला कली ! अबला बनली मायभूमी !!

बहूजनांतील महाषुरूषांना घडवण्यामागे त्यांची आई या महिलांचेच मोलाचे कार्य आहे. घरातील महिलांच्या शिकवणीममुळे जर एवढी क्रांती घडत असेल तर मग आज आमच्या घरातील महिला आपल्या मुलांना कोणती शिकवण देते हा प्रश्न पडतो. याविषयी तुकडोजी महाराज म्हणतात , स्त्रीलाच भक्ती स्त्रीलाच ज्ञान ! तिलाच संयम, शहाणपण ! तिच्यानेच हालती वाटे संपूर्ण ! संसारचक्रे !!

आज मात्र बहुजनांच्या महिलांना गुलाम बनवण्याचे षडयंत्र केल जातय कारण स्त्री गुलाम झाली की मुले गुलाम होतात व मुले गुलाम झाले की राष्ट्र गुलाम होते.

दक्षिणेतलं शबरीमला सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल देताना सरन्यायाधीस दीपक मिश्रा यांनी स्पष्ट केल होत की, श्रध्देच्या नावावर कुणाशीही लिंगभेद केला जाऊ शकत नाही. सर्वाना समानतेनं वागणूक देणं हे कायदा आणि समाजाच काम आहे. तर न्यायाधीश इंदू मल्होत्रा या म्हणाल्या की, या निर्णयाचा दूरगामी परिणाम होईल. धार्मिक परंपरामध्ये कोर्टानं हस्तक्षेप करू नये. एखाद्याच्या एखाद्या धार्मिक प्रथेवर विश्वास असेल तर त्याचा सन्मान व्हावा; या प्रथांना संविधानाचं संरक्षण आहे. एका महिला न्यायाधिशानं असं मतं नोंदवावं, यावरून अजूनही महिलांवर धार्मिक परंपराचा किती पगडा आहे हे स्पष्ट होत. याविषयी तुकडोजी महाराज म्हणतात, म्हणती स्त्री ही गुलामची असते ! तिला हक्क नाहीत उद्धारायापुरते ! हे म्हणणे शोभेना शहाण्याते ! स्वार्थाधतेचे !!

आज जर एक युवती श्रध्देनं देवाच्या दर्शनासाठी येते आणि तिच्या तिथं जाण्याने मंदिरात विटाळ होतो, म्हणून ते मंदीर दुधांन धुतलं जातं. दूध देणारी गाय, म्हैस ही मादी आहे, मग तिच्याच दुधानं ते मंदिर पवित्र होतं, तर माणसांच्या स्पर्शान अपवित्र कसं ? ज्याठिकाणी न्यायालयाने निर्णय देऊन पण महिलांना प्रवेश व समानतेची वागणूक मिळत नसेल तर मग त्यासाठी एवढा खटाटोप का करायचा हे आता सर्व महिलांनी व त्यांच्या कुटुंबातील तरुणींनी व तरूणांनी समजून त्या मंदिर व मंदिरप्रवेशाकडे कानाडोळा करून आपले शिक्षण , व्यवसायाच्या माध्यमातून प्रगतीच्या शिखरावर जाणे योग्यच ठरेल. याविषयी डाँ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात " स्त्रीयांच्या प्रगातीवरच समाजाची प्रगती अवलंबून आहे. तर तुकडोजी महाराज म्हणतात की, महिलांचे उच्चतम शिक्षण ! शिक्षणात असावे जीवनाचे स्थान ! जीवनात असावे स्वारस्य पुर्ण ! शांति, दयादि भावनांचे !!

मात्र महिलांना वाटते की देवाची श्रध्दा, पुजा करावी पण श्रध्देचे स्वरूप केवळ ईश्वर अगर देव समर्पित होऊन गेले.

"सावित्रीच्या लेकी खुप खुप शिकल्या !

नोकरीला लागल्या, पण परंपरा सोडवत नाही,

चतुर्थीच्या दिवशी चंद्र उगवल्याशिवाय जेवत नाही !!"

याविषयी सुप्रसिध्द विचारवंत बट्रारड रसेल म्हणतात "देव , धर्म व्रतवैकल्य हे स्त्रीमुक्तीच्या मार्गातील अडथळे आहेत."

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता त्र्यंबकेश्वर , शनी मंदिर आणि हाजी अली दर्गा यामध्ये महीलांना मंदिरात प्रवेश मिळावा हा चांगला निर्णय आहे त्याचे स्वागतच करायला हवे मात्र मंदिरप्रवेशांने महिलांचे सर्वच प्रश्न मार्गि लागणार आहेत का ?

स्त्रियांना शिक्षणघेण्याचा अधिकार हा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी दिला, तो कुठल्याही देवी देवतांनी नाही. म्हणून शिक्षणाची देवता सरस्वती नसून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आहेत. याविषयी तुकडोजी महाराज म्हणतात -

"महिलांच्या आंतरिक गुणांचा विकास ! करील ऐसे शिक्षण खास !

जरी दिले जाईल त्यास ! तरीच भावी जग पालटे !!

आजच्या महिलांनी माँसाहेब जिजाऊ, आहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, माता रमाई , ताराबाई शिंदे , ताणुबाई बिरजे, मुक्ता साळवे या साखळीतील एक जरी महिला पुर्णपणे समजून घेतली तर आमच्या घरातील महीला देवळांतील देवांच्या नादी लागणार नाहीत. पण केव्हा समजून घेणार आहेत आमच्या घरातील महीला हाच प्रश्न पडतो.

"मुलीने सदा लपोनि राहावे ! मुलाने गावी रागरंग पहावे ! ऐसे हे दृष्ट रिवाज ठेवावे ! न वाटती आम्हा !!"


Rate this content
Log in