Tejashree Pawar

Romance


4  

Tejashree Pawar

Romance


वेळ चुकली ( भाग ३)

वेळ चुकली ( भाग ३)

3 mins 16.1K 3 mins 16.1K

कॉलेज संपले आणि वाटा वेगवेगळ्या झाल्या. दोघांनाही पुढे शिकायचे होते. त्यादृष्टीने प्रयत्न सुरु झाले. थोडे दिवस कॉलेज च्या आठवणींत गेले आणि मग नव्या आयुष्याला सुरवात झाली. नवे जग,नवे लोक आणि हवं ते सगळंच मिळालं होतं. पण कसलीतरी कमी जाणवत होती. काय, ते हेरायला जरा वेळ लागला. त्या नव्या जगात सर्वकाही होते फक्त 'ती ' सोडून. तिची कमी प्रत्येक क्षणाला जाणवू लागली. तिने यामागे केलेल्या प्रत्येक गोष्टीचे महत्व कळू लागले. आपण तिला कायमच गृहीत धरले , हे जाणवू लागले. आपल्या जीवनाचा ती एक अविभाज्य भाग होती, हे कुठेतरी जाणवून गेले. दिवसरात्र मन तिच्याच आठवणीत रमू लागले. अधून मधून मेसेज वर विचारपूस होत असे, पण त्याने समाधान होत नसे. चुकून कधी फोन वर बोलणे झाले तर तेही थोडक्यात उरकत असे. मनात हुरहूर मात्र राहून जाई.

हे सर्व तिला सांगून टाकावे आणि मोकळे व्हावे, अगदी नेहमीसारखेच, असे वाटे; पण हिम्मत होत नसे. असलेले मैत्रीचेही नाते गमावण्याची भीती वाटे. पण त्यापेक्षा तिला गमावण्याची भीती अधिक तीव्र असे. तिला सांगायचे तर होते; फक्त योग्य वेळेची वाट पाहून. शिक्षण संपवावे, चांगल्या नोकरी शोधावी आणि तिला सरळ लग्नाचीच मागणी घालावी इथपर्यंत तयारी झाली. तोपर्यंत आहे ती मैत्री अशीच तुकवून ठेवावी, असे ठरवले होते. फक्त अजून एक वर्ष वाट पाहायची होती. कॉलेजातही आता मन रामू लागले. तिच्या आठवणीत एक एक दिवस निघत होता. ती आपली होणार ह्या भावनेनेच मन सुखावून जात असे. तिच्यासोबतच्या पूर्ण आयुष्याची स्वप्ने रंगवून झाली होती. येणाऱ्या प्रत्येक दिवस आपल्याला तिच्या जवळ नेत आहे, असे वाटे. कॉलेज संपले आणि नोकरीही मिळाली. सर्वकाही आता हातात येत असल्याचे जाणवत होते. आता मात्र एक क्षणही गमवायचा नव्हता. तिला नोकरीही बातमी द्यायची होती. पण एका मागणीसोबत. तिला भेटूनच सांगायचे ठरले. त्या फक्त विचारानेच मन फुलून गेले आणि तेवढ्यात मोबाइलचा आवाज आला. तिचा मेसेज होता. लगेच बघितला आणि क्षणभर तो थक्कच झाला. हात थरथरले अन डोळ्यातून आसवे दाटले. समोर जे काही होते त्यावर विश्वास बसत नव्हता. जिला आज मागणी घालायची होती तिच्याच लग्नाचे निमंत्रण हातात होते. नियतीने आपल्या प्रकारे खेळ खेळाला होता. त्याच्यावर आभाळ कोसळले!!! सगळ्या स्वप्नांची माती झाली. क्षणात सगळेच शून्य झाले. थोड्या वेळेपूर्वीच जिंकलेले जग अचानक लुप्त झाले. रडू कोसळले, जीवाचा आकांत झाला, आक्रोश करण्याची इचछा झाली पण तो स्तब्धच होता. तिच्या मेसेजला उत्तर दिले नाही, तिने कारणही विचारले नाही. दोन दिवसांनी व्हाट्सअँपवर टाकलेल्या स्टेटसवरून काय समजायचे ते ती समजून गेली. तिने फक्त एकच प्रश्न विचारला. इतका उशीर का ? 'भविष्याची तयारी करता करता वर्तमानाला विसरून गेलो', त्याने उत्तर दिले.

तिने सत्य केव्हाच स्वीकारले होते. त्यामुळे त्रास झाला, पण मर्यादित. त्याला मात्र सावरायला वेळ लागला. एक मित्र म्हणून लग्नाला जायचे ठरवले. तिला एकदा शेवटचे पाहायचे होते... डोळे भरून ...दुसऱ्या कोणाची होण्याआधी ...लग्नाचा दिवस उजाडला आणि समारंभाला सुरवातही झाली. तिचे डोळे मात्र पूर्णवेळ वाटेकडे होते. तो येणार असे मन सांगत होते, आणि तितक्यात समोरून येणारी त्याची ती मूर्ती दिसली. खूप दिवसांनी एकमेकांना भेटत होते अन तेही ह्या अश्या प्रसंगी. तो आला, तिच्यासाठी आणलेला गुलाबांचा गुच्छ 'त्या दोघांच्या' हाती दिला, तिला पुढच्या आयुष्याच्या शुभेछया दिल्या आणि क्षणात चालताही झाला. ती मात्र स्तब्ध होती. निशब्द . तो आला आणि गेलाही. ती त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिली.

प्रेम तिनेही केले, प्रेम त्यानेही केले. फक्त वेळ चुकली. आणि याची जाणीव जेव्हा दोघांनाही झाली तेव्हा मात्र एल निघून गेली होती. तिच्यापुढे नवे आयुष्य होते आणि त्याच्याकडे तिच्या आठवणी !!!!


Rate this content
Log in