Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Gauri Ekbote

Drama Romance Others

4.6  

Gauri Ekbote

Drama Romance Others

एकत्र विभक्त फॅमिली

एकत्र विभक्त फॅमिली

4 mins
1.6K


ही गोष्ट सुरु होते ती राघव आणि सीमा च्या कॉलेज ऍडमिशन पासून..राघव हुशार पण कमी बोलणारा, आणि सीमा हुशार, सुंदर आणि बडबडी . MBA ऍडमिशन च्या वेळेस ते दोघे भेटले . राघव एक वर्ष सिनिअर होता  आणि सीमाची आणि त्याची, सीमाच्या मावस बहिणीच्या शेजारी राहतो एवढी ओळख पण होती . सीमा ऍडमिशन साठी  कॉलेजला आलेली असताना राघवला ती दिसली . म्हणून तो बोलायला गेला आणि प्रोसेस साठीतिला मदत केली .

पुढे ते रोज काहीतरी कारणामुळे भेटत राहिले आणि हळू हळू मैत्री वाढत गेली. राघव तिला अभ्यासात मदत करतअसे . पुढे राघव कॅम्पस interview  मध्ये सिलेक्ट होऊन चांगल्या कंपनी मध्ये जॉब ला रुजू झाला , सीमाच एकवर्ष अजून होत .

राघव बँगलोर ला आणि सीमा पुण्यात तरी ते contact  मध्ये होते,  रोज बोलणं व्हायचं , राघव ऑफिस मधल्यासगळ्या गोष्टी तिला सांगायचं आणि ती सुद्धा कॉलेज मधली धम्माल share  करायची .

एकदा राघव रोजच्या ठरल्या प्रमाणे सीमाला कॉल करत होता पण काही केल्या बोलणं होऊ शकत नव्हतं. कधी कॉल ड्रॉप तर कधी range issue. ती संबंध रात्र तो तिच्या फोन ची वाट बघत होता,,,,, इकडे सीमाच ही तसाच होत होत ......

असं एक नाही दोन नाही तर तीन दिवस सतत .... राघव जास्त बेचेन झाला तिच्याशी न बोलता आल्यामुळे त्याला उदास वाटू लागला दिवस जाता  जात नव्हता आणि रात्री फोन लागता लागत नव्हता .. राघव स्वतः वरचचिडचिड करायला लागला , आपल्याला असं का होतंय ह्याचा जेव्हा त्याने विचार केला तेव्हा गणित उमगलं आणि शनिवार रविवार सुट्टी सरळ पुणे गाठून सिमला बोलून टाकायचं त्याने ठरवलं .

इकडे सीमाच हि तसंच झालं होत , तिनेही त्याला भेटल्यावर मनातलं विचारायचं ठरवलं पण परीक्षा असल्याने ती परत अभ्यासाकडे वळली .

राघवला शनिवार कधी येतोय असं झालं होत . शुक्रवारी रात्रीच त्याने निघायचं ठरवलं , शुक्रवारी कसातरी दिवस ढकलत तो थेट विमानतळावरच पोहोचला आणि तिकीट आधीच बुक होत . शनिवारी सकाळी सकाळी राघव सीमाच्या हॉस्टेल बाहेर येऊन तिला खाली बोलावलं इतक्या सकाळी ते हि ५:३० ला राघव इथे .... थोडी घाबरत आणि खूप साऱ्या आनंदाने ती तशीच उठून पळत खाली अली आणि त्याला घट्ट मिठीच मारली ,,, खूप दिवस झाले ति दोघे बोलली च नव्हती .... थोडावेळ तसेच थांबून राघवने हळूच मागे लपवलेला रेड rose सीमाला देऊन पायावर बसून प्रपोस केलं .... सीमा साठी हे सगळं खुप मस्त , परिकथे सारखं होत. तिने लगेच कुठलाही विलंब न करता ते accept केलं . दोघे हि जाम खुश होते ... एकमेकांना त्यांना सोडावस वाटतच नव्हतं .

आपण संध्याकाळी कॉफी शॉप मध्ये भेटू असं ठरवून राघव त्याच्या घरी आणि सीमा रूम वर गेली , आणि असेच मजेत चाललं होत .. सीमाच्या परीक्षा पण झाल्या ती first class मध्ये पास झाली आणि सीमालाही छान जॉब लागला . सगळं कस सुरळीत चाललं होत .... राघवच्या आई वडिलांनी रीतसर सीमाच्या आईवडिलांना भेटून सगळं सांगितलं आणि ते हि लग्नासाठी तयार झाले .

सीमा आणि राघवच लग्न झालं .

राघव घरात लहान त्याला एक मोठा भाऊ. त्याचंही लग्न झालेल, तो बेंगलोर  आणि बायको housewife म्हणून ती घरी पुण्यात राहायची . सीमाचा जॉब नवीनच असल्यामुळे लग्न झाल्यावर १५ दिवसातच  राघव आणि सीमा फिरायला न जाता ऑफिस जॉईन झाले . आता ते तिघे एकत्र राहायचे . सीमा , राघव आणि दादा (राघवचा मोठा भाऊ ),  आई वडिलांची लाडकी, लाडात वाढलेली पण कुठलाही लाडावलेपणा नसलेली होती सीमा . माहेरची परिस्थिती सुखावह होती आई शिक्षका  आणि वडील सरकारी नौकरी . त्यामुळे सर्व मागेल ते मिळतहोत , आईची शिस्त पण होती घराला शेवटी शिक्षिकेचं घर ते, त्यामुळे सीमा जरी बाहेर राहत होती तरी स्वयंपाक ती छान करायची .

सकाळी तिघांचा डबा , चहा , ब्रेकफास्ट सगळं आवरून सीमा ऑफिस जायची , परत संध्याकाळी गरम गरम काहीतरी करायची त्यामुळे घरचं आणि छान खायला मिळत म्हणून राघव आणि त्याचा दादा जाम खुश होते .

असे छान खुशीत आनंदात दोन वर्ष संपली ,

मधून मधून ती लोक पुण्याला जायची आणि परत ऑफिस .. ह्या मध्ये राघवच्या वहिनीला सीमाचा खूप हेवा वाटायचा  नवऱ्याबरोबर एकटं राहायला मिळत ,,,, सासू सासरे नाही किती मज्जा असं तिला वाटायचं ... हळू हळूहा हेवा द्वेष आणि मत्सर ने घेतला ती सीमाशी बोलेनाशी झाली.

इकडे सीमाला दिवस गेले ...ऑफिस कडून work from  home  मिळालं , काही दिवसांनी कामाचा लोड होऊ लागल्यामुळे सीमा leave  घेतली . राघव ने तिला पुण्यास जाऊन राहायला लावलं ....ती पुण्यात आल्या नंतर काय झालं ,कुठे बिघडल ,काही कळलंच नाही. सीमाला जॉबवर resign करावं लागलं आणि दोनच महिन्यात तीबाळंत झाली. गोंडस मुलगा झाला तिला ... आणि त्या दोन महिन्यात राघव च्या बाबतीत सुद्धा तेच झालं त्यालाही resign  करून पुणे गाठावं लागलं .

आता सीमा आणि राघव दोघेही घरीच होते पदरात एक मुलं होत ,, एक महिना घरचे काही बोलले नाही पण नंतरराघवच्या वाहिनीची आणि दादाची कुरकुर सुरु झाली खर्चावरून ... रोज वाद व्हायला लागले ... शेवटी राघवाच्या आईने सीमाला पूर्वीच्या कंपनी मध्ये कॉल साठी विचारायला सांगितलं आणि लक तिला परत तो जॉबमिळाला ,,, पण बाळ ते तर अजून लहान होत ,,,, त्याला शिवाय तिकडे ठेवायचं कुठे सासू किंवा आई तिकडे येऊ पण शकत नव्हत्या ... शेवटी मनावर दगड ठेऊन सीमाने बाळ सासू कडे दिल आणि डोळे पुसत ती बेंगलोरला जॉबला रुजू झाली . पण संध्याकाळी घरी आल्यावर तिला बाळाची आठवण धड झोपू द्यायची नाही कि खाऊद्यायची नाही ... ती महिन्यातून दोनदा पुणे बंगलोर करायची तेवढंच काय ती भेट व्हायची .

काही दिवसांनी राघवला पण तिकडे जॉब लागलं तो हि परत बंगलोर ला आला . आत ती दोघ  बेंगलोर आणि बाळ पुणे असं चाललं होत .. सीमाच मात्र ठरलेलं महिन्यातून दोनदा कधी कधी जमल तर तीनदा ती पुणे बेंगलोरकरायची अशात तिची तब्बेत पण बिघाडायची पण बाळाच्या ओढीने ती हे करायची . आता बाळ अडीच वर्षाचं झालं होत ....

राघवच्या वहिनीला का कुणास ठाऊक पण वाटलं कि आता सीमा बाळाला घेऊन जाईल आता ते तिघे आणि बाळ मजेत राहतील ,,,, आपण आणि आपलं बाळ  मात्र इकडे आणि नवरा तिकडे ... असच चालणार .... हाच विचारतिच्या मनात सतत येत होता ... एकदिवस काही तरी कारणावरून वहिनींनी सासू सासर्यांशी भांडायला सुरुवात केली तस बघितलं तर त्या डायरेक्ट मला पण बेंगलोर जायचं असं बोलल्या असत्या तर त्यांना त्यांची ना नव्हतीउलट दादाच त्यांना आई पप्पां सोबत राहा म्हणून सांगत

पण वाहिनी हट्टालाच पेटल्या होत्या इतक्या कि त्या एक महिना मुलाला घेऊन माहेरी जाऊन राहिल्या. शिवाय ओळखीतल्या वकिला करावी नोटीस पाठवून पण मोकळ्या झाल्या .... सासूसासरे घाबरले त्यानि दादांना समजावून वाहिनी त्यांचा मुलगा आणि सीमा राघवच बाळ बंगलोरच्या घरी शिफ्ट केल सुरुवातीला सगळं व्यवस्थित चाललं होत . वाहिनी आणि मुलं घरी असायची . पण हळू हळू वहिनींना आपण पण जॉब करावा पैसे कमवावे वाटू लागलं

त्या सीमा च्या lifestyle ला स्वतःशी compare करू लागल्या आणि त्यांच्या मनात येऊ लागला कि हि स्वतः कमावते, स्वतःवर वाटेल तेवढा खर्च करू शकेल

आपल्याला दर वेळी नवऱ्यावर अवलंबून राहावं लागत , त्यांच्या कडे पैसे मागावे लागतात . आपण पण जॉब करावा आणि पैसे कमवावे म्हणजे स्वतःचा खर्च स्वतः करू ..

तो पर्यंत मुलं थोडी मोठी झाली होती , दादांनी वहिनींना MPM मास्टर डिगरी करावी कि घरी बसल्या करामत नाही म्हणून आणि शिवाय सीमा सुद्धा मास्टर्स केलं होत म्हणून .

मुलं आता kg मध्ये जायला लागली होती ... मुलांच्याच शाळेत वहिनींनी जॉब साठी प्रयन्त केला त्यांना जॉब लागलाही पण सहा महिन्यातच वाहिनीचं तिथल्या एकाशी भांडण झाला आणि ती शाळा त्यांनी सोडली .

नंतर त्यांनी एका महिन्या नंतर दुसरी शाळा जॉईन केली ,, घरापासून थोडं लांब होत यायला थोडा उशीर होई म्हणून मुलांना पाळणाघरात ठेवलं

ह्या शाळेत मात्र त्यांना मैत्रिणी मिळाल्या ह्या join फॅमिली मध्ये कसे तू राहते , ते दोघं हि कमावतात ना मग त्यांच्या मुलाला तू का सांभाळते , तू लगेच घरी का ग जातेस थांबत जात कि थोडा वेळ .... ,,, चल आज मूवी बघू ... ह्या सगळ्या गोष्टींना वाहिनी भुलल्या , त्यांना ते सगळं खरं वाटायला लागलं . आणि वाहिनीचं वागणं घरात बदललं . त्या थोड्या मॉडर्न राहू लागल्या , हेअर कट करून घेतला , त्यांना कपड्यांची खूप आवड सगळं पगार कपडे आणि कॉस्मॅटिक वर खर्चू लागल्या घरातील काम टाळू लागल्या .. सीमा सकाळी आणि वाहिनी संध्याकाळी सर्व आवारातील असं ठरलं होत पण वाहिनी संध्याकाळचं स्वयंपाक पण खूप कष्टाने करू लागल्या ,,, शनिवार रविवार तर त्या एन्जॉय आणि सुटी च्या मूड मध्ये असायच्या .

सिमला संध्यकाळी दमून आल्यावर घरात पसारा ,, कधी कधी स्वयंपाक असायचा कधी सकाळचंच उरलेला असायचं , किचन पूर्ण भरलेला , बेसिन मध्ये उष्टे भांडी तशीच पडलेली , मुलं सोफ्यावरच झोपलेली असायची . सीमा ऑफिस मधून येई पर्यंत रात्रीचे ८ वाजायचे आल्यावर ती मुलाला रूम मध्ये गादीवर झोपून बाकीच आवरून मग राघव आणि ती जेऊन झोपायचे झोपे पर्यंत त्यांना १२ वाजायचे . सकाळी परत लवकर उठायचे

सकाळचा चहा नाश्ता , मुलांचं दूध, त्यांचं आवरून त्यांना शाळेत पाठवणं , घरातलं आवरण , स्वयंपाक, पाणीभरणं हे सगळं करून सीमा सकाळी ९ वाजता ऑफिस साठी निघायची. एवढ्या सगळ्यात कधी तिची वेणी नसायची कधी ड्रेस ला प्रेस नसायची तर कधी कानात किंवा बांगडी घालायला विसरायची .

असेच दिवस ढकलले जात होते

वहिनींना आता वेगळं राहायचं होत त्याला सीमा, राघव आणि त्याच्या मुलाची अडचण होत होती . त्या अजून जास्त त्रास दयायला लागल्या होत्या . ह्या गोष्टी सगळ्यांच्या लक्षात येऊन नाही सगळी त्याकडे कानाडोळा करत होते . कि कधीतरी अक्कल येईल पण हे प्रकरण अजून वाढतच होत . आतातर दादा सुद्धा त्यांच्या सारखंचवागायला लागले होते . वहिनींनी दादांना पूर्ण मुठीत घेतल होत.

 

आणि शेवटी व्हायचं तेच झालं आई पप्पानी जे जॉईन फॅमिली च स्वप्न पाहिलं होत ते तुटलं सीमा राघव आणि दादा वाहिनी वेगळे झाले



Rate this content
Log in

Similar marathi story from Drama