Sanjay Raghunath Sonawane

Inspirational


4  

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational


मी सावित्रीबाईफुले बोलतेय

मी सावित्रीबाईफुले बोलतेय

4 mins 1.7K 4 mins 1.7K

पात्र-महिला आमदार-नेहा, त्यांच्या अंग रक्षक प्रितम, मेघा ,सावित्रीबाईंचा पुतळा

नेहाताई सावित्रीबाईंच्या पुण्यतिथीनिमित्त फुलांचा हार घालण्यासाठी त्यांच्या अंग रक्षकासोबत एका शासकीय कार्यालया बाहेर पडतात. तिथे सावित्रीबाईंचा पुतळा असतो.

सावित्रीबाई:व्वा!आमदारबाई, तुम्हाला बघून मला खूप आनंद झालाय. शिक्षण घेऊन तुम्ही प्रगती केली. आज माझी पुण्यतिथी असल्याची आपणास जाणीव झाली आणि मला फुलांचा हार घेऊन आलात. हार घालून माझे समाधान होणार नाही.

नेहा: अरे बाप रे, कोण बोलतेय.इथे तर कुणीच दिसत नाही.

सावित्रीबाई: घाबरू नकोस मी कुणी भूत पिशाच नाही.

मी आहे तुमच्यासाठी संघर्ष केलेली सावित्री. शिक्षणाची सावित्री. मी जरी पुतळ्यात असले, निर्जीव असले तरी माझे विचार ,मन मेलेले नाही. आता हे सांगायची वेळ का आली?माहीत आहे तुला?

नेहा:(त्या विचारात पूर्ण मग्न झाल्या)नाही. माझे काही चुकले का?

सावित्रीबाई:होय, तुमच्याकडून नक्कीच चुकले म्हणून मला आज तुझ्याशी बोलावे लागले. माझ्या विचारांची राखरांगोळी केली. आजही शिकलेल्या कितीतरी मुली शिकून अंधश्रद्धापाळत आहे. त्यांना देवाचे मंदिर सुद्धा खुले नाही. कुठे गेली स्री समानता. अनेक वाईट प्रथा आजही मोठ्या प्रमाणात पाळल्या जातात.

प्रितम:होय, सावित्रीबाई बोलताय ते सत्य आहे. ज्या स्री शिक्षणासाठी त्यांचा तीव्र लढा होता.त्यासाठी त्यांनी शेणाचा ,चिखलाचा मार सहन केला. पुण्यात स्री शिक्षणासाठी पहिली मुलींची शाळा काढली. आपल्याला हक्क व कर्तव्य त्यांच्या संघर्षामुळे मिळाले.

मेघा:होय, होय प्रितम ताई बोलताय ते योग्यच आहे. सावित्रीबाईनी लोकांचा विरोध सहन करून, शिव्या सहन करून सर्व जाती धर्माच्या मुलींना शिक्षण दिले. त्यांनी कधी भेदभाव केला नाही. त्यांच्या मुळे आपल्याला न्याय, स्वातंत्र्य मिळाले. आज आपल्या सारख्या स्रीया अधिकारी, आमदार, खासदार, राष्ट्रपती, पंतप्रधान झाल्या.

नेहा:बोला माई साहेब आमच्याकड़ून काय अपेक्षा आहे?

सावित्रीबाई:होय मला तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. तुमच्याच भगिनी ज्या शिक्षणापासून वंचित आहे. त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणा. गरीब मुलींसाठी खेड्या पाडयात स्री शिक्षण द्या. अनेक शासकीय लाभ मिळवून द्या. त्यांना आर्थिक मदत पोहचवा. त्यांना आर्थिक दृष्टया सक्षम होण्यासाठी रोजगार उपलब्ध करून द्या. त्यांच्यावर कोणताही अन्याय, अत्याचार होणार नाही याची खबरदारी घ्या. एक स्री शिकली तर एका पिढिचे भले होते. साक्षर स्री लोकशाही बळकट करते. त्यामुळे देशाचे भले होते.

नेहा:होय, माई साहेब आम्ही तुमच्या विचारांची प्रेरणा देतच आहोत. पण कधी कधी आम्हाला इच्छा असून देखील आमच्या हायकमांडमुळे शासकीय योजना राबवताना अडथळा येतो.

सावित्रीबाई:होय, पण सत्यासाठी थोडा त्रास सहन करावा लागतो. लोकांचा विरोध सहन करावा लागतो; पण तुम्ही तुमच्या कर्तव्यापासून दूर जाऊ नका. चांगले काम करताना लोक बदनामी करतील, आरोप करतील, वाळीत टाकतील. पण चांगले काम तुला समाधान देईल. जीवनाचे सार्थक झाल्याचे समाधान मिळेल. फक्त काम करताना जात, धर्म आड येऊ देऊ नको. मानवता हाच धर्म पाळला पाहिजे. हेच स्री शिक्षणाचे ब्रीद आहे.

नेहा:माई, अजून काय करावे अशी तुमची इच्छा व्यक्त करा. ती मी पूर्ण करेल.

सवित्रीबाई:फक्त भाषणबाजी करून लोकांना फसवू नका. जी कामे करणार तेच वचन द्या. ती तडीस न्या.

आज शिक्षण घेणे सर्व सामान्यांना परवडत नाही. त्यासाठी उपाय करा. शिक्षण उद्योगपतींच्या हातात गेले असल्याने पैशांची स्पर्धा लागली आहे. त्यात गरीब कर्जबाजारी होत आहेत. काहीनी शाळा सोडल्या आहेत तर काहीजन मुलींना व मुलांना शिक्षणात भेदभाव करत आहेत.

प्रितम:होय, होय असे चालू राहिले तर देश धनवान लोकांच्या ताब्यात जाईल. लोक शिक्षणापासून वंचित राहतील. देश गुलामगिरी व हुकुमशाहीच्या वाटेवर जायला वेळ लागणार नाही.

मेघा:अगदी बरोबर शिक्षण मिळाले नाही तर चोर, दरोडेखोर,गुंड तयार होतील. असे लोक लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येतील व देशाला चारी दिशानी भ्रष्टाचाराने पोखरतील.

नेहा:होय, मला लोकांनी ज्या विश्वासाने निवडून दिले. त्या प्रत्येकाच्या मताचे उपकार मी विसरणार नाही. माईचे विचार प्रत्येक शाळेतून ,महाविद्यालयातून रुजवेल. त्यांची प्रार्थना सुरू करेल. त्यांच्या जीवनावर आधारीत निबंध स्पर्धा, वकतृत्व स्पर्धा, पोवाडे, गाणी प्रत्येक शाळेतून सुरु करेल. त्यांचे मानवतावादी विचार जपेल. ५सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याचे आजच जी. आर. काढते. तेव्हाच खऱ्या अर्थाने मला समाधान लाभणार आहे.

सावित्रीबाई:होय, माझ्यासारखेच कार्य फातिमा शेख ह्या भगिनीचे आहे. त्यांचे कर्तुत्व विसरून चालणार नाही. शिक्षण क्षेत्रात त्यांचे ही तेव्हढेच योगदान आहे.माझे नाव पुणे विद्यापीठाला देऊन माझा गौरवही केला. आता मला एकच इच्छा आहे ती म्हणजे सर्व स्री वर्गाने माझ्या विचारांचे जतन करावे. हीच माझी पुण्यतिथि आहे.

माझ्या कितीतरी लेकीना माझी जयंती, पुण्यतिथी कधी असते हेच माहीत नसते.मी तुमच्यावर राग धरत नाही; पण माझा तुमच्यावार तेवढा अधिकार आहे. माझे भाषण करायला त्यांच्याकडे वेळ नाही. तसी मानसिकता तयार होत नाही. तुमच्यावर कुणाचा दबाव आहे का?मग का लाजता आपल्या आईचे विचार मांडायला?का घाबरता निर्भिडपणे आपले विचार व्यक्त करायला?

नेहा:अश्रू ढाळत,माफ करा माई साहेब आमच्याकड़ून चूक झाली असल्यास. आमच्या श्वासात ,रक्तात फक्त तुम्ही आणि तुम्हीच आहे. माझ्या शिक्षण खात्यात लगेच तुमच्या विचारांची शक्ती रुजवण्याचे आदेश काढते.

सावित्रीबाई:हे तू एकट्याने करून पूर्ण होणार नाही. यासाठी तुमच्या सर्व रण रागिनींची गरज आहे तरच ते शक्य आहे. कारण एकतेत ताकत असते.

प्रितम:होय, माई हीच खरी परिवर्तनाची गरज आहे. धन, दौलत ह्या बरोबर शिक्षण, संस्कार, मूल्ये काळाची गरज आहे आणि ती प्रत्येक शाळातून शिकविली जावी.

सावित्रीबाई:होय, लेकीनों मी परत माझ्या निर्जीव पुतळयात समाधानाने विलीन होते.


Rate this content
Log in