Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Amrut Dhage

Drama Romance Tragedy

3  

Amrut Dhage

Drama Romance Tragedy

पुन्हा पाडगावकर

पुन्हा पाडगावकर

6 mins
786


मरण आलं तर येऊ द्यावं

जमलंच तर लाडानं जवळ घ्यावं

हिरवं हिरवं रोप कधी रुजायचं थांबतं का

मरण येणार म्हणून कोणी जगायचं थांबतं का?

 

आज हनीमूनचा परतीचा हिवस. सकाळपासूनच राधिका काहीतरी गुणगुणत होती. मंगेश तिच्याकडेचा पहात होता. त्याला जाणवलं, लग्नानंतर राधिका प्रथमच एवढी आनंदात आहे, तिने त्याच्या आवडीचे पांढरे मोत्याचे गुंड कानात घातले आहेत. ते पाहताच मंगेश आठवणींच्या कॅफेत गेला 

   

खरंतर मंगेशला ठरवून केलेलं लग्न मान्यच नव्हतं. त्यालाही कुणाच्या तरी प्रेमात पडायचं होतं. कुणाच्या तरी आठवणीत आकंठ बुडायचंहोतं, कुणाशी तरी रात्र -रात्र जागून गप्पा मारायच्या होत्या, त्या 'कुणा एकीचे' नखरे झेलायचे होते, तिचे रुसवे-फुगवे अन् मनावर धुंदी आणणारे शब्द अनुभवायचे होते. तसं त्याच्या college life मध्ये अनेक gfs होत्या पण त्या सगळ्या so called gfs ह्या timepass, flirting करणाऱ्या होत्या. त्यांच्या बोलण्यात 'ती' नशा नव्हती, फक्त लोचटपणा होता. त्यामुळं फोनवर बोलताना कॉल करायची घाई यालाच अधिक असायची. त्यांच्या shoppings, cosmetics चे brands, आणणं fashion मध्ये याला काडीचाही रस नव्हता. सो त्याला हवी तशी मुलगी मिळेपर्यंत हा लग्नच करणार नव्हता. पण आजीच्या emotional blackmailing ला बळी पडून त्याने राधिकाला होकार दिला. लग्न झालं. पाहुण्यांनी गजबजलेलं घर ओकंबोकं झालं. रूटीन सुरू झालं. पण राधिका आणि मंगेशच्या नात्यात म्हणावा तसा मोकळेपणा आला नव्हता.

 

"जेवायला येताय ना, पानं वाढलीत."

दाराआडूनची हाक. आणि

 

 "अॉफिसला जातोय."

 तिच्याकडे न पाहता सांगणं. एवढाच काय तो संवाद.

 

राधिकाच्या भावानं दोघांना हनीमुन package offer केलं. सुरूवातीला टाळाटाळ करत त्यांनी महाबळेश्वरला जायचं नक्की केलं. मनसोक्त फिरता येण्यासाठी धाकटया दुर्गेशने घरची गाडीची कल्पना सांगितली आणि ती बहुमताने मान्यही झाली. अल्पमतात ते अरसिक कपलंच होतं.

 

मंगेश गाडी चालवत होता आणि राधिका खिडकीतून बाहेर पहात होती. कोणीतरी सुरूवात करायलाच हवी...

 

"अं..टेप लावूका??" 

 

मंगेशने तिच्याकडे न पाहताच विचारलं.

 

"हो ..लावा."

राधिकानेही त्याच्याकडं पाहिलं नाही.मंगेशने टेप लावला.

 

'दिवस तुझे हे फुलायचे

झोपाळ्यावाचून झुलायचे

स्वप्नात गुंगत जाणे

वाटेत भेटते गाणे

गाण्यात हृद्य झुलायचे

झोपाळ्यावाचून झुलायचे

 

"अय्या !! पाडगावकर!!!! कित्ती छान!!!...'

 

 राधिका जवळजवळ किंचाळलीच.

 

"तुला आवडतात पाडगावकर?" 

मंगेशला धक्काच बसला तिचा आनंद पाहून.

 

"आवडतात काय??पाडगावकर दैवत आहे माझं. त्यांच्यामळे तर तुम्हाला होकार दिला ना?"

 

"म्हणजे ??"

 

"अहो, तुमचं नाव काय?"

 

"मंगेश"

 

"आणि पाडगावकरांचं पण. बाबांकडून नाव ऐकलं आणि बेभान होवून होकार दिला." एका दमात बोलली राधिका.

 

"एवढं वेड आहे का गं तुला त्यांचं????" 

 

"भयानक!!! माझी तर फॅन्टसीच ती, माझ्या जोडीदाराने मला पाडगावकरांच्या 'तिने बैचेन होताना कळ्यांनी श्वास टाकावे' ही गज़ल गाऊन प्रपोज करावे"

 

राधिकाची कळी चांगलीच खुलली होती. त्या प्रेमकवीनं आपलं काम चोख बजावलं होतं. साताजन्माच्या बंधनात अडकलेल्या पण इतके दिवस अनोळखी असणाऱ्या जोडीला एकमेकांची ओळख करून दिली. मंगेशने तर आनंदाने उड्याच मारायचं बाकी ठेवलं होतं. तोही पाडगावकरांचा चाहता होता.त्याला हवी तशीच पाडगावकरांची प्रेमवेडी जोडीदार मिळाली.गाडी जसजशी घाट चढु लागली तशी मंगेशरावांची प्रीत फूलु लागली हे प्रेमवेडे मित्र झाले. कवितांच्या भेंड्या खेळु लागले.....

 

"ती कविता कोणती हो? सेम असंतं ती??"

 

"प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं"

 

थोड्या वेळापूर्वीचे अनोळखी वाटसरू आपल्या गोड गळ्याने आणि पाडगावकरांच्या शब्दांनी एकमेकांना प्रेमात पाडत होते…. हौले हौले ही प्रेमकहाणी चांगलीच फूलतेय राव!!!! 

संध्याकाळी सनसेट पाँईटवर हातात हात घेऊन, डोळे झाकून दोघांनी मस्त सूर लावला.

 

'फुलून येते संध्याकाळ, रंगांची बाधा होते.

आणि निळ्या निळ्या कृष्णासाठी अवघी सृष्टी राधा होते.

पाऊल फसेल म्हणून कुणी भुलायचं थांबतं का?

मरण येणार म्हणून कुणी जगायचं थांबतं का??'

 

टाळ्यांच्या कडकडाटाने दोघेही भानावर आले. पाहतात तर काय!! सारे पर्यटक भोवती गोळा झाले होते. त्यातल्या एकानं विचारलं, "लग्नानंतर तुमचं प्रेम असंच टिकेल ना?"

 

दोघांनी एकमेकांकडे लाजून पाहिलं, हातातले हात अधिकच घट्ट झाले, राधिकाने ओढणीखाली लपलेलं मंगळसुत्र हळूच वर काढलं आणि ते पाहून तो पर्यटक शरमला.

 

"प्रेमविवाह?"

 

"अंहं , विवाहानंतर बहरलेली प्रीत"

 मंगेशनं राधिकाला अधिकच जवळ घेत सांगितलं.त्या शंकेखोर पर्यटकाने परत विचारलं, 

"आयुष्याच्या अंतापर्यंत टिकेल का?"

 

यावर राधिका उत्तरली,

 

"कशासाठी भयानं ग्रासून जायचं

आणि फुलायच्या प्रत्येक क्षणी नासून जायचं

सुकुन जाणार म्हणून फुल फुलायचं थांबत का?

मरण येणार म्हणून कुणी जगायचं थांबत का?

आणि जीव जडवून कुणी प्रेम करायचं थांबत का?"

 

त्या पर्यटकाला समर्पक उत्तर मिळालं.

 

प्रेमाच्या रेशीमगाठी अगदी घट्ट बसल्या. हनीमूनचे ते चार दिवस प्रेमाचं अत्तर शिंपून गेले अन आज हनीमूनचा परतीचा दिवस. सकाळपासूनच राधिका काहितरी गुणगुणत होती. मंगेश तिच्याकडेचा पहात होता. त्याला जाणवलं, लग्नानंतर राधिका प्रथमच एवढी आनंदात आहे, तिने त्याच्या आवडीचे पांढरे मोत्याचे गुंड कानात घातले आहेत.

 

"उठा पाडगावकर, निघायचं नाही का?"

 

 मंगेश राधिकाचा पाडगावकर झाला होता.

 

"काय घाई आहे गं?" मंगेश तिच्यावरची नजर न हटवता म्हणाला

 

"अहो परवा ऑफिसला जायचं ना? मग उद्याचा दिवस आरामाला नको का?? त्यासाठी आज लवकर जायला हवं ना?"

 

राधिका केस सावरत म्हणाली. मंगेश तरी जागचा हलला नाही.

 

"अहो लक्ष कुठाय? कुथे हरवलात?" मंगेश बेडवरून उठून तिच्याकडे जात गाऊ लागला,

 

"जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा

माझा न राहतो मी हरवून हा किनारा"

 

 त्याने राधिकाला पाठीमागून मिठी मारली.

 

"पाडगावकर पुरे आता, चला तयार व्हा बरं"

 

 राधिकाने मिठी सोडवून त्याला बाथरुममध्ये जवळजवळ ढकलंलच. आवरून झाल्यावर दोघे नाश्त्यासाठी एका cafeत गेली.तिथं मंगेशने तिला सर्वांसमोर

 

'तिने बैचेन होताना कळ्यांनी श्वास टाकावे

तिने होकार देताना जीवाचे चांदणे व्हावे '

ही गज़ल गाऊन प्रपोज केलं. होकार अर्थातच मिळणार होता, शेवटी कायतर दोन काव्यवेडे प्रेमात आकंठ बुडाले याचं सारं श्रेय अर्थातच पाडगावकरांना. गाडीत बसल्यावर मंगेश हाच विचार करत होता.

'पाडगावकर, तुम्ही ग्रेट आहात. अहो ज्या लग्नाची मला भीती होती त्याच लग्नामुळे आज मी स्वर्गसुखात आहे. मला वाटलं होतं कुणीतरी टिपीकल वरणभाती, अरसिक प्राणी माझ्या पदरी पडेल पण हा प्राणी भलताच रसिक निघाला. चक्क तुमचीच प्रेमवेडी निघाली. तुम्हाला साष्टांग दंडवत प्रेमकवीराज!!! भरून पावलो राव!!! आम्ही दोघं आता सुखानं संसार..."

 

"धड्डाम!!!!"

 

समोरच्या वळणातून आलेल्या ट्रकला मंगेशची गाडी धडकली आणि दोन काव्यवेडे निसर्गाच्या स्वाधीन झाले. ट्रकमधला टेप मात्र आर्त स्वरात गात होता.

 

'भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी

अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी'

 

पुन्हा पाडगावकर!!!!


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama