Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vasudev Patil

Others

2.5  

Vasudev Patil

Others

रसवंती भाग दुसरा

रसवंती भाग दुसरा

6 mins
832


    भाग::-- दुसरा


 दुसऱ्या दिवशी सनाला काॅलेजच्या फी चा डि.डि.अर्जंट पाठवायचा होता. गजन कडनं गाडीची किल्ली घेत ती बॅंकेत निघाली. विक्रांत म्हस्के मॅनेजरच्या कॅबीनमध्ये बसला होता.गाॅगल्स वर करत बॅंकेच्या पायऱ्या चढणाऱ्या ठराविक गिऱ्हाईकाकडं तो निस्तरवार पाहत होता.सना हे नविन पाखरू त्याच्या नजरेतून सुटलं नाही. त्यानं फाइल बाजुला करत कॅशीअरकडं मुद्दाम काम काढत क्लर्कशेजारी उभ्या सनाकडं पाहू लागला. पाखरू बालेवाडीचं नाही हे त्यानं ओळखलं व क्लर्कला खूण करत तो कॅबीनमध्ये परतला. क्लर्कनं फाॅर्मसहीत सनाला मॅनेजरकडं पाठवलं.त्यानं तिला समोरच्या खुर्चीवर बसवत कुठं डि.डि करायचा?,कितीचा?, मोबाईल नं. टाकला का?जुजबी विचारत थेट कुठली तू? कुणाकडं आलीस?विचारत गाडी रस्त्यावर आणली.सना मिश्कील हसत "डि. डि.साठी हे ही आवश्यक आहे का?" त्याला खडसावलं.तो त त फ फ करत बाजू सावरू लागला.

"मुकाट्यानं काम करा व मला जाऊ द्या" ती भाव दिसू न देता म्हणताच तो घाम पुसू लागला.

"एक आणखी असली काही चौकशीसाठी मोबाईल नं. लिहीलाय .."

स्मित हास्य करत ती झटक्यात बाहेर पडली. विक्रांत घाम पुसता पुसता फुटणाऱ्या मधुर उकळ्या दाबत जाणाऱ्या पाखरूकडं पाहू लागला. सना चारा टाकून माघारी निघून आली.

   गजनचा सारा दिवस दुकान व चालणारं काम यातच जात होता.त्यात पहिल्यांदाच आलेले कुटुंबीय ,नातेवाईक यांची निस्तवारी करणं, सालीची फिरकी घेणं यालाही तो तोंड देतच होता.पण आज सनाचं वागणं बदललं होतं हे त्याच्या लक्षातच आलं नाही.रात्री फर्दापूरहून रंगकाम करणारे नवीन लोक मोटार सायकलवर आले.त्यांनीही दिवसभर दुसऱ्या 

साईडचं काम करत रात्रीसाठी गजनच्या बंगल्याचं काम निवडलं.त्यात गमन पेंटरला रात्रीची घेतल्याशिवाय काम करणं शक्यच नव्हतं.पण एकदाची चढवली की धुंदीत मग तो वरचं छताचं उलटं रंगवणं छान करत असे.म्हणून माना पेंटरनं त्याला सोबत आणलेल्या टॅंगो पंच चढवल्या.जेवण आटोपत दहा अकराला त्यांनी रंग कालवत राहिलेलं बाहेरचं काम सुरू केलं.कालच्या आक्रीतानं घाबरलेली बापू ,तिरमल,ईस्ना, सखा पारावर फिरकलीच नाही.पण त्यांच्या जागेवर दोन तीन टारगट पोर पारावर पडलेली बिडयांची थोटकं पेटवून टाईमपास करत होती.व मध्येच गजनशेठच्या बंगल्याकडं जिभल्या चाटत पाहत होती.दिवसा जाता येता त्यांनीही सनाला बघितली होती.व आता ही त्याच आशेनं बिड्याची थोटकं ओढीत पारावर उठबस करत होती.अकरा वाजले तसं एकानं "अयं बारक्या चल आता गज्जनशेठचा अख्खा बंगला झोपलाय आता तर ती इतक्या थंडीची बाहेर यायला आपल्यास काय सोनं जडलेलं नाही.चल उगाच रात वाढतेय".

तोच राम मंदीरातनं काळी मांजर निघाली.आता तिच्यासोबत 'मियाॅव','मियाॅव करत तिच्या पायात घुटमळणारं तिचं बारकं पिलू ही होतं. रात्रीच्या सर्द शांत रातीत पिंपळाच्या पानाच्या सळसळीत त्या पिलाचा मियाॅव आवाज एकदम भेसूर व भयकारी जाणवत होता.पूर्वेच्या नदीकाठाकडून एक लाल कुत्रं वेगानं पिलावर झपाटी मारणार तोच काळ्या मांजरीनं तोंड फेंदरत, केस विस्कारत कुत्र्यावर असा काही हल्ला चढवला की कुत्रं एकदम घाबरलं व शेपटीचा झेंडू तंगडीत घालत माघार घेऊ लागला.बस्स मांजरीनं ही संधी साधत उच्छाद मांडत कुत्र्याचा पाठलाग सुरू केला.एरवी पोरांनी मांजर जीव वाचवतांना पाहिली होती.पण इथं मामला उलटाच होता.कुत्रं जिव वाचवत महादेव मंदीराभोवती,मारोती भोवती घिरट्या घालत जीव वाचवत होतं तर मांजर त्याला सोडतच नव्हती .कुत्र नदीकडं सुंबाल्या झालं.मग मांजर धडधडत्या छातीनं म्याव म्यावचा टाहो फोडत पिलाला चाटू लागली.पण हा सारा प्रकार इतका झटक्यात व भयप्रद घडला की पोरांनी तेथून उठत घराकडची वाट पकडली.तरी म्याव म्यावचा आवाज त्या परिसरात घुमतच होता.

   सारी बालेवाडी घोरू लागली.त्या लयीवर पेंटरांचे ब्रशचे फटकारे सुरू होते .भिंती रंगवल्या जात होत्या. गाव दरवाज्याच्या वडचणीच्या खपदारीत लटकलेली वटवाघळे जंगलात भक्ष्याच्या शोधात बाहेर पडली.वड पिंपळाची सळसळ सुरूच होती.गमन पेंटर धुंदीत रंगवत होता.त्याला जर्दाची तल्लफ आली.ब्रश ठेवत त्यानं जर्दा चुना लावत चोळला.दुसऱ्या हातानं ठोकत चिमूट तोंडात दाताखाली ठेवली.बाकी जण मागच्या भिंतीकडं सरकली.तो आता दर्शनी भागाचा पॅरापिटचा भाग वरच्या स्लॅबवर उभा राहुन खाली वाकत रंगवू लागला.तोच कडी वाजली.त्यानं कानोसा घेत समोर दुकानाकडं पाहीलं.कुणीतरी झटक्यात दुकानात घुसून कवाड बंद केल्याचं त्याला जाणवलं.त्यानं सरळ उभं होत पाहिलं पण नंतर वाऱ्याच्या सुरकी शिवाय स्तब्धता होती.गल्लीतली सारी सुस्त झोपलेली.त्यानं बादलीत ब्रश बुडवत खाली वाकून रंग मारणार तोच कवाड ठोकल्याचा आवाज आला.त्यानं वाकल्या स्थितीतच ब्रश थांबवत दुकानाकडं धुंदीनं लाल झालेली नजर वळवली.दुकानाच्या उमरटजवळ एक पोरगं लोळत कवाड ठोकत होतं.गमन टक लावून व कान टवकारत वेध घेऊ लागला.

"माय कवाड उघड ना गं!ये माय!भज्यांनी माझ्या घशात आग होतेय गं!ये माये मला रस नको पाणी दे ना गं!, ये माय!" पोरगं काळजाला पोखरून घरं पाडणाऱ्या आर्त स्वरात किलावण्या करत होतं.

गमनची नजर आता अंधार चिरत कवाड व पोरावर स्थीर झाली होती.

"ओ बबन काका!माझ्या मायला सोडा ना, पाठवा ना बाहेर मला घशात कसं तरीच होतंय!"पोरगं आता लोळत गळा आवळत खाली उतरत रसवंतीच्या चरख्याकडं सरकू लागलं.

तोच चरख्याचं चाक गरागर फिरत त्यावरील घुंगरू छनछनछून, छनछनछून वाजू लागले.पोरानं चरख्याच्या खाली ग्लास धुण्यासाठी ठेवलेल्या पाण्याच्या डब्यात तोंड खुपसलं व ते पाणी पिऊ लागलं.

गमनला दया आली.त्यानं ब्रश बाजूला ठेवला व तो खाली यायला लागला. तोच दुकानातून गजनशेठची साली सना जिला जेवण करतांना गमननं पाहिली होती-ती कवाड उघडत बाहेर आली.तिनं पोराला छातीशी कवटाळलं.

"गिट्टू,काय होतंय रे बाळा!बस्स झालंच आता थोडी कळ सोस! आता तुला कधीच तहान लागणार नाही बघ! सना रडत त्याला समजावू लागली.

"माय घशात आग होतेय गं" ,पोराची आता बोबडी वळत होती.

सनानं त्याला जोरात छातीशी आवळलं तसं पोरगं पायाच्या टाचा घासू लागलं.सनानं त्याला रडतच खाली ठेवलं.

गमन वरच स्लॅबवर थबकला.पोराला टाचा घासून जीव सोडतांना तो स्लॅबवर गपकन बसला व पॅरापिटच्या नक्षीच्या खिंडीतून पाहू लागला.सना उठली दुकानाच्या शेजारच्या घरात घुसली.थोड्या वेळेपुरती स्तब्धता पसरली.गमनला आपला श्वास जोरात वाहतोय तेवढंच जाणवत होतं.तोचघराच्या बल्बाच्या बाहेर पडणाऱ्या तिरपेत सना आडावर उभी दिसली नी मग धप्पकन आवाज आला.गमनची हिम्मत झाली नाही घरातून जाऊन आडाकडं जायची.तो तडकन उठला व मागच्या माणसाकडं पळाला.माणसांना सारं सांगितलं.माणसांनी त्याला पाणी पाजत शांत केलं.काम थांबवत बाजुनं ते गमनला घेऊन भीत भीत अंगणात आले.त्यांना काहीच दिसेना.ना मुलगा,ना चरखा सुरु.त्यांनी गमनला खूण करत 'कुठाय काय?',विचारलं.

गमनला कळेना काय प्रकार होता? तरी त्यानं "सना आडात कुदलीय हे मी वरून पाहिलंय हे मात्र शपथेनं सांगतोय.कदाचित तिनंच पोराला उचलून आडात उडी घेतलीय."

सारीजण घरातून आडाकडं निघाली.आडात पाणी शांत होतं.त्यांनी मोबाईल चे टाॅर्च लावत आडाच्या भिंती पाहिल्या तर त्या ही कोरड्या.पाण्याचे शिंतोडे नाही.माणसं आता गमनकडं पाहू लागली.

गमनला कळेना नेमकं काय सांगावं.

"आरं माझ्यावर विश्वास ठेवा"

तोच मानानं त्यांना पुढं आणलं.तर सना बंगल्याचे लाईट लावत उठलेली दिसली.

मानाचा पारा आता खवळला.

"साल्या गमन्या पिद्दड,दररोज दारू ढोसलतो नी मग धुंदीत काहीही स्वप्न पाहतो!ती बघ पोरगी आडात नाही बंगल्यात आहे.लबाड कुठला!चल लाग कामाला"म्हणत संतापला व इतर जण गमनला खी खी हसू लागली.

गमन मात्र त्यानं जे पाहिलं होतं त्यानं चिंताक्रांत झाला.सकाळ होताच सारीजण गाडीनं दुसऱ्या साईडवर निघून गेलेत.पण गमन थेट घरी गेला.तर बाकी माणसांनं तो प्रकार हास्यास्पद समजत दिवसभर भिंती रंगवत रंगवू लागली व गमनची टर उडवू लागली.दुसऱ्या साईटवर दुपारपर्यंत काम करत घरी परतली तर गमन फूल तापात बरडत होता व उठून उठून पाण्याचा तांब्या घेऊन "गिट्टू बाळा घे पाणी!मी पाजतो" गल्लीत पळत होता.मानानं डाॅक्टर आणत त्याला उपचार केले पण व्यर्थ.

 इकडं दुपारनंतर चारला सना बंगल्याच्या अंगणात खुर्ची टाकून मोबाईल चाळत असतांना व्हाॅट्स अॅप वर विक्रांतचे मॅसेज वर मॅसेज सुरू झाले.ती पण सावज अडकतंय पाहिल्यावर त्याला चुचकारत रिप्लाय देऊ लागली.

 रात्री कामावर आलेल्या मानानं येताच गमनशेठला पहिलाच प्रश्न केला.

"शेठ,गिट्टू कोण? बबन काका कोण हो?"

अवचित ही अपरिचीत नावं ऐकल्यावर गमन बावचळला. पण बबन हे नाव त्याला परिचयाचं वाटू लागलं.

"बबन शेठ!माना माझं हे दुकान आहे तिथं आधी त्याचं दुकान होतं.असं गाववाले सांगतात.

पण तुला ही नावं कशी माहित? व तू एवढा खोलात का जातोय?"

"शेठ,जिवनात कैकदा माणूस समोरच्याला समजून न घेता त्याला वेड्यात काढतो व बरंच काही गमावून बसतो.हे घडू नये म्हणून विचारतोय." माना आपल्या गमनची स्थिती आठवत विचारू लागला.

"अरे बाबा!हे गाववाले काहीही सांगतात.मला ही दुकान टाकतांना अशीच भिती घालवत होते.पण मी न ऐकता दुकान टाकलं व यशस्वी ही झालो.तुला ही कुणीतरी असंच भरवलं दिसतंय"

"ते जाऊ द्या पण यांची माहिती कोण देईल?"मानानं शांतपणे विचारलं.

"हे बघ आधी हे काम पूर्ण कर मग मी तुला हे सारं प्रकरण तुला सविस्तर सांगेल अशा माणसाचं नाव सांगेल" असं सांगत विषय टाळत गजन शेठनं त्यांना जेवण खाऊ घालत कामाला लावलं. पण त्याला कालचं ठेकेदारचं बोलणं ही आठवलं.पण चार वर्षात आपल्याला काहीच आढळलं नाही व घरभरणी म्हणून त्यानं तो विषय बाजूला करत झोपी गेला.


पण शालू तर सनाच्या माध्यमातून विक्रांत म्हस्केभोवतीचा फास आवळायला लागलीच होती.


    क्रमश:



Rate this content
Log in