Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

kishor zote

Others

2.8  

kishor zote

Others

पुस्तक माझा मित्र

पुस्तक माझा मित्र

3 mins
50.2K


पुस्तक माझा मित्र. होय, अगदी खरं आहे हे. विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समाजाने नाकारले तेंव्हा पुस्तकांना त्यांनी जवळ केले. त्याचे परिणाम म्हणून आज आपण लोकशाही पद्धतीने जीवन जगत आहोत. या प्रकारचे साहित्य समुह निर्माण करून वेगवेगळ्या स्पर्धा माध्यमातून आपले विचार प्रगट करत आहोत.

      विलायतेतुन येतांना जहाज बुडाले व त्यात पुस्तकांची ट्रंक बुडाली हे ऐकूण डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे घरातील कोणी व्यक्ती गेली या भावनेने शोकाकुल झाले. आपल्या आयुष्यातील अठरा अठरा तास पुस्तकांसोबत घालवणारी एकमेव व्यक्ती असावी. लोक राहण्यासाठी घर बांधतात या युगपुरुषाने पुस्तकांसाठी राजगृह बंगला बांधला. एवढं पुस्तकांवर प्रेम करणारे दुसरे कोणीही असू शकत नाही. ते केवळ पुस्तक वाचत नव्हते तर पुस्तक जगले. त्यामुळेच त्यांच्या हातून एकही विषय असा राहीला नाही की त्यांनी त्यावर आपले संशोधनात्मक लेखन केले नाही किंवा त्यावर पुस्तक प्रकाशीत झाले नाही. त्यामुळेच त्यांचा जन्मदिन "जागतीक ज्ञान दिन" म्हणून साजरा केला जातो. हा त्यांनी वाचलेल्या सर्व पुस्तकांचा बहुमान म्हणावा लागेल. तसेच या मित्रांना मिळवून दिलेले सर्वोच्च पद होय !

      ही एक गुरू शिष्य परंपराच म्हणा हवी तर. महात्मा ज्योतीराव फुले यांनी शिक्षण घेतले पुस्तकांना आपले मित्र केले, त्यातून शोध व बोध घेवून रयतेचा राजा "राजा शिवछत्रपती" यांच्या समाधीचा शोध घेतला व पहिली शिवजयंती साजरी केली. पुस्तक आणि शिक्षण याचे महत्व जाणून मुलींची शाळा सुरू केली. सावित्रीमाई फुले यांनी पुस्तकाची आस धरली व काव्यफुले सोबतच इतर रचना देखील केल्या, अनेक अजरामर विचार प्रवर्तक ग्रंथनिर्मिती देखील केली आहे.

      त्यांचीच एक विद्यार्थीनी मुक्ता साळवे हीने "मला धर्म नाही" हा निबंध लिहून समाजाला जाब विचारण्याचे धाडस केले व समाजालाही कधी नव्हे ते एका मुलीच्या या प्रश्नावर विचार करण्यास भाग पाडले.

       अण्णाभाऊ साठे उणेपुरे दीड दिवस शाळेत गेले, मात्र पुस्तक संगती मुळे साहित्य कृतीतील लोकशाहीर झाले. अशी अनेक उदाहरणे देता येतील की ज्यांनी पुस्तकाच्या सहवासाने पूर्ण मानव जातीवर कोटी कोटी उपकार करून ठेवले आहेत. त्यांचे ऋण ही मानव जात कधीच फेडू शकणार नाही.

        मात्र पुस्तक जसे मित्र तसेच शत्रू देखील होवू शकतात जर नको त्या विचारांची पुस्तके आपण वाचली तर... त्यासाठी वाचन करताना बौद्धीक मिळेल असे वाचन करावे लागेल. आमच्या महापुरुषांचे लेखन आधी वाचले की सम्यक दृष्टी तयार होईल, सम्यक दृष्टी निर्माण झाली की सम्यक विचार तयार होतील व सम्यक विचार तयार झाले की सम्यक आचरण घडेल व त्यातुन एक आदर्श असा समाज निर्माण होईल.

        वादग्रस्त लेखिका तस्लीमा नासरीन आपल्या जीवनीत लिहते, तिला तिची भाषा पवित्र वाटत होती. मात्र एक दिवस तीला त्याच भाषेत अश्लील व शीव्या असलेले एक पान वाचण्यात आले आणि पुढे तिच्या सर्व संकल्पना वेगळ्या झाल्या आणि त्या एक सत्यवादी व त्यामुळेच वादग्रस्त लेखिका म्हणून प्रसिध्द झाल्या.

        तसेच शासनाचे काम देखील आहे की, जी महापुरूषांच्या लेखन व प्रकाशनावर मागील एक तपापासून अघोषीत बंदी घातली आहे. ती उठवावी व समाजास सकस असे वाचन उपलब्ध करून द्दयावे. तसेच आपल्या सारख्या लेखकांची जबाबदारी देखील आहे की असे दुर्लक्षित उपेक्षीत साहित्य सर्व समाजापुढे आणावे.

      "वाचाल तर वाचाल" किंवा "पढेगा इंडीया तभी तो बढेगा इंडीया" यासाठी उत्तम व दर्जेदार पुस्तक यांना आपले मित्र बनवणे आवश्यक आहे. नाहीतर सामाजिक व परिवर्तनीय चळवळी मधील वक्ते नेहमी म्हणतात, "ज्याचे घरी नाही पुस्तकाचे कपाट ते घर एक दिवस होणार सपाट".

      आपले घर जर सपाट होवू द्दयायचे नसेल तर चांगल्या, दर्जेदार व उत्तम पुस्तकांना आपले मित्र बनवावेच लागेल, होय ना? त्या शिवाय दुसरा पर्याय देखील आपल्या समोर नाही. चला संकल्प करुया पुस्तकांना आपले मित्र बनवूया!

 

 


Rate this content
Log in