Ashutosh Purohit

Others


3  

Ashutosh Purohit

Others


सवंगडी

सवंगडी

1 min 16.3K 1 min 16.3K

उगाचच क्षितिजं रूंदावत बसतो आपण! "आम्ही खूप व्यापक विचार करतो" असं जड स्पष्टीकरण देतो वर! खरंतर सुखाचं, समाधानाचं मृगजळ पुढेच धावत असतं. त्यालाही दम लागत नाही, आणि आपल्यालाही! सतत धावत राहतो आपण आपल्याच अपेक्षा शमविण्यासाठी. खरंतर असं धावून आपण अपेक्षा शमवत नसतो, उलट वाढतेच भूक आपली नवीन अपेक्षा निर्माण करण्याची. आत्ता पोहोचू, मग पोहोचू.
 प्रवास काही संपत नाही, आणि आपली आशाही!
 मग वाटेत एखादा सवंगडी भेटतो. तो म्हणतो, "का धावतोस इतका? तुझे आहे तुजपाशी परी तू जागा चुकलाशी! आपल्याला त्याचं पटतं आतून असं शांत वाटतं, त्याचे हे दोन शब्द ऐकूनच. रणरणत्या उन्हात, घशाखाली गेलेले दोन शीतल थेंब, जसं चांदणं पसरवतील शरीरभर, अगदी तसंच!
 पण तरीही हट्टाने चालत राहतो आपण. जाम ऐकत नाही कोणाचं, सगळं कळत असून! आतून सगळं पटत असून! का थांबायचं? या प्रश्नाचं उत्तर काही केल्या मिळत नाही, आणि बुद्धीचं समाधान काही होत नाही!
 आपण भटकत राहतो. ते मृगजळ शोधत.
 आणि अखेर ते मिळतं. मृगजळ हाती लागतं आपल्या.
 केवढा स्वर्गीय आनंद होतो आपल्याला! 
 शेवटी माझंच खरं ठरलं! Yes!

 पण मृगजळाच्या शेवटच्या वाक्यानेच झालेला सारा आनंद पार मावळून जातो.
 "का धावलास इतका? अरे वेड्या मीच तुझ्या मागे होतो. मी मृगजळ. पण तू? तुजपाशी टाकीचे पाणी आहे! ते अमृत प्यायला असतास, तर इतका वेळा वाया गेला नसता!"

 वाटेत भेटलेल्या सवंगड्याची आठवण येते.
 मन हळवं होतं. दमून स्वतःच्या आत निजतं.
 स्वतःच्या आत पाहतो तर काय!

 तोच सवंगडी अमृतात न्हात असतो.

 


Rate this content
Log in