Yogita Takatrao

Inspirational


3  

Yogita Takatrao

Inspirational


व्हाटस् अप ??

व्हाटस् अप ??

3 mins 1.3K 3 mins 1.3K


     

     सकाळ पासूनच नुसते सोसायटी च्या व्हाट्सअप ग्रुप वर एका सोसायटी मधील गृहस्थानेच कसे अमानवी आणि अमानुष कृत्य केले ?......ह्याचे अनेक मजकुर सगळया त्याच सोसायटी मधील रहिवाशांच्या भ्रमणध्वनी वर फिरत होते....ज्याला आपण व्हायरल म्हणतो.........हो तेच ते !व्हायरल झाले होते !


      नाना प्रकारच्या चर्चा रूपी सत्रांना ऊधाण आले होते....त्यात काहीही सत्य न जाणताच चवीने बोलणारी मंडळी जास्तच होती.......प्राणी प्रेमी हळहळत व्यक्त करत होते.....झालं असं होतं की....एका अमुक तमुक विंग मधल्या गृहस्थाने ,सोसायटी मधल्या भटक्या कुत्र्यावर बेदरकारपणे गाडी चालवली....आणि त्यात त्या कुत्र्याचा जागच्या जागी मृत्यू झाला होता. आणि कुत्रं मेल्यावरही म्हणे, जेव्हा त्या काळीज नसलेल्या माणसाला तेथूनच जाणाऱ्या लोकांनी जाब विचाराला....की का बाबा...? का तू अशी त्या निष्पाप जीवावर गाडी चालवलीस ..... ? आणि ठार मारलसं त्याला.....? त्यावर तो गृहस्थ म्हणाला की मी त्या कुत्र्याला हाॅर्न वाजवला..... ! पण तो बाजूला नाही झाला ..? तर माझी काय चूक त्यात ? झालं हे मेसेजेस् एवढे फिरत होते सगळीकडेच आणि ते ही त्या मेलेल्या कुत्र्याच्या फोटो सकट.....मग कोण तो माणुस..? कुठे राहतो ...? फ्लॅट नंबर.....? आणि एकजणाने तर गाडी चा नंबर ही पोस्ट केला आणि गोंधळ एवढा होत होता की ,गाडीच्या नंबरलाच कोणी विंग ,फ्लॅट नंबर समजुन भांडू लागला ...की बाबांनो त्या फ्लॅट मध्ये अजून कोणी राहत नाही मग कुत्रा कसा ठार मारेल...? मग कोणीतरी व्हाट्सअप करून सांगितलं की मेसेज नीट वाचावा,तो गाडी चा नंबर आहे, फ्लॅट,विंग नंबर नाही. मग त्या माणसाला पटलं बुवा.....!


       ग्रुप नंबर 2..........एक बाई😒.........बाई😒 ....बाई😒......आमची लहान मुलं खेळत असतात.😓....सायकल चालवतात😔.......काहीजण कानात हेडफोन लावून शतपावली करतात😞....त्यांना हाॅर्न ऐकू नाही गेला तर त्यांना पण उडवलं असता का...😟? हाऊ रिस्की.......हाऊ डेंजरस.......अवर किड्स अँड सिनिअर सिटीजन्स आर नाॅट सेफ इन दिस सोसायटी😞😢..........


        दुसरी बाई..........सिसिटिव्हि फुटेज चेक करा🕵️‍♀️......की खरंच काय झालं पहाटे ६ ला......? ते कळेल....!


        तिसरी बाई........कुत्राप्रेमी(प्राणीमित्र) असावी बहुधा......पोलिस कंप्लेंट करा😤.....मुक्या प्राण्यांची हत्या करणं बंद झालेच पाहीजे☹.......


        चौथी बाई......भटकी कुत्री येतातच कशी सोसायटी मध्ये🤨🤔.....डाॅग कॅचर ना बोलवायच ना कमिटी मेंबर नी🧐...? आणि खाऊ कशाला घालता भटक्या कुत्र्यांना😠 .....एवढी हाउस आहे तर घरीच घेऊन जायचं ना आपल्या😡....दुसर कशासाठी त्रास दयायचा......कुत्रा चावला तरं....😱?


        पाचवी बाई.......मृत कुत्र्याच्या आत्म्यास शांति लाभो😫.......रेस्ट इन पीस कुत्र्या........आजारी होता बिचारा......४-५ दिवसां पासून.......परवा तर त्याला अजीर्ण झालं......गवत खाउन आला......उलटी काढून त्या उलटीतचं लोळत होता बिचारा😰......ना उठू शकत होता ?...ना बसू शकत होता ?.....आणि आज ही बातमी😩 ?.......अरेरे फार वाईट झालं🤦‍♀️ !.....अजूनही लाॅबी बाहेर उलटीत🤮 लोळत पडलाय असाच दिसतोय डोळ्यांसमोर माझ्या तरी😭..........


        हे आणि असे बरेच चर्चा सत्र सुरूच होते संध्याकाळ.....रात्री पर्यंत............मग एक असा मेसेज आला ज्याने सगळयांची तोंड बंद झाली.......😷 म्हणजे बोटं टाईप करायची थांबली........✋


     नमस्कार ! मी दिपक शिंदे, मीच तो ज्याच्या गाडी खाली आजारी आणी म्हातारा कुत्रा आला.....मी पहाटे ६ ला गाडी ने निघालो होतो.....मला कुत्रा रस्त्यावर मधोमध झोपलेल्या अवस्थेत दिसला .....मी हाॅर्न दिला तसा कुत्रा उठला आणि थोडा चालू 🐕 लागला....मला वाटलं तो बाजूला निघून गेला पण तसे काही झाले नाही.........तो गेला म्हणुनच मी गाडी पुढे नेली.....पण नंतर मला जाणवलं गाडी खाली काही आलं.......मी गाडी थांबवली आणि वाॅचमॅन 👮‍♂️धावतच आला त्याने सांगितले की हा कुत्रा आजारी होता ४-५ दिवसांपासून.....सोसायटी मध्ये माझ्या मुलीही सायकल चालवतात.....मलाही कळतं.....मी गाडी फार सांभाळूनच चालवतो .....तरीसुद्धा माझ्या हातून असं घडलं......असं व्हायला नको होत पण हा निव्वळ अपघात होता आणि योगायोगही.....असं करण्याचा माझा काहीही हेतू नव्हता......माझ्या हातून हे असं घडलं...मी आज त्यामुळे नीट झोपू शकणार नाही......आज माझ्या हातून अपघाताने एक मुका जीव मारला गेला......मी अंतःकरणापासून दुःखी आहे...खरंच............🙏😔


         हा मेसेज वाचून बराच वेळ कुणाचाही रिप्लाय नाही आला....आणि बऱ्याच वेळाने एका गृहस्थाने मेसेज टाकला......दिपक तुझी ह्यात काही चुक नाही......तो एक अपघात होता....तु स्वतःला दोष नको देऊ.......कुत्रा मेल्याचे दुःख मला पण आहे...पण त्या आजारी कुत्र्याला कमिटीने डॉक्टरांना बोलवून दाखवयास हवे होते,कारण त्याच्या इंफेक्शनने इतर लहान मुले आजारी पडू शकली असती.....आणि हा अपघात कुणाकडूनही होऊ शकतो..............तु नको त्रास करून घेऊस........!


        त्यावर दिपकने त्या भल्या गृहस्थाला त्याला निट समजुन घेतल्या बद्दल मनापासुन त्याचे आभार मानले....... आणि ह्या कुत्रा प्रकरणावर पडदा पडला एकदाचा......पण खरं कळल्यावर एवढा वेळ जे लोकं त्या प्रकरणाचा गाजावाजा करत होते....त्यातला एक ही जण दीपक ची खरी बाजू कळल्यावर, त्याला आधार द्यायलाही नाही आला........किती नकारात्मक प्रतिक्रिया येतात ह्या व्हाॅट्स अप वर ? बाकीच्या तटस्थ व्हाॅट्सअप प्रेमींनी कपाळावर हात मारून घेत असे उद्गार काढले.........! हाय रे हे व्हाॅट्सअप.........? तुझं माझं जमेना.....अन् व्हाट्सअप वाचून करमेना......!    


Rate this content
Log in