Swarup Sawant

Inspirational


3.0  

Swarup Sawant

Inspirational


ढीगभर आश्वासने

ढीगभर आश्वासने

2 mins 1.6K 2 mins 1.6K


एक घनदाट जंगल होते. वाघ ,सिंह ,कोल्हा असे बरेच मोठे तर उंदीर ,मांजर ,हरिण असेही प्राणी रहात होते.जंगलात खूप मोठमोठी झाडे होती.त्या झाडांवर खूप पक्षी रहात होते. थोडक्यात अनेक प्राणी पक्षी यांची कुटुंबे तेथे गुण्यागोविंदाने रहात होती. सगळ्यांचे दिवस आनंदात जात होते.

  आता एव्हडी कुटुंबे एकत्र मग काय कुणी मोठा कुणी छोटा असे आलेच. आणि या जंगलात प्राणी खूप .याची बातमी शहरात पसरली.मग काय शिकारी या जंगलाकडे वळू लागले.सगळे भयचकित झाले.आपले रक्षण करणारे कुणीतरी असावे. असे त्यांना वाटू लागले. म्हणून त्यांनी एक मिटिंग घ्यायचे ठरवले.

   अखेरीस मिटिंगचा दिवस उजाडला.सगळे हळूहळू जमू लागले. सोंड हलवत गजराज आले. डरकाळी फोडत वाघोबा,गर्जना करत सिंह महाराज आले. धीम्या गतीने कासव, टुणटुण उड्या मारत ससोबा आले.आभाळात भरारी घेत पक्षीगण जमले.कुत्रा ,मांजर सगळे जमले.

  सभा सुरु झाली.काही झाले तरी राजा आपले मोठेपण सोडणार कसे? कुणी काही बोलायच्या आत सिंह महाराज उभे राहिले. जंगलच्या राजाचा म‍ान आमचाच आहे. या जंगलावर आमचेच राज्य राहील. तुमच्या सुखाची व संरक्षणाची जबाबदारीही आमचीच राहील.असे म्हणून त्याने त्यांच्या असंख्य योजना ऐकवल्या.योजना ऐकून सारे भारावले. राजा असावा तर सिंहासारखाच.किती आपल्याबाबत व जंगलाच्या विकासाबाबत विचार करतो. सर्वांनी त्याला सलामी दिली.हारतुरे घातले. प्रसन्न मनाने सर्व आपापल्या घरी गेले.काही दिवस गेले.सिंहाने सांगितलेली एकही गोष्ट अंमलात आणली गेली नाही. शिकारी तेव्हडे जंगलात येत सापळे लावत प्राणी पक्षी पकडून नेत. रस्ते खराब झाले .पाणी स्वच्छ मिळेना. सगळे कंटाळले.परत सभा लावण्यात आली. सिंहाच्या जवळचे त्याचे गोडवे गातच आले.ते एकून इतर गप्प बसले.परत सिंहमहाराज उभे राहिले. ताकद त्यांची नेहमीच जास्त.कोणी काहीच बोलले नाही. ढीगभर आश्वासने त्याने दिली.ह्यं करु त्यं करू. सगळ्यानी जयजयकार केला. आपला जयजयकार करतात ना त्यातच सिंह खूश.

  हळूहळू असेच वारंवार घडू लागले.आपण काही जंगलचे राजे नाही. पण आपण काही तरी मदत करु शकतो.असे काही पक्ष्यांनी कुत्र्यामांजरींनी गपचूप येऊन ठरवले. कारण जर का राजाला समजले तर काही खरे नाही. त्याचा अपमानही होईल.कोणत्या प्रसंगाला सामोरे जावे लागेल सांगता येणार नाही. 

  पक्षी उडू शकतात .त्यामुळे शिकारी जवळ आले की आपण उडत पटकन जाऊन त्यांना सावध करु शकतो. शिकारी जमीन खणू लागले की जमिन थरथरते. की कुत्र्या -मांजरांना त्याची जाणीव लगेच होते. तेही जोरजोरात ओरडून इतरांना सावध करतील. जेणेकरून शिकाऱ्यांपासून तरी जंगलातल्या पशुपक्षांचा प्राण्यांचे रक्षण होईल .आश्वासनांपेक्षा टीचभर मदतीला ते लागले. कोणालाही न सांगता. कोणताही मोठेपणा न घेता. त्यामुळे शिकाऱ्यांना शिकार मिळणे अवघड जाऊ लागले व त्यांनी त्या जंगलाचा नाद सोडला .

    मंडळी त्यांना ती सवयच लागली. ते आपल्यालाही अशीच मदत करतात. भूकंप ,त्सुनामी ,वादळ अशा वेगवेगळ्या आपत्ती जेव्हा येतात.तेव्हा पक्षी आकाशात मोठ्या संख्येने उडतात. जोरात आवाज देतात. कुत्री भुंकतात .मांजरी रडतात.त्यांची ती टीचभर मदत मोठे काम करत असतात. कोणाच्या शाबासकीची वाट न पाहता


Rate this content
Originality
Flow
Language
Cover Design