Mangesh Kulkarni

Romance


3  

Mangesh Kulkarni

Romance


प्रेम

प्रेम

1 min 1.2K 1 min 1.2K

प्रेम


ती आईकडे खूप वर्षानी राहायला आलेली..

मॉर्निंगवॉकला..Earphone वरआवडती गाणी.

काही ओळखीचे चेहरे. हात दाखवत..smile देत..पुढे..मस्त mood..


हलकीच सर येवून गेलेली...


बंगल्याची मोठी सोसायटी..रेखीव रस्ते.


 शाळेत जाणाऱ्या छोट्याना हात दाखवत ती सहजपणे डाव्या बाजूस वळाली...


 निर्मनुष्य रस्ता लांबपर्यन्त....


 डाव्या उजव्याबाजूला झुम्बरे घेऊन उभा असलेला बहावा... त्याच्या पाकळयानी रस्ता मोहरलेला...


 नकळत तिने बूट काढले...पावलाना पाकळयाचा स्पर्श... मोहरलेल्या मनाने ती पुढे..छातीत धड़धड़...नजरेत आतुरता...


 मांडी घालून मोगऱ्याची फुले वेचणारा .. हळूवारपणे..पाठमोरा..


तोच असेल का? ... किती वर्षे झाली? अनंत आठवणी..

ती स्तब्ध.. अनामिक ओढीने पुढे...


त्याच्या औंजळीत मोगरा..शांत.


हलकेच ती त्याच्यामागे..भारावल्यासारखी..त्याच्या गळ्याभोवताली हात घालून तिने औजळ पुढे केली...


आलीस??

...आणि तिची औंजळ सुगंधित झाली!!!


Rate this content
Log in