Sanjay Raghunath Sonawane

Others


3  

Sanjay Raghunath Sonawane

Others


ड्राईवरची व्यथा-संजयसोनवणे-लेख

ड्राईवरची व्यथा-संजयसोनवणे-लेख

2 mins 860 2 mins 860

ड्राइव्हरची व्यथा-


बऱ्याच वेळा अनेक कुटूंब खाजगी वाहन भाड्याने घेतात. त्यातून ते लांब पल्ल्याचा प्रवास करत असतात. त्यात मोठ मोठे अधिकारी व अतिश्रीमंत लोकही असतात. त्यांच्या सोबत ड्राइव्हर देखील असतो. कमीत कमी पाचशे ते सहाशे किलोमीटर पर्यंत गाडीचा प्रवास असतो. गाडी सलग चालू असते. पण त्या गाडीतील अति महत्त्वाचा घटक म्हणजे गाडीचालक असतो. तो आपल्याला सुरक्षितपणे इच्छित स्थळी पोहचवत असतो. त्यात त्याला ठरलेले भाडे मिळत असते. तो त्या दिवसापुरता आपल्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून आपली भूमिका बजावत असतो. पण त्या गाडीतील सदस्य त्याला आपल्या कुटूंबा प्रमाणे वागणूक देत नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. कुठे गाडी जेवणासाठी थांबवली तर गाडीतील सर्व सदस्य पोटभर जेवतात. पण ड्राइव्हर साधे जेवणासाठी विचारत नाही. ही दुय्यम वागणूक देत असतात. पण सर्वच तसे नसतात. काहीना माणुसकी खूप असते. ते ड्राइव्हरला आपल्या कुटूंबासारखी एकसमान वागणूक देतात. त्यामुळे ड्राइव्हर

मानसिकदृष्टया सक्षम बनतो. 

     या उलट काही लोक दांभिकपणाचा आव आणतात. स्वतःला मोठे धार्मिक समजतात. अध्यात्मिक समजतात. त्यांच्यातील भूतदया जागृत होते. पण अशी माणसे ड्राइव्हरला तुच्छ समजतात. त्यांना माणुसकीहीन वागणूक देतात. त्यांना अडचणीच्या वेळी आर्थिक मदत करत नाही. वेळेवर तुटपुंजा पगार देत नाही. ही माणसे कुत्रे पाळतात. त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी एक खास नोकर ठेवतात. त्याला वीस हजार पगार देतात. त्याला मांस, मासे, दूध, अंडी असा सकस आहार देतात. पण ड्राइव्हरला पगार देताना नाकतोंड मुरडतात. अशा माणुसकी नसलेल्या माणसांकडे अजिबात टिकत नाही. ड्राइव्हर मानसिकता त्याच्या मालकाबद्दल चिडचिडी झालेली असते. त्यातूनच ते ड्राइव्हर अचानक नोकरी सोडण्याचा मार्ग निवडतात. म्हणजे कुत्र्याला किंमत पण माणसाला किमत नाही. त्यामुळे बहुतेक ड्राइव्हरचे मानसिक संतुलन राखण्यास अयशस्वी ठरतात. तेही नंतर मालकाचा आदर करत नाही. मालकाबद्दल त्यांच्या मनात कायम राग भरलेला असतो. याच्या उलट जे ड्राइव्हरला आपल्या कुटुंबासारखी वागणूक देतात तिथे वर्षानुवर्षे ड्राइव्हर नोकरी करतात. गाडीमालकाचा आदर राखतात.


Rate this content
Originality
Flow
Language
Cover Design