Kishor Mandle

Fantasy


3  

Kishor Mandle

Fantasy


दुसरी बाजू.

दुसरी बाजू.

2 mins 1.2K 2 mins 1.2K


हलकेच खिडकीतून आत एक कवडसा आला. वेळ दिवसाची होती म्हणुन सुर्याचा म्हणायचा. नाहीतर चंद्रप्रकाश आणी सुर्यप्रकाश ह्याचा माझ्यासारख्याला काय फरक पडतो. खिडकीतुन भिंतीवर प्रकाश ओघळून दिवसअखेर खाली येत विरघळून जातो. आजुबाजुला या काळ्या भिंती आणी माझ्या डोक्यापेक्षा चार फूट उंच असलेली खिडकी. जसजसा दिवस मावळेल तस मला अंग थंड पडत असल्याचे जाणवते. अंधार खोलीत भरू लागला की मला भिती वाटु लागते. मग मी कोपर्‍यात गुपचुप गुडघ्यात डोके खुपसून बसुन राहतो. आता समोरच्या भिंतीवर प्रकाश येवु लागलाय. मला आता खुप हायस वाटतय. हातपाय झटकत मी उभा राहिलो. मी खिडकीतून येणाऱ्या प्रकाशा बरोबरच बाहेरुन येणारे आवाजही ऐकतो. हे आवाज आता ओळखीचे झाले आहेत. तासन्तास मी ते ऐकत असतो. सकाळच्या वेळी

पाखरांची किलबिल ऐकताना वाटते की बाहेर जाऊन बघावे पण बाहेर ते असतील. मला बघून आरडाओरड करतील. त्याच सगळ्याना  कंटाळून तर मी इथे आलो. प्रकाशामुळे भिंतीवरील सावल्यांचा खेळ सुरू झाला. बाहेर एखाद झाड आहे, त्याच्या पानाची सळसळ ऐकत माझे अंग हलके होवु लागत. मी हळूहळू खिडकीकडे जावु लागलोय. खिडकीतून बाहेर पाहिले की ते समोरच ते झाड आहे. गजामधुनच मी त्याच्याकडे पाहत राहतो. खुपच छान दिसत ते. मला त्याच्याकडे जावस वाटतय. मी खिडकीतून हळूच डोक बाहेर काढले. दुरवर ते दिसतात का पाहिल. कुणी नाही इथे. मी खिडकीतून स्वतःला बाहेर झोकुन दिलय. वारा मला ढगासारखा पुढे नेतोय. झाड जवळ जवळ येतय. त्याच्या फांद्याना मला जवळून बघायचय. मी त्याला हात लावला. खरखरीत स्पर्श असला तरी पानं मात्र मला हवेबरोबर हलता हलता नाजुक वाटतात. फांदीवर बसुन मी माझ्या घराकडे पाहिले. ती खिडकी बाहेरुन सुंदर दिसत नाही. रंग उडलाय भिंतीचा.. समोरचा तुळशी वृंदावन जळून गेलाय. व्हरांडा सुकलेल्या पानानी भरून गेलाय. पण मला आता यात रस वाटत नाही. या झाडाला मात्र सोडवत नाही. झाडाखालून हा कसला आवाज येतोय..

कोणी आलय का परत?  

मला त्रास होतो ह्याचा, कळत कस नाही.

अरे ह्याने बघितले वर! बघ कसा चेहरा पांढराफटक पडला ह्याचा. माझ्याकडे पाहून गेला बोंबाबोंब करत. 

काय करणार हया लोकांना.... आता परत आत जाव लागेल त्या अंधारात..

सुखाने जगू का देत नाहीत मला.Rate this content
Log in